Skip to main content

देवनागरी सुलेखन

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 26/09/2008 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
येथे काही कॅलिग्राफीचे नमुने देत आहे. हा अष्टाध्यायीचा सुरुवातीचा भाग. aShTAdhyAyI हा लिहिताना मला माहीत नव्हते की देवनागरी लिपी लिहिताना बोरूचा कोन रोमन लिपीपेक्षा वेगळा असतो. (ज्यांना कळते त्यांना काही अक्षरे लिहिताना उडालेली त्रेधा आणि त्यांच्यातला बेढबपणा जाणवेल - गंमत वाटली म्हणजे झाले...) हा धातुपाठातला एक धातू.

ह्याव ए नाईस डे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 26/09/2008 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
"मला खरंच उभं आयुष्य खर्चून सुद्धा फक्त एखादा दिवस इतका चांगला असू शकतो हे शिकायला मिळालं" असं विरेन मला ज्यावेळेला मी त्याच्या घरी तो एकाएकी आजारी झाल्याचे कळल्यावर भेटायला गेलो तेंव्हा सांगत होता. विरेन माझ्या मित्राचा मोठा मुलगा.त्याचे वडिल -माझा मित्र-तो संगीततज्ञ माणूस. तो मराठी सिनेमात खूपदा पार्श्वसंगीत द्दायचा.त्याचा वाद्दवृंद पण होता.

सोलापुर- छायाचित्रे

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 25/09/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मी मध्यंतरी सोलापुरला जाउन आलो. तिथे फिरायला जाण्यासारख एकच ठिकाण आहे. ते म्हणजे सिद्धेश्वर मंदीर. ह्या मंदीराची खासियत म्हणजे हे एका तलावाच्या मध्येच आहे. :) चारी बाजुनी पाणी आणि मध्येच मंदीर. एकदम मस्त वाटत. ही मी काढलेली तिथली काही प्रकाशचित्रे. हा त्या तलावाचा एक व्ह्यु. ह्या तलावात आधी मासे देखील दिसायचे बरेच. आता दिसत नाहीत. बहुद्धा जाळ टाकुन पकडतात. :( हा त्या मंदीरात जायचा रस्ता.

चतुर- प्रकाशचित्र समीक्षा

लेखक झकासराव यांनी गुरुवार, 25/09/2008 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मी मध्यंतरी कोल्हापुर सोलापुर असा दौरा करुन आलो. त्यावेळी सोलापुरात भरपुर चतुर दिसले होते. त्यांचे फोटो काढणे हे अम्मंळ कठीण काम. ते एका जागी स्थिर नसतात. पण एक चतुर घराबाहेरच्या जास्वंदीच्या पानावर विश्रांती घेत असल्याचे दिसले. म्हणुन मी हा फोटो काढला. मला फोकल लेन्थचा फन्डा अजुन कळालेला नाहिये. फोटो काढताना फोकल लेन्थ कशी कळेल??? त्यामुळे हा फोकसिन्गचा त्रास होतोय की मला अजुन माझ्या कॅमेर्‍यातील मॅन्युअल फोकसीन्गची व्यवस्था कळाली नाही हेच समजत नाही.

स्मार्ट रेस

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 25/09/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
It has been observed that a newborn baby's response to the stimulus provided by the environment has been increasing in leaps and bounds i.e. in the time frame from prenatal stage to neonatal stage, the feotus and later a newborn is receiving various enhansed stimulus that will impact his/her future response in the out side world . The other question yet to be answered properly is the impact of stress the modern would be mother undergoes during pregnancy and its long term impact on psyche of the child. Doctorate in Child Development केलेल्या विदूषी चे उद्गार आहेत हे माझ्या प्रष्नाला.

एका लग्नाची गोष्ट!

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 25/09/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न! दाराशी केळीचे खुंट,आंब्याचे टहाळे आणि झेंडूच्या फुलांची तोरणं,पैठण्यांची सळसळ, अत्तराचा दरवळ, करवल्यांचे मिरवणे,भटजींची बोहल्यावरची लगबग, "आता मुलीला आणा... मुलीचा मामा कुठे आहे? " अक्षता, मंगलाष्टका आणि 'तदेव लग्नं..' झालं की 'वाजवा रे वाजवा..' चा इशारा! होमाचा धूर,सप्तपदी, ते ४,५ दा साड्या बदलणे,विहिणींच्या ओट्या, मानपान, रुसवेफुगवे, व्याही भेटी, पंगतीतला आग्रह, जिलेब्यांची ताटे आणि संध्याकाळचे आईसक्रीम! असं किवा यातलं कोणतंच दृश्य जरी मानहाईमच्या चर्च च्या दाराशी अपेक्षित नव्हतं तरी इतकी सामसूम सुद्धा अपेक्षित नव्हती.३ चा मुहुर्त आणि आम्ही २.३० ला तिथे पोहोचलो म्हणजे वेळेतच होतो.

लेकरू

लेखक स्वाती फडणीस यांनी गुरुवार, 25/09/2008 16:50 या दिवशी प्रकाशित केले.
लेकरू ======================== ती इतकी निरागस! ती इतकी सुंदर! ती इतकी बोलकी! ती इतकी चंचल! तिच ते खट्याळ हसणं, तिच ते सशावाणी उड्या मारणं, तिच ते फुलपाखरा सारखं कुणाही भोवती भिरभिरणं. तिचं आई बरोबर बोट धरून फिरणं.. तिच देवळात तल्लीन होवून डोलणं.. तिच कुणाला ही आपलंसं करणं... तिच कुणात ही मिसळून जाणं... तिच माझ्या दिशेनं धावत येणं.. माझं घाबरत पुढे सरकणं तिच्या आईच्या डोळ्यात डोकावणारी उदास खंत एकदा बोलली ती माझ्याशी... आता मी आहे. पण माझ्या पुढं? चाळीस पंचेचाळिशीचं लेकरू सांभाळू तरी कसं!! ======================== स्वाती फडणीस ................... ११-०३-२००८
Taxonomy upgrade extras

सिनेमा पॅराडिसो.. काही प्रकाशचित्रे

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 25/09/2008 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पॅराडिसो ... इटालियन फ़िल्म... १९९० चे बेस्ट फॉरीन फ़िल्मचे ऑस्कर घेतले या फ़िल्मने... अप्रतिम सिनेमा आहे. जरूर बघा... या फ़िल्मचे काही कॅप्चर्स मी काढले आहेत आणि मी स्वतः मिक्स करून काही फोटो तयार केले आहेत ते इथे डकवतोय....त्यामुळे हा धागा कलादालनात टाकला आहे ... साल्वाटोर नावाचा इटलीतला मोठा सिनेदिग्दर्शक .....३० वर्षांनी तो गावात पुन्हा परतला आहे... त्याच्या लहानपणाची, सिनेमा शिकण्याची, घडण्याची फ़्लॆशबॆक तंत्राने सांगितलेली ही गोष्ट आहे...

ओट फ्लेक्सची बिस्किटे

लेखक स्वाती दिनेश यांनी गुरुवार, 25/09/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - २५० ग्राम ओट फ्लेक्स,२०० ग्राम बटर,१२५ ग्राम साखर, १२५ ग्राम मैदा,२ टीस्पून बेकिंग पावडर,१ अंडे,१चिमूट मीठ वॅनिला अर्क १.५ चमचा कृती - मैदा+बेकिंग पावडर+१ चिमूट मीठ एकत्र करणे.बटर गरम करम करणे,त्यात हा बे.पा.+मीठ घातलेला मैदा घालणे, ओटफ्लेक्स घालणे,अंडे फोडून घालणे,वॅनिला अर्क व साखर घालणे व सगळे मिश्रण एकत्र करणे‌. बेकिंग ट्रे मध्ये बेकिंग पेपर ठेवणे.एका टेबलस्पूनमध्ये जेवढे मिश्रण येईल तेवढे एका बिस्किटासाठी बेकिंगपेपरवर स