Skip to main content

प्रत्येक व्यक्ति अमुल्य आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 04/08/2008 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका ऍनेस्थेसीऑलॉजीस्ट डॉक्टर मित्राला मी विचारलं "तू ही मेडिकल संज्ञा कां निवडलीस?" त्यावर तो म्हणाला, "त्याचं खरं उत्तर म्हणजे ही शाखा आणि त्यातलं काम हे मला आध्यात्माकडे जाण्याचा मार्ग दाखवतं हे आहे." मी त्याला हे ऐकून म्हणालो, "अरे,तू डॉक्टर असून ह्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस?" हंसत,हंसत मला म्हणाला, "आध्यात्म" ह्या शब्दाला आपण निराळ्या अर्थाने बघू शकतो. श्वास,उश्वास,उत्तेजन,चैतन्य हे शब्दपण वैद्यकीय शास्त्रात येतात, जसे ते श्रद्धेतूनपण जन्म घेतात.आणि हे शब्द माझ्या आयुष्याची आणि माझ्या कामाची व्याख्या करण्यास कारणीभूत आहेत. माझं आध्यात्मी मन आणि माझं वैद्यकीय शिक्षण ह्या दोन्ही गोष्

जत्रा

लेखक अविनाश ओगले यांनी सोमवार, 04/08/2008 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
जत्रा निर्जीव देवतांच्या करतात येथ जत्रा जातात जीव तरीही भरतात येथ जत्रा ओझे परंपरांचे ठरतेय जीवघेणे वेठीस बापुड्यांना धरतात येथ जत्रा तो देव का दयाळू होई असा कठोर? प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा झाले ठिकाण जत्रा, चिंता आणि भयाचे चिरडून सर्व श्रद्धा सरतात येथ जत्रा आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा. -अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras

ते राहूनच गेलं...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 04/08/2008 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक वाईट बातमी आहे. अरूण गेला. मागं मी अरूणनं सांगितलेली, त्या लेलेंची- सिद्धिविनायकाच्या शेजा-याची - गोष्ट तुम्हाला सांगितली, त्या लेल्यांना भेटायचं आमचं ठरलं होतं. नेहेमी आम्ही भेटलो, की त्या लेलेंची आठवण यायची, आणि, कधीतरी नक्की त्यांच्याकडे जाऊ असं अरुण म्हणायचा... गेल्या आठवड्यात, तो अचानक, अगदी अकल्पितपणे, निघून गेला... गुजरातेतल्या गावी वृद्ध आईला भेटायला गेला होता, तिथेच त्याला हार्ट ऍटॆक आला... ...त्या दिवशी सकाळीसकाळी, माझ्या एका सहकार्‍याचा फोन आला, आणि माझ्या मनात कसलीतरी पाल चुकचुकली...

बाला आला रे

लेखक ब्रिटिश यांनी सोमवार, 04/08/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
जेआयला तुमा सगल्यन्चा लेखन वाचुन वाचुन मला बी वाटला कि आपन हेन्चेसारका काय तरी लिवला पायजे. म्हुन आपन ह्या साइटीवर लोगीन झाल्लो. पन लिवाचा काय ? परथम सग्ल्यन्ना नमस्कार. तर मन्डली मना काय तरि सूचुन दे मगे लिवतो. जल्ला टायपिन बी जमत नाय. पयल्यान्दाच लिवतोय काय तरी पर्तिसाद, मार्गदरशन देवा.

(एक पेग संपून गेला..)

लेखक केसुरंगा यांनी सोमवार, 04/08/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती फडणीस यांचा 'एक क्षण निसटू गेला..' वाचून एक निसटलेला क्षण आम्हालाही आठवला! ;) हिरव्यागार बाटलीच्या तोंडाशी.. थांबून राहिलेला थेंब, पांढर्‍या शुभ्र बर्फावर.. ओतलेल्या पिंटभर सोड्यात, टप्पकन पडला... एक लाट उंच उसळली.. ग्लासात आणि मनात! एकाच वेळी!! चिअर्स!!! डोके हलके करणारी अजून एक मैफल लगोलग आत गेलो.. वाट बघत बसलेले काजू गोंजारले.. हळूच शर्टची बटणे मोकळी केली.. आणि गेलो.. तोंड ओले करण्यापुरतं पेग आणायला.. तो पेग तो क्षण!!! येव्हड्यात पिऊन झाला.. छ्या!!! जाऊदे! मूड आहे आज! म्हणताच ग्लास मोकळा झाला... अजून एक पेग संपून गेला.. केसुरंगा
Taxonomy upgrade extras

