Skip to main content

(दूर आहे डेडलाईन अजूनि)

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 31/07/2008 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर एक से एक विडंबने वाचून काही महिन्यांपूर्वी लिहिलेले एक विडंबन इथे पोस्ट करावे असे वाटले :) ----------------------- ('तरूण आहे रात्र अजूनि' हे गाणं एक सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरच्या नजरेतूनि ...) दूर आहे डेडलाईन अजूनि, साहेबा पेटलास का रे.... एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे.... अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी अजून मी लिहले कुठे रे, हाय तू रूसलास का रे .... सांग या शेजारच्या चटक चांदणीला काय सांगू तिला पहाया जमती सारे, आणि तू बसलास का रे .... बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे .... उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा तू भ
Taxonomy upgrade extras

दीर्घ ते लघु(कथा) चित्रपट

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 31/07/2008 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी आतापर्यंत ऐकलेल्या हिंदी सिनेमाच्या नावांत ’मां’ हे सर्वांत लहान व ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ हे सर्वांत मोठे नाव आहे. यात ’मां’ नावाचे ३ सिनेमे येऊन गेले. ’जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ एकच( ह्या नावाचा सिनेमा पुन्हा बनविणार कोण आणि पाहणार कोण आज काल ;) ) नंतरही मोठ्या नावाचे सिनेमे येऊन गेले उदा. ’पाप को जलाकर राख कर दूंगा’, ’जुल्म को जला दुंगा’ वगैरे. ते काही जास्त चालले नाहीत. पण नंतर ’हम आपके हैं कौन’, ’दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हे जरा मोठ्या नावाचे सिनेमे आले जे भरपूर चालले. त्यामुळे तेव्हाही जरा मोठ्या नावाचे सिनेमे काढायची लाट आली.

सुरेखा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 30/07/2008 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?" साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी. मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो.

ओळखा पाहूं!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 30/07/2008 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सेल किंवा मोबाईल फोनचा अलिकडे इतका वापर होत आहे की आपल्याला हवं असलेल माणूस केव्हांही आणि कुठेही आपल्या संपर्कात आणू शकतो. त्यामुळे कुठलीही व्यक्ति दूर जरी असली तरी ती ह्या फोनमुळे जवळच असते. "माझा होशील का" ह्या गाण्यातल्या दोन ओळी चटकन मनात आल्या. "दूर तू परी, जवळी तुझ्या मी नाम गुंफीते, तुझीया नामी"आणि त्यानंतर "दूर तू परी, जवळी तुझ्या मी" हे जणू ह्या फोनचं दुसरं नांव आहे असे मनात आलं. ओळखा पाहूं! घणघणलो की मजं मग जवळी घेशी अन म्हणशी तिला माझ्या कानाशी "दूर तू परी जवळी तुझ्या मी" वदते ती मग तुझीया कानी "नांव गुंफीते तुझीया नामी" करूं किती मी तुमची मध्यस्थी आणुनी तुम्हा एकमेकां जवळी

(बेचैन)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/07/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!;) गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला' काय मी आता करु?

वदनी कवळ घेता.

लेखक रामदास यांनी बुधवार, 30/07/2008 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाद नावाच्या एका हॉटेल मध्ये गुरुवारी मी न विसरता (विसरणार कसा? उपास असतो ना) साबुदाण्याची खिचडी खायला जातो. कर्व्यांचा , हॉटेलच्या मालकांचा हात सढळ आहे. भरपूर खिचडी देतात. वर्षभरापूर्वी स्वाद चा डायनींग हॉलचं इंटेरीयर परत झालं तेव्हा मी हे पेंटींग मी पाह्यलं. एव्हढं जिवंत चित्र. मी या पेटींगच्या प्रेमात पडलो. कर्व्यांच्या पाठी पडून चित्रकाराचा फोन नंबर मिळवला. भेटीची वेळ ठरवली . आणि ... माय गॉड !

