भटकंती बंद काळातली - माथेरान
भटकंती बंद काळातली
मार्च २०२० पासून मुंबईतील लोकल ट्रेनस , बाहेरगावच्या गाड्या आणि पसेंजर ट्रेन्स बंद झाल्याने भटकंती इमारतीच्या गच्चीपुरतीच राहिली होती. फेब्रुवारी १ पासून मुंबईतील लोकल ट्रेनस सर्वसामान्यांसाठी दोन ठराविक वेळांत सुरू झाल्या. मग जवळपासची भटकायची हुकमी जागा माथेरान नक्की केली. दिलेल्या लोकल ट्रेन्सच्या वेळांत जाऊन येणे शक्य झाले. इतर ठिकाणे म्हणजे राजमाची, भिमाशंकर येथेही जाता येईल पण तिथले गाववाले पर्यटकांसाठी तयार आहेत का माहिती नाही. कारने जाणारे कोकणात जाऊ लागले दिवाळीपासूनच. पण कुरबुर सुरू झाली. हे मुंबईतील पाहुणे आले आणि आमच्या गावात करोनाची धाड आली. मात्र माथेरानला तसं नाही कारण हे धार्मिक नसलेले पर्यटन स्थळ आणि इथल्या गावकऱ्यांचा, हॉटेल व्यावसायिकांचा चरितार्थ पर्यटनावरच अवलंबून. ते या म्हणतात.
तर गेल्या दोन महिन्यांत तीन फेऱ्या झाल्या. फक्त अर्धा दिवस. सकाळी सातच्या आतची कर्जत लोकल पकडायची, नेरळला उतरून वर जायचे. ( Taxi rs.100/ seat or rs400 full taxi four passengers. St mini bus rs25/ ticket.) थोडे फिरून एक वाजता निघायचे. चारच्या अगोदरची लोकल ट्रेन पकडून परत.
नेरळ - माथेरान जाणाऱ्या मिनि टॉइ ट्रेनस सर्विस बंद आहे. पण माथेरान ते अमन लॉज ( दस्तुरी taxi stand जवळचे अडीच किमीवरचे स्टेशन या toy train च्या फेऱ्या दर तासाला आहेत. ( rs.45/-)
कारने येणाऱ्यांना आणि वर राहणाऱ्यांना काहीच अडचण नाही.
माझे ट्रेकिंग असल्याने एवढी भटकंती पुरते.
एकूण माथेरानचा टुरिझम धंदा दिवाळीपासून जोरात आहे. हॉटेलवाले, घोडेवाले, माकडे सर्व
खुश आहेत.
एक दमात, एकाच ट्रिपमध्ये सर्व माथेरान पाहायचेच असं ठरवलं नाही तर सुट्टी मजेत नक्की जाते.
माथेरानमध्ये वीसेक व्ह्यु पॉइंट्स आणि दोन बागा आहेत. ते तीन विभागात करता येतील. उत्तर, मध्य आणि दक्षिण भागातले. त्या त्या भागातल्या हॉटेलात राहिल्यास ते सहज पाहून होतात. सर्व प्रवास चालत/घोड्यावर/माणसांनी ओढायची रिक्षाने करावा लागतो. त्यामुळे अती दूरचे व्ह्यु पॉइंट्स पाहायला न जाण्याचे ठरवणे उत्तम. उत्तरेच्या पनोरमा पॉईंटपासून दक्षिणेच्या चौक पॉईंटसचे अंतर नऊ किमी आहे.
तीन विडिओ इथे देत आहे.
१) पनोरमा पॉईंट.
https://youtu.be/3G26irh1EB8
( हा विडिओ एका मिपा दिवाळी अंकात दिला होता.पण ओडियो नंतर चिकटवला होता.)
२)हार्ट पॉईंट
https://youtu.be/g21isqeKQjI
३) मिनी ट्रेन आणि माकडांचे फोटो/ विडिओ काढल्याशिवाय माथेरान ट्रिप उणी.
https://youtu.be/s2Y6ZY6VQhg
-------------
सूचनांचे स्वागत.
व्वा, झकासच कंजूस साहेब !
माहिती बद्दल धन्यवाद
मस्त छोटेखानी भटकंती.
तुमची 'एकला चालो रे' भटकंती नेहमीप्रमाणे छानच
In reply to तुमची 'एकला चालो रे' भटकंती नेहमीप्रमाणे छानच by गोरगावलेकर
भारी किस्सा आहे. त्याकाळी
In reply to भारी किस्सा आहे. त्याकाळी by चौथा कोनाडा
एक नंबर भारी किस्सा.
In reply to भारी किस्सा आहे. त्याकाळी by चौथा कोनाडा
हा हा हा..
In reply to भारी किस्सा आहे. त्याकाळी by चौथा कोनाडा
या वरुन हे वाचलेले आठवले:
In reply to या वरुन हे वाचलेले आठवले: by चौथा कोनाडा
वाह..
In reply to तुमची 'एकला चालो रे' भटकंती नेहमीप्रमाणे छानच by गोरगावलेकर
लग्नानंतर ST ने MTDC माळशेज ला जोडीने गेलो होतो
In reply to लग्नानंतर ST ने MTDC माळशेज ला जोडीने गेलो होतो by विकास...
डावीकडे पहिले तर डोंगर मागे-
अप्रतिम...
पन्नास वर्षांपूर्वी
In reply to पन्नास वर्षांपूर्वी by कंजूस
जुने दिवस भारीच असतात..
वाहं! भटकंतीची हि स्टाईल आवडली.
छान आणि उपयुक्त माहिती, VIDEO पाहतोय