Skip to main content

दूरदेशी...

लेखक पद्मश्री चित्रे यांनी बुधवार, 30/07/2008 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गेलो जरी तुला मी सोडून दूरदेशी येइन धावुनी मी जेव्हा तु साद देशी डोळ्यामधे तुझ्या ग येतील अश्रु जेव्हा माझ्याच काळजाचा ठोका चुकेल तेव्हा असशील तु उदास, वा खिन्न तू मनात मी ही तिथे असेन तुझियाच आठवात स्मरशील तू मला अन येइल मन भरोनी तेव्हा तुलाच सखये पाहीन मी ही स्वप्नी असलो जरी मी दूर मन हे तुझ्याच पाशी घे पापणी मिटूनी, तेथेच मज पहाशी
Taxonomy upgrade extras

माझी पाखरे

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 30/07/2008 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
गडबड वेड्या वस्तीमध्ये शाळा पाखरांची पोपट मैना आणि कबुतर लगबग चिमण्यांची डेरदार त्या वृक्षावरती घर आणिक शाळा सकाळ सायंकाळी भरतो प्क्ष्यांचा मेळा कावळा मास्तर शाळेमध्ये पोर चिमणा-चिमणी कावळा शिकवी धडे-कविता मुले गाती गाणी किलबिल किलबिल किती तयांची आसमंत दाट्तो मैना गाइ सुरेल गाणे पोपट तो नाचतो अवतीभवती मनुष्यप्राणी लोभी हलकट मारामारी आणि भांडणे नुसता हवरट स्वार्थापायी या अधमाने कुर्हाड हो आणलि घर आणिक शाळा त्यांची झरझर हो तोडली घिरट्या घालीत होते पक्षी घर हरवले कोठे आर्त स्वराने त्या पक्ष्यांच्या आसमंत दाटे किलबिल किलबिल हरवून गेली सुने सुने
Taxonomy upgrade extras

खुप दिवस

लेखक मनी यांनी बुधवार, 30/07/2008 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवस झाले खर तर तुला भेटून वषा झाले असावे बहुतेक .. सगले कसा ठरवून केला होते मी ,,,,,स्वताच्या हाटटने ,,,तुला न भेटण्याची हत्ताही मझ्याचा ....सगले कसा मनाला समजावून.......पण तरी ही तुला विसरने जमात नही मला ..सगले कसा अवघड होते आहे .जम्यचाया पलीकडले...... परवाच तुझ्या बर्थडे होतो .खुप ठरवले ग्रीटिंग.ईमेल समस फ़ोन कही नही करयाच .......लक्षात नही कही असा दाखवायच .पण सगळा अथाव्दा तुझ्या बर्थडे ला क्या द्याच हा विचार करण्यात गेला.....शेवटी शेवटी तर एक ईमेल...एक ग्रीटिंग अणि फ़ोन यावर सेत्त्लेमेंट झाली काय बोल्याच.

धरणीकंप!!

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 30/07/2008 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
आज लॉस एंजेलिस परिसरात सकाळी ११.४० च्या सुमाराला धरणीकंप झाला.... आम्ही आपले रोजच्याप्रमाणे ८.३० ला ऑफिसात आलो होतो..... पुढ्यातल्या कामाचा आढावा घेतला...... त्यातील किती हाताखालच्या लोकांवर सोपवता येतील ती सोपवली..... अगदी स्वतःलाच करावी लागणारी कामं उरकून मिसळ्पाव उघडला....... जरा कुठे इस्ट्-कोस्ट वाल्यांचा मिपा कट्टा वाचून त्यावर एक खट्याळ प्रतिक्रिया लिहून एन्टर करतोय न करतोय तोच....... सगळी केबिन थरथरायला लागली...... प्रथम वाटलं की बिल्डींगमध्ये काहीतरी ड्रिलींगचं काम वगैरे चालू असेल......... पण मग माझी चाकं असलेली खुर्ची कंप्यूटरपासून लांब-लांब जाऊ लागली...... आम्ही नेहमी बूट का

उन्हाळा-१ व २

लेखक दोयल यांनी बुधवार, 30/07/2008 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
होळी पेटली, पुरणपोळी खाऊन दुसरया दिवशी ची धुळवड खेळून झाली कि कपाटा वरचा टेबल फॅन खाली यायचा. रविवारी दुपारी जेवल्यावर त्याच्या आवाजच्या लयीत आपसूकच डोळे मिटायाचे. पांगारा लाल सडा घालायचा अंगणात, त्याच्या मखमली पाकळ्या आणि स्वर्गिय रंग.. आहा, भर दुपारी डोळ्यातून मनात उतरत जायचा.त्याचा मधहि तितकाच अफलातून असला पहिजे, पोपट (काहि काहि वेळा जंगली राखाडी पोपटंचे थवेच्या थवे उतरायचे पांगार्याच्या झाडांवर) बुलबुल, हळद्या, मैना, कोतवाल, धनेश, भारद्वाज, कवड्या असलेच आणि आणखीही अद्भुत पक्षी तिथे जमायाचे.