(चैन)

लेखक केशवटुकार यांनी बुधवार, 30/07/2008 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रेरणास्थान आमच्या सदगुरु अनिरुद्ध अभ्यंकर उर्फ केशवसुमारांची चैन कविता हल्ली सारख्या छळतात मजला आणि ओळी चार मग सुचतात मजला टंकले नाही मी काही तरीपण अर्थ कडव्यांचे सलतात मजला कवीलोकांची का खुलली कळी ? प्रश्न हे आता असे पडतात मजला कायदेही काही निवृत्तीचे असू द्या फायदे पुनरागमनात हे दिसतात मजला मी भरवसा कवितांचा काय द्यावा? प्रतिसादही जर असे गिळतात मजला प्रतिसादांचे सर्व रिकामे रकाने खरडीही आजकाल ते विकतात मजला एकदा टाकिन म्हटले मी विडंबन ट्रॅकर छद्मीपणे हसला मजला चैन विडंबनाची मला करता न आली एवढी

काळ्या मसाल्यची आमटी

लेखक स्नेहश्री यांनी बुधवार, 30/07/2008 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
गेले दोन दिवस मस्त पाऊस पडत आहे. काही जणांना पाऊसांत भिजायला आवड्त तर काहीनां पाऊस घरात Njoy करायला आवडतो. पाऊस घरात Njoy करणार्यसाठी ही आमच्या काकुच्या गावची कोकणातील खास पाकक्रुती. साहित्यः- डाळ. कांदे फोडणीचा साहित्य मीठ काळ्या मसाल्यासठी:- १+१/२ चमचा बडीशोप ६/७ मिरीचे दाणे १ चमचा खसखस ४/५ लवंगा १ इंच दालचिनी तमालपतत्राच १ पान मसाल्याचे सर्व सहित्य वेगवेगळे (खमंग)भाजुन घ्यावे. व एकत्र पुड करावी. क्रुती:- १) बारीक चिरलेला कांदा प्रथम फोड्णीस टाकावा. २)नंतर वरुन डाळ घालावी ३) त्यात गरजेनुसार पाणी व चवीनुसार मीठ घालुन घ्या. ४) आणि मग त्यात तयार मसाला घाला आणि चान उकळी काढवी. ५) धुवांधार

आमची 'चैन' आहे!

लेखक मिसळपाव यांनी बुधवार, 30/07/2008 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या अर्ध्या तासात तीन सुंदर कविता इथे पाठवल्या गेल्या - "माझी पाखरे", "दूरदेशी..." आणि आत्ताच आलेली , "चैन". खरं सांगायचं तर आम्हा वाचकांची 'चैन' आहे इथे! या आणि अशा सुरेख रचना करून आम्हाला आनंद देणा-या तुम्हा मंडळींचे मनापासून आभार. आणि या सर्व भूताना अगदी योग्यसा पिंपळ उपलब्ध करून देणा-या वेताळाचे, तात्याबांचे सुध्दा!! (कृतज्ञता शब्दात व्यक्त करू न शकणारा) मिसळपाव.

चैन

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी बुधवार, 30/07/2008 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द हल्ली सारखे छळतात मजला आणि ओळी चार मग सुचतात मजला बोलली नाहीस तू काही तरीपण अर्थ नजरेचे तुझ्या कळतात मजला चांदण्यांना रोजची का रात्रपाळी? प्रश्न हे आता असे पडतात मजला कायदे काही शहाण्यांचे असू द्या फायदे वेडात हे दिसतात मजला मी भरवसा माणसांचा काय द्यावा? सावल्याही जर अशा गिळतात मजला देवळांची सर्व ह्या झाली दुकाने भावभक्ती रोज ते विकतात मजला एकदा घेईन म्हटले मी भरारी पिंजरे छद्मीपणे हसतात मजला चैन रडण्याची मला करता न आली एवढी कोठे सुखे मिळतात मजला