भयकथा १ : ऋण
गावाच्या गोष्टींना मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता एक नवीन मालिका सुरु करावीशी वाटली. गावाच्या गोष्टी संपल्या नसून आणखीन अनेक गोष्टी आहेत. यथावकाश प्रकाशित करेन. ह्या आधी भयकथा लिहिल्या नसल्याने हा नवीन प्रयोग करत आहे. नेहमीप्रमाणे चांगले वाईट प्रतिसाद द्यावेत.
भयकथा लिहिणे कठीण गोष्ट आहे. विनोदी लिहिणे किंवा कारुण्यपूर्ण लिहिणे त्यामानाने सोपे, कारण एक चांगला विनोद सर्वानाच विनोदी वाटतो किंवा एखादी दुःखद कथा बहुतेकांच्या हृदयाला स्पर्श करून जाते. पण भयाचे तसे नाही. काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना अंधाराची. काहींना उंचीची भीती वाटते तर काही लोकांना विदूषकाची.
मिसळपाव
सध्या हे प्रवेश द्वार असे दिसते.
मात्र काही बारकावे प्रत्यक्षातील इमारतीशी जुळत नाहीत. उदा. शनिवारवाडा या निळ्या पाटी वरील सज्जातील खालचे १० भाग.