अनुवाद मदत हवी आहे.
नमस्कार,
लोकायत.कॉम हे मराठीतून संगणक तंत्रज्ञान विषयक लेखन करण्यासाठीचं संकेतस्थळ आहे हे आपणा सर्वांना माहितीच आहे. सध्या या संकेतस्थळावर वेगवेगळ्या विषयावर लेख लिहीने चाललेले आहे.
यापैकी एक लेखमाला आहे मुक्तस्रोत सॉफ्टवेअर्स बद्दल. मुख्यतः लिनक्स विषयी मराठीतून तपशीलवार माहिती देण्याचा विचार आहे. हे करतांना एक अडचण जाणवली , ती म्हणजे या मुक्तस्रोत चळवळीचं सार सांगणार्या यांच्या परवाण्याचं मराठी भाषांतर उपलब्ध नाही आहे. मी लिनक्स कसं वापरावं याबद्दल लिहू शकतो मात्र या कायदेशीर परवाण्याचं मराठी भाषांतर करणं मला कठीण आहे.
मिसळपाव