"कवडसा"

लेखक मनीषा यांनी बुधवार, 30/07/2008 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीतूनी उतरे अलगद असा देई उजेडाचा वसा अंधारलेल्या खोलीला प्रकाशाचा एक कवडसा | गोल, शुभ्र, उजळसा धरती वरती चंद्र जसा अंधाराला छेदुनी आला प्रकाशाचा एक कवडसा | सप्तरंग सामावे कसा भूमिवरी ना दिसे ठसा तेजाचा तो मोहक तुकडा प्रकाशाचा एक कवडसा | अंधार निराशेचा असा दाटे फार मनी कसा उजळीत येई नवीन आशा प्रकाशाचा एक कवडसा |

"ठेविले अनंते तैसेचि रहावे"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 30/07/2008 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
अनंताचा निरोप घेताना मला खूप वाईट वाटलं.त्याला त्याचं काहीच वाटल्याचं दिसलं नाही.कदाचित, "ठेविले अनंते तैसेचि रहावे." असं त्याला वाटत असावं, असं मी मनात आणून त्याचा निरोप घेतला. अनंत नाडकर्णी आमच्या समोरच्या कॉलनीत रहायचा.त्याची आमच्याशी ओळख वसंत सबनीसमुळे झाली.वसंत सबनीसचा हा मेहुणा. अनंता एम.कॉम होता.त्याला एका बॅंकेत सिनीयर मॅनेजरची नोकरी होती.त्याचं लग्न झालं होत आणि त्याला एक लहान मुलगा होता. अनंताला दोन तीन बहिणी होत्या.

यु मी और 'हम'............

लेखक राधा यांनी मंगळवार, 29/07/2008 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व वाचक मंडळीना नमस्कार. 'व्यक्ती आणि व्यक्ती'(२ भाग) व 'वाघ्या' या लिखाणानंतर आता थोडा काही वेगळ लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. आधीच्या प्रतिक्रिया वाचुनच हे लिखण करते आहे , म्हणुनच पुन्हा एकदा आपल्या प्रतिक्रियांची साथ हवी आहे. इतक्यातच काजोल आणि अजय देवगण यांचा ' यु मी और हम' पिक्चर बघीतला. तो कसा बनला आहे किंवा अभिनयाबद्दल मला नाही लिहायच हा पण त्याची 'कथा' मात्र मनात घर करुन गेली. 'alzimer'हा रोग झालेल्या एका स्त्री ला तिचा नवरा नव्हे ' जीवनसाथी' कसा आधार देतो ते यात दाखवले आहे.

मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 29/07/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ मराठी संस्था, पुणे तर्फे शनिवार, दिनांक ०२. ०८. ०७ या दिवशी दुपारी ०४ ते ०७ या दरम्यान 'महाराष्ट्र साहित्य परिषद'च्या, माधवराव पटवर्धन, पुणे येथील सभागृहात 'मराठी शुद्धलेखन : दशा आणि दिशा' या विषयावर श्रीमती सत्त्वशीला सामंत यांचे व्याख्यान आणि प्रश्नोत्तरे - चर्चा असा कार्यक्रम आयोजित केला आहे. कृपया या विषयात रुची आणि आवड असणाऱ्यांनी या कार्यक्रमात जरुर भाग घ्यावा. संपर्क : प्रा.

तुझे नि माझे मिटू दे अंतर

लेखक पुष्कराज यांनी मंगळवार, 29/07/2008 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
दहनाभुमिवर फुले वहाया येशील ना तू माझ्या नंतर मधले सारे विरून जाऊ दे मिटून जाऊ दे आपुले अंतर अवचित अश्रु येतील डोळा थेम्ब मातीचा होइल ओला तृप्त तृप्त मी होउन जाइन मातीतून मी कविता गाइन अश्रु तुझे ते प्रेम बोलतील पुन्हा स्मृतींचे मेघ दाटतील वेळ निघुनी असेल गेला पाचोळ्यावर पाउस ओला उगीच आपुल्या हट्टापायी हरवून बसलो जे काही क्षण पुन्हा परतुनी नाही यायचे किती बोलावा करा निमंत्रण हिशोब कसला झाले गेले आठवणींचे काहूर उरले रंग उडुनी गेला आता दोनच अश्रु जाता जाता असेच ना हे नेहमी होते वेळ जातो अन ओढ लागते तुटण्या आधी रेशीम धागे एकच पाउल येऊ मागे
Taxonomy upgrade extras