Skip to main content

ICICI Bank ???

लेखक छोटु यांनी मंगळवार, 30/09/2008 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा करां चा सल्ला हवा आहे !! काल पासुन असे एकण्यात येत आहे की ICICI या बॅंके मधे Money सुरशित नाहीय !! तुमचा सल्ला हवा आहे कारण