Skip to main content

बाप्पा मोरया..

लेखक स्वाती फडणीस यांनी सोमवार, 08/09/2008 05:01 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया.. . जाळी झाडली.. झाडली.. पुटं काढली.. काढली.. रंग दिला घरा नवा.. या चैतन्य भराया.. या या कौतुक कराया.. या या.. बाप्पा मोरया.. या बाप्पा मोरया.. पाचोळा झाडला.. झाडला.. सडा घातला.. घातला.. रांगोळी घेतली काढायाला.. या रंग भराया.. या या कौतुक कराया.. या या.. बाप्पा मोरया.. या बाप्पा मोरया.. तोरण लावलं.. लावलं.. घर सजलं.. सजलं.. घेतला उत्सव करायाला.. या आनंद भराया.. या या कौतुक कराया.. या या.. बाप्पा मोरया.. या बाप्पा मोरया.. आसन मांडलं.. मांडलं.. आवतान धाडलं.. धाडलं.. मनी करतो सदा धावा.. या लेकरा बघायाला.. या आशीर्वाद द्याया.. या या कौतुक कराया.. या या.. बाप्पा मोरया..
Taxonomy upgrade extras

(म्हातारचळ म्हातारचळ)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 08/09/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
अनिरुद्ध अभ्यंकर 'दूर पळ दूर पण' सांगताना बघितले आणि आमच्या मनात आजूबाजूची वेगवेगळी चळिष्ट चित्रे साकारली! ;) खोकत खोकत पहाता पहाता उठते जेव्हा एक कळ मन माझे म्हणते तेव्हा म्हातार चळ म्हातार चळ एरंडाचं पान माझ्या टाळू वरुन ढळलं नाही काशाची ती वाटी गं उष्मा अंगचा सरला नाही खिडकीमधे आज पुन्हा दिसलं आहे 'मृगजळ' मन माझे म्हणते तेव्हा म्हातार चळ म्हातार चळ समोरच्या घरामधे अशी एक रात्र येईल नजर तेव्हा माझी अगदी पहा धुंद होऊन जाईल वासनेच भूत नुसतं शरिरात नाही बळ मन माझे म्हणते तेव्हा म्हातार चळ म्हातार चळ चतुरंग

बाप्पांची आवडती जास्वंद (प्रकाशचित्रे)

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 07/09/2008 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
गौरी-गणपतीचे दिवस आहेत, बाप्पांच्या भक्तित महाराष्ट्र रंगलाय, सर्वत्र गणेशोस्तवाचे वातावरण आहे त्यानिमित्त गणपतीबाप्पाला प्रिय अशा जास्वंदीची ही काही प्रकाशचित्रे.

दूर पळ दूर पळ

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी रविवार, 07/09/2008 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
खोल खोल आत आत उठते जेव्हा एक कळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ ऍडम आणि ईव्हला टाळू म्हणून टळलं नाही तुझी माझी गत गं त्यांच्याहून वेगळी नाही झाडावरती आज पुन्हा पिकलं आहे एक फळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ कधीसुद्धा संपू नये अशी एक रात्र येईल बुद्धी तेव्हा आपली सारी गलितगात्र होईल वासनेच भूत तेव्हा भावनेला लावेल चळ मन माझे म्हणते तेव्हा दूर पळ दूर पळ -अनिरुद्ध अभ्यंकर

बालपण देगा देवा!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/09/2008 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
"जेव्हा मी वृद्धाश्रमाला भेट दिली त्याची आठवण मी तुम्हाला सांगतो", असं प्रो.देसाई मला तळ्यावर एकदा भेटले त्यावेळी म्हणाले.मी निमूटपणे ऐकण्याचं ठरवलं. प्रो.देसाई आज जरा रंगात आले होते. ते पुढे म्हणाले, "त्या आश्रमाच्या उत्साही संचालकाने आम्हाला माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर येण्याची विनंती केली. एका मोठ्या हॉलमधे, वयाने पंचाहत्तरीच्या आसपास असलेले आजीआजोबा आम्हाला पाहून आमचं स्वागत करण्याच्या इराद्याने धडपडत उभे रहाण्याचे प्रयत्न करताने दिसले. गोंधळलेल्या मनस्थीतीत असलेल्या त्या वयस्कर आजोबाना, "बसा,बसा" असं म्हणण्यापुर्वीच त्यांचं धडपडीचं हे चाललेलं दृश्य पाहून माझी मलाच अत्यंत लाज व

जीवन नुसतं जगु नका!! त्याचा "उत्सव्"साजरा करा!

लेखक येडा खवीस यांनी रविवार, 07/09/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
Life Should not only be lived, It should be celebrated!!! मध्यंतरी नेटवर सर्फ़ करताना अचानकपणे "ओशो"चं हे एक छान सुभाषित दिसलं! किती सुंदर आणि स्पष्टपणे या गुंतागुंतीच्या जीवनाचे "आधारभुत" तत्व त्यांनी नीटसपणे मांडलय ना? आजवरच्या सगळ्या so called established संतांनी आपल्याला जीवनाकडे बघण्याचा "गंभीर" दृष्टीकोन दिला पण, ओशो जीवनाला एक "उत्सव" म्हणुन बघतात. या एकाच वाक्याला अनेक कंगोरे आहेत, हिर्यासारखे अनेक पैलु आहेत आणि कॅलिडोस्कोप सारख्या अनेक सापेक्ष प्रतिमा आहेत.

समुद्रमंथन

लेखक तिमा यांनी रविवार, 07/09/2008 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
ममता, अरुंधती, जयललिता, मायावती, सोनिया, जया, शबाना, सुषमा व तत्सम् स्त्रियांना एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा तुम्हाला मिळाला तर तुम्ही देशप्रेमासाठी काय कराल ?

घावन घाटले

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 07/09/2008 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते.
घाटल्यासाठी:१ वाटी कणिक,१ चमचा तूप,१ वाटी ओल्या नारळाचा चव,३/४वाटी गूळ २ कप दूध+ साधारण १ कप दूध, वेलची+जायफळ स्वादासाठी, बदामतुकडे +बेदाणे सजावटीसाठी घावनासाठी: २ वाट्या तांदूळाचे पीठ+ चवीपुरते मीठ घाटले: कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा. हे घाटले तयार झाले.यातील दू