Skip to main content

प्राजुच्या कल्पनेचा विस्तार !

लेखक संदीप चित्रे यांनी शनिवार, 20/09/2008 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेची पार्श्वभूमी: काल संध्याकाळी प्राजुशी फोनवर बोलताना तिने सहज एक ओळ सांगितली. ती ओळ अशी -- हृदयात सागराच्या फेसाळती लाटा प्राजु म्हणाली, "बघ, तुला ह्या ओळींवर पुढे काही करता येतं का? गझल, कविता काहीही !" नंतर रात्रीपर्यंत हा विषय डोक्यातून निघून गेला होता. असं म्हणतात आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं सुप्त मन जागंच असतं. पहाटे तीन-साडेतीनला झोप चाळवली गेली तेव्हा दुसरी ओळ सुचली. अर्धवट झोप, अर्धवट जाग अशा अवस्थेत कधीतरी डोक्यात बहुतेक कवितेचा आकृतिबंध आला.
Taxonomy upgrade extras

पाणीच पाणी चोहीकडे...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 19/09/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच म.टा. आणि सकाळ मधे वाचले त्याप्रमाणे नाशिकमध्ये महापूर आला आहे आणि पुण्यासकट महाराष्ट्रात इतरत्रही पावसाच्या पाण्याने पूरसदृश्य परीस्थिती झाली आहे... काही ठळक माहीती (वास्तवीक सगळेच ठळक आहे पण...)अशी:
  1. पुराच्या पाण्यामुळे गोदावरीकाठी असलेल्या प्रसिद्‌ध नारोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाली आहे.

ऋषी आणि लांडगा... :)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 19/09/2008 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो, कृपया हे वाचा! वरील दुव्यातली कथा वाचल्यानंतर माझ्या मनात आलेले विचार येथे नोंदवत आहे. आपल्याही मनातले विचार इथे नोंदवून हा धागा अंमळ मजेशीर करा ही विनंती.. :) माझ्या मनातले विचार - १) हा ऋषी चक्क थापा मारतो आहे. "माझ्यावर लांडग्याने उडी मारली तरी मी कसा शूर! अन् मी कसा वाचलो आणि पर्यायाने तो लांडगा माझं काहीच वाकडं करू शकला नाही.." हेच त्या ऋषीला, सॉरी! गोसावड्याला भासवायचं असावं! :) २) जर ही ष्टोरी खरी असेल तर त्या ष्टोरीत लांडग्याच्या ऐवजी एखादा जबरदस्त भुकेला पट्टेरी वाघ असता तर किती बरं झालं असतं!

"हपापाचो माल गपापा"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 19/09/2008 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
ते दूसऱ्या महायुद्धाचे दिवस होते.आपला देश पण त्याने पोळून गेला होता.खायला अन्न नाही तांदूळ, गहू,साखर, केरोसीन सर्व आवश्यक वस्तू रेशनींगवर मिळायच्या आणि जादा हवा असल्यास काळ्या बाजारात मिळायचं.त्याला "ब्लॅक" मधे म्हणण्याचा जास्त प्रघात होता. वेगुर्ला मार्केटच्या समोर एक किराण्या मालाचं दुकान होतं.वखार वजा किराण्या मालाचं ते दुकान होतं.त्या दुकानाच्या मालकाचं नाव होतं दादा कुळकर.आपण त्याना दादा म्हणुया. दादा एक ठुसक्या उंचीची, काळी कुट्ट रंगाची, बेळगावला अशा वर्णनाच्याव्यक्तीला"वड्डर" म्हणून संभोधतील,अशी, आणि कर्कश आवाजाची व्यक्ती होती. दुकानाच्या गल्ल्यावर बसल्यावर पैशाच्या पेटीतल्या मोडीला

(खायचे आहे कुठे?)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 19/09/2008 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'जायचे आहे कुठे?' हा पडलेला प्रश्न बघून, आम्हाला बहुतेक रोज रात्री पडणारा प्रश्न डोळ्यांसमोर न येता तरच नवल! काल रात्री प्रश्न पडला, खायचे आहे कुठे? चापली अंडा-करी, 'संदेश'* तो आहे कुठे?... ओळखीचे भेटले ते लोक सारे हासती ढेरपोट्या कसरतीला चालला आहे कुठे?... सॅलडे तर येत होती, जात होती नेहमी मी म्हणालो, पण मला लाडू बघू आहे कुठे?... दिसत असती तीच ती स्वप्ने मला का सारखी? कोण तो?

माझी सूर्यग्रहणात काढलेली सूर्याची प्रकाशचित्रे

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 19/09/2008 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी काय सकाळी लवकर उठणार्‍या मंडळींपैकी नाही... पण त्या १९ मार्चला ग्रहण दिसणार आणि सूर्य उगवतानाच ग्रहण लागलेले असणार असे काहीसे आदल्या दिवशी वाचलेले होते... लवकर जाग आली आणि खिडकीपुढे जाऊन उभा होतो, सूर्य उगवायचा होता अजून ... आता परत झोपावे की काय अशा विचारात थोडा वेळ आकाशाकडे दुर्लक्ष झालं आणि वर बघतो तो असा तुकडा चावलेला सूर्य दिसला... मला अंदाजच नव्हता की इतका छान आणि ( शीतल..थोडा वेळ का होईना) दिसणार आहे सूर्य ... काही सेकंद डोळे भरून ते दृष्य पाहिलं आणि कॅमेरा आणायला धावलो... हा पहिला फोटो...

लावणी

लेखक अभिजीत मोटे यांनी शुक्रवार, 19/09/2008 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
( चाल : रेशमाच्या रेघांनी ) रेशमच्या बाबांनी, काल लाथा बुक्क्यांनी बाकपुरा आहे, माझा काढिला.. हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| ध्रु || चुक झालि माझी, लाखमोलाची .. विचारंल मि, ही पोरं कोणाची, गं कोनाची विसरंल आहे कोण, आहे कोण जोडिला हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| १ || जात होति वाटेनं ती तोर्यात... अवचीत आला बाप म्होर्यात, गं म्होर्यात आणी माझ्या नरडीला, धरुनिया ओढीला हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| २ || भीड नाही केली, आल्यागेल्याची.... मागितली माफी मी त्या मेल्याची, गं मेल्याचि म्हणेन मी आता ताई, तुमच्या या घोडीला हात नगा लावू माझ्या बौडिला.........|| ३ || (सदर विडंबनाच्
Taxonomy upgrade extras

पुरस्कार (लघुकथा )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 19/09/2008 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
'दुहेरी फायदा' ही लघुकथा आवडल्या बद्दल धन्यवाद !! ------------------------------------------------------------------------- पुरस्कार पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या हॉटेलातून चहा आणि गरमागरम भजी आणली आणि चहा बरोबर तो भजी खाऊ लागला.
Taxonomy upgrade extras

मन

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 19/09/2008 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
सुविचारांचे मार्ग सोडूनी अगतिक झालो, बोलबोललो अर्थ सोडला मग शब्दांनी शब्द नव्हे 'ते मन अज्ञानी' न जाणता बोलून गेलो पश्चातापी जळू लागलो कां बोललो? ऐसे झाले मनामधे मग विचार आले कोठून झाली बुध्दी ऐसी ? क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ? कां जाहलो वेडे आपण ? कां विसरूनी गेलो माझे 'मी पण '? पण हे . . . . असेच घडायचे होते दैवाचे फासे उलटे जीवनाच्या वाटेवरती अ र्ध्यात हरवले नाते.
Taxonomy upgrade extras