मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घावन घाटले

स्वाती दिनेश · · पाककृती
गौरीजेवणाला कोकणास्थांकडे घावन घाटले असते.
घाटल्यासाठी:१ वाटी कणिक,१ चमचा तूप,१ वाटी ओल्या नारळाचा चव,३/४वाटी गूळ २ कप दूध+ साधारण १ कप दूध, वेलची+जायफळ स्वादासाठी, बदामतुकडे +बेदाणे सजावटीसाठी घावनासाठी: २ वाट्या तांदूळाचे पीठ+ चवीपुरते मीठ घाटले: कणिक तूपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या,त्यावर खोबरे घालून थोडे अजून भाजा,गूळ घाला आणि थोडे भाजा,दूध घालून चांगले शिजवा.शिजल्यावर त्यात बदाम,वेलची,जायफळ घाला व ढवळा. हे घाटले तयार झाले.यातील दूध लवकर आळते आणि मिश्रण घट्ट होते ,त्यामुळे वाढायच्या आधी १/२ ते १ कप दूध घाला व खिरीसारखे सरसरीत मिश्रण करा.दूध घातल्याने अगोड वाटल्यास थोडी साखर/गूळ घाला.(परंतु गूळ चटकन विरघळत नाही.) घावने: तांदळाची पिठी पाणी व चवीपुरते मीठ घालून घावनाला/धिरड्यांना भिजवतो तसे भिजवा,१०/१५ मिनिटे ठेवा.तवा चांगला तापवून घावने घाला.घाटल्याबरोबर खा.

वाचन 8430 प्रतिक्रिया 0