((नेहेमीच...तुझ्यामुळे))

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 04/08/2008 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
'नेहेमीच ... तुझ्यामुळे' ही बेसनलाडवाची कैफियत वाचून अगदी भरुन आले, ऊर्मी बराचवेळ दाबून ठेवली पण मळमळ थांबेना तेव्हा शेवटी इथे आलोच! आदतसे मजबूर दुसरे काय?! ;) वृत्तात 'भांग' अर्थास 'टांग' नेहमीच ... तुझ्यामुळे कवितेत घोळ घालावी खोळ नेहमीच ... तुझ्यामुळे कमरेत खूर डोळ्यात पूर नेहमीच ... तुझ्यामुळे सगळे कसे (फसले असे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांची लाच शब्दांना लाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिलाच 'बार' पहिलीच 'धार' नेहमीच ... तुझ्यामुळे वाचून झीट विडंबन धीट नेहमीच ... तुझ्यामुळे कवितेची भेट 'चतुरंग' थेट नेहमीच ... तुझ्यामुळे चतुरंग
Taxonomy upgrade extras

आला आला हा श्रावण...

लेखक अथांग सागर यांनी सोमवार, 04/08/2008 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
आला आला हा श्रावण... आला आला हा श्रावण घन निळा घेऊन आले आकाश दाटुन आठवणीत त्या जुन्या माझे हरवले मन ऐकुनी मेघांचा कहर वारा झाला सैरभैर पडता श्रवणी मल्हार जणू नाचे मनी माझ्या ते वनातील मोर थांबता पावसाची संतत ओढा वाही खळाळत आम्हा जणू बोलावत या रे पोरांनो खेळाया ती होड्यांची शर्यत बघुनी धरा ती ओजस इंद्रधनुही क्षितीजास वाटे रुप ते लोभस पिऊनी धारा श्रावणाच्या तृप्त झाली ही तुळस
Taxonomy upgrade extras

लेक लाडकी

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 04/08/2008 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
लेक लाडकी . आठवणींच्या गावाची सफर करत मागे मागे जात इथे येऊन पोहचले. इथून आणखीन मागच काहीच दिसत नाहीये, हिच ती पहिली आठवण!! मला फूलपंखी दिवसांमध्ये घेऊन जाणारी.. मी तीन-साडेतीन वर्षांची असेन, बालवाडीत जाणारी.. बालवाडीच्या दुसऱ्या वर्षाला होते तेव्हा. आमची बालवाडी आणि आमच्या गावातलं महिला मंडळ एकाच छता खाली जमायच.. आणि मग आमचे सामाईक असे सांस्कृतिक कारेक्रम व्हायचे. कोणता दिवस होता बरं तो.. कांदे-नवमी /सरस्वती-पुजन /की नवरात्र.. आता नक्की आठवत नाही ... धुवाधार पाऊस पडत नव्हता.. म्हणजे पावसाळा संपत आलेला.. नवरात्रिचेच दिवस असावेत.. शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा चालू होत्या..

)) नेहमीच ... तुझ्यामुळे ((

लेखक बिनडोक बनी यांनी सोमवार, 04/08/2008 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
तिन्ही त्रिकाळ घेतो चिकार नेहमीच ... तुझ्यामुळे घालतो घोळ पांजरपोळ नेहमीच ... तुझ्यामुळे कानांत धूर डोळ्यांत पूर नेहमीच ... तुझ्यामुळे गाली ठसे (होते हसे!) नेहमीच ... तुझ्यामुळे शब्दांचा जाच शब्दांना जाच नेहमीच ... तुझ्यामुळे पहिली धार चढते फार नेहमीच ... तुझ्यामुळे सोड्याचा वीट घेतोय नीट नेहमीच ... तुझ्यामुळे बनीची भेट विडंबन रेट नेहमीच ... तुझ्यामुळे - बिनडोक बनी
Taxonomy upgrade extras