Skip to main content

एका तळ्यात होती बदके पिले अनेक...

लेखक मृगनयनी यांनी शुक्रवार, 08/08/2008 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
एका तळयात होती बदके पिले अनेक.... मी एक रानफूल.. नि तो राजहंस एक... संगणक शिकण्यासाठी जॉईन केलं 'अपटेक'... होती सुट्टी क्लासला.. म्हणून गुंफिला गजरा सुरेख... सुटे पैसे नव्हते, म्हणून भाजीवाल्याला दिला चेक... पण त्या अडाण्याला, तो वटवण्याची कळली नाही मेख... कशी कळणार त्याला, तो भाजीवालाच होता फेक... जेवायचा नव्हता मूड, म्हणून घेतलं नुसतं मिल्कशेक... सर्विसिंगला गाडी टाकली, कारण फेल होते ब्रेक... आईने दिले देवाचे निर्माल्य, म्हणाली पाण्यात टाक... सापडले एक तळे मजला, म्हणजे विंग्रजी तला लेक... त्याच, एका तळ्यात होती बदके पिले अनेक.... ( 'प्राची' ला 'गच्ची 'जोडण्याचा...एक अंमळ अट्टाहास...) :)
Taxonomy upgrade extras

झटपट घावन

लेखक ऋचा यांनी शुक्रवार, 08/08/2008 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : शीळे/उरलेले वरण किंवा आमटी,डाळीचे पीठ(हरभरा डाळ),तांदु़ळाचे पीठ,तिखट,मीठ. कृती : वरण्/आमटीत तांदु़ळाचे आणि डाळीचे पीठ टाकावे जाडसर भीजवावे . त्यात चवीनुसार मीठ व तिखट घालावे. तव्यावर तेलाचा हात देऊन जाड थापावे. दोन्हीकडुन खरपुस भाजावे. सॉस बरोबर चांगले लागते. टीप : जर वरण असेल नुसते तर मीठ अ तिखट थोडे जास्त घालावे .आमटीत कमी घालावे कारण त्यात मुळचेच मीठ अ तिखट असते.

वृत्ती-प्रवृत्ती..

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 08/08/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग पहिला औरंगाबादमध्ये ऑफिसच्या कामासाठी गेलो होतो. तिथल्या टिव्ही सेंटर नावाच्या भागात होतो. हा भाग मुख्य गावापासून तसा बराच दूर आहे. पुन्हा गावात यायचं होतं. डॉ. आंबेडकर कॉलेजमध्ये काम होतं. जवळच्याच रिक्षा स्टॅंडवर गेलो. तीन-चार जणांच्या कोंडाळ्यातून पन्नाशीच्या वयाचा एक बापुडवाणा चेहरा पुढे आला आणि 'चला साहेब' मी घेऊन जातो म्हणाला. रिक्षात बसलो. रिक्षा आंबेडकर कॉलेजच्या दिशेने निघाली. वाटेत थोडं फार बोलणं झालं, त्यात रिक्षाचालक मुसलमान असल्याचे जाणवले. आंबेडकर कॉलेज म्हणून सुरवातीला या रिक्षावाल्याने चुकून मराठवाडा विद्यापीठात रिक्षा घुसवली. मला आत शिरतानाच जाणवलं काही तरी चुकतंय.

नाट्यगृहातले व्यत्यय : जाणीव आणि सुधारणा

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 08/08/2008 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर ते दीडशे रुपयांची तिकिटे काढून नाटक पहायला आलेल्या प्रेक्षकाची किमान अपेक्षा असते की हे नाटक विनाव्यत्यय पहायला मिळावं... पण तसं फ़ारसं नशिबात नसतं हल्ली... नाटकातल्या व्यत्ययाचे विविध प्रकार : १.खाईखाई सुटलेले प्रेक्षक : पॉपकॉर्न खात सिनेमा पाहणं आणि वेफर्स खात नाटक पाहणं यातला फरक प्रेक्षकांना लक्षात येत नाही... कोणत्याही वेळी खाणं हा हक्क वाटतो प्रेक्षकांना.. वेफ़र्सच्या पिशव्या, त्यांचा आवाज, वेफ़र्स चावताना होणारा कुरूमकुरूम आवाज अगदी लांबवर ऐकू जातो.

नव्हतो ग! मी सजणे असा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 08/08/2008 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी - मजरू) नव्हतो ग! मी सजणे असा केला बदनाम इतरानी जसा दोष तुही दिलास थोडासा गमविला मी जगाचा भरवंसा नव्हतो ग! मी सजणे असा असेल खरे जे दिसले नयनाला सजणे! धोका मिळाला नजरेला किती किती म्हणूनी वाद घातला होता ग! हा इतरांचा दुष्ट फैसला केला बदनाम इतरानी जसा नव्हतो ग! मी सजणे तसा ठोकरूनी तू माझ्या मनाला तोडूनी सजणे! गेलीस प्रीतिला इतर सगळे नाचले ह्या दिवाळीला नव्हतो ग! मी सजणे असा केला बदनाम इतरानी जसा सजणे! नको विचारू ह्या दुखापतीला दोष जखमेचा तुझ्याच आहे हाताला नको विचारू कसले दुःख मनाला दिला ग! इतरानी छ्ळवाद अपुल्याला केला बदनाम इतरानी जसा नव्हतो ग! मी सजणे तसा श्रीकृष्ण सामंत

अगागागागाऽऽगाऽऽऽगा!!!!!

लेखक पिवळा डांबिस यांनी शुक्रवार, 08/08/2008 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
(नाथांच्या "विंचू चावला" वरून सुचलेले हे आम्हां बिचार्‍या......) अनाथांचे भारूड अगगगगागागाऽऽगाऽऽगाऽऽऽ अगगगगगाऽ................... सर्कू चावला! द्येवा रं द्येवाऽऽ................ सर्कू चावला!! आत्ता काय मी करू?....... सर्कू चावला!!! आनि कुनाला सांगू?....... सर्कू चावला!!!! अरं असा रं कसा!.......... सर्कू चावला!!!!!! अग बया बया बया!!..........
Taxonomy upgrade extras

तरुण अभियंत्याची पुण्यात ७ मजल्यावरुन उडी घेउन आत्महत्या...........

लेखक वेताळ यांनी गुरुवार, 07/08/2008 23:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल च्या धकाधकीच्या व स्पर्धात्मक जगात जगताना मनाचा ताण सहन होत नाही,त्यामुळे ह्या अशा घटना घडतात. पैसा हेच खर सर्वस्व आहे का हे नीट उमगत नाही. तो मिळवायच्या मागे धावताना जी दमछाक होते त्यामुळे मनाचा तोल जातो. आजकाल तिशीतच रक्तदाब, ह्रदयरोग होत आहेत. हे नेमके कशामुळे.....विचार करण्याची हिच वेळ आहे. तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या नादात आपण आपली तरुण पिढी कमकुवत करत आहोत का?