Skip to main content

ठिणगीच्या शोधात

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 24/07/2008 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
"दहावीचा अभ्यास" हा माझा शाळाशाळातून चालणार्‍या कार्यक्रमातील काही वेताळ अनुभवापैकी हा एक.संबोधन चालू असताना माझे मुलांवर बारीक लक्ष असते.कुठे ठिणगी पडते आहे का? त्या वर्गातील शेठ मंडळीपेक्षा(८५%+ ची हुशार(?) मंडळी) अशा ठिणगीमध्ये मला जास्त रस असतो. भांडुप मधील एक बेताची शाळा . मुलांमध्ये प्रोटीन आणि हिमोग्लोबीनची कमतरता दिसत होती. कार्यक्रम संपल्यानंतर एक मुलगी आली व पाया पडली.

सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या

लेखक फटू यांनी गुरुवार, 24/07/2008 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
जरी बसणार नाही या गोष्टीवर विश्वास माझा लाभणार नाही मला पुन्हा जरी सहवास तुझा मनाची मात्र तयारी अजून होत नाही माझ्या सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या जेव्हा कुणी समोरून क्षणी निघून जातं माझ्या जणू ती व्यक्ती तू असल्याचा भास होतो राजा तुझी मुर्ती वसली आहे दोन्ही पापण्यांत माझ्या सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या असलो जरी मी अफाट दुनियेमध्ये मिसळलेला आतून मात्र मी आहे पुर्ण हरवलेला अन एकला या एकाकी जगामध्ये मला सोडून गेली तू राजा सा‌‍‌र्‍याच आठवणी आहेत अजून मनात ताज्या जरी आजही होते पापण्यांची उघडझाप माझ्या त्या पापण्यांवरची स्वप्नं तुझीच होती रे राजा ती सारी स्वप्नं राज्य करतात
Taxonomy upgrade extras

दारु

लेखक मिनल यांनी गुरुवार, 24/07/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
परवा शनिवारि पुण्यात टिळ्क रोडवर खाद्डी करता गेले होते. तिथे एका हॉटेलात एक मुलगि सिगारेट होधत होती...आणि छान हवेत वलय सोडत होति..बघुन आश्चर्य वाटले..(बाई आणी सिगारेट अशि सवय डोळ्याला आणी मनाला झालि नाहिये :() नंतर एका हॉटेल मध्ये मुलिंना दारु पिताना पण बघितले...पुणेरि असल्यामुळे हे बघायचि सवय नव्हति.. मनात विचार आला खरच आपलि संस्क्रुति बद्लत आहे का? बायकांनी दारु सिगारेट पिणे योग्य आहे का? माझ्या मनाला पट्त नाहिये...तुमचि मद्त हवी आहे.......

तहान !!

लेखक निसर्ग यांनी गुरुवार, 24/07/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
बघा ही मनी पिते कशी पाणी

पाउस..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 24/07/2008 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीपाशी तुझ्या किती घुटमळला पाउस..! छत्री घेऊन निघता तू हळहळला पाउस..! मला न सुचले बोलायाला तेव्हा हसला. तुझ्यापुढे अन स्वतः किती अडखळला पाउस..! कधी उगाचच रुसला, क्षितीजामागे दडला. मल्हाराने तुझ्या पुन्हा विरघळला पाउस..! अवचित ओल्याचिंब स्मृतींची वीज तळपली. रक्तासोबत धमन्यांतुन सळसळला पाउस..! कधी सरीतून निघता जखमांवरची खपली. स्वतःच त्या जखमांसाठी तळमळला पाउस..! तुझ्या अंगणी शब्दशब्द हा आज बरसला. कितीकदा मी लिहिला अन चुरगळला पाउस..! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

इट मेक्स सम सेन्स.......आठवण.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 24/07/2008 07:10 या दिवशी प्रकाशित केले.
शिला मला म्हणाली, "मला वाटतं स्मरण शक्ति आणि आठवण यात फरक असावा.कारण स्मरण-शक्तिचा मेंदूशी संबंध असावा,आणि आठवणीचा मनाशी संबंध असावा." असं काही तरी विरोधाभास होईल असं स्टॆटमेंट करून शिला माझ्याकडून कसा प्रतीसाद येतो त्याची वाटच पाहत होती. मी म्हणालो, "शिला तुला खरंच काय म्हणायचं आहे ते जरा मला कळू दे." शिला म्हणाली, "चव्वेचाळीस वर्षावर माझ्या नवर्‍याचं काही खरं नाही हे मला आमच्या डॉक्टरांकडून कळलं.रमेश जास्त दिवस काढणार नाही असं ते मला म्हणाले.त्याची दोन्ही फुफुसे कॅन्सरने भरली होती. "बाळं " म्हणतात ते माझ्या वृद्ध आईला झालं होतं ज्याला, आता आपण अल्झायमर म्हणतो.

... उर्फ सुगरणीचा सल्ला ३

लेखक मेघना भुस्कुटे यांनी गुरुवार, 24/07/2008 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे दुवे - http://www.misalpav.com/node/2432 http://www.misalpav.com/node/2540 आईची आठवण या चित्रपटीय गळेकाढू प्रकरणातला माझ्याबाबतीत सर्वांत खरा आणि महत्त्वाचा भाग असेल, तर तो इतकाच की घरी मिळणारं आयतं, चवीपरीचं आणि पारंपरिक अन्न घराबाहेर राहिल्यावर मिळेनासं झालं. बाहेरचं खाणं ही माझ्यातल्या मुंबैकरणीला अगदी सवयीची नि आवडीची गोष्ट खरीच. पण किती झालं तरी ताकातली उकड, भाजणीची थालिपिठं, भरली वांगी, लसणीसकट दरवळणारं कुळथाचं खमंग पिठलं या गोष्टी बाहेर कशा मिळणार? आई नावाचा प्राणी अनुपस्थित.

काव्यकर्तनालय बंद होते तेव्हा..!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 23/07/2008 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
'मिसळपाव' उघडलं आणि केशवसुमाराचे विडंबन नाही असे दिवस माझे तरी फार थोडे गेले. पान उघडल्यावर 'काव्या'च्या विभागात केसुशेठचे एखादे फर्मास विडंबन वाचायचे आणि पुढच्या उद्योगाला लागायचे हा माझा शिरस्ताच झाला होता म्हणा ना. परवा केसु ने निवृत्तीची घोषणा केली आणि विनंत्या, आर्जवे, कविता, विडंबने, प्रतिविडंबने यांचा पाऊस पडला. केसु आणि निवृत्त? असं काय झालं? मलाही थोडे बावचळल्यासारखे झालं खरं आणि मी ही एक विडंबन करण्यास उद्युक्त झालो.

इलाहींचा आशीर्वाद...

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 23/07/2008 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
जखमा कश्या सुगंधी, झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने, तो मोगरा असावा अंदाज आरशाचा वाटे खरा असावा बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा मंडळी, या ओळी आहेत सुप्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांच्या! मिपाचे एक सन्माननीय सभासद धोंडोपंत हे त्यांचे अगदी जवळचे स्नेही आहेत. पंतांमुळेच आमचाही जमादारसाहेबांशी परिचय झाला, बातचित झाली. आम्ही आमच्या बोलण्यातून त्यांना आपल्या मिसळपाव या संकेतस्थळाविषयी सर्व माहिती पुरवली. हे ऐकून त्यांना मनापासून आनंद वाटला व त्यांनी मिपाला अगदी भरभरून शुभेच्छा दिल्या! त्यांच्यासारखी असामान्य प्रतिभा लाभलेल्या कलाकारचा आशीर्वाद हा मिसळपावकरता मोलाचा वाटतो! असो, आपला, तात्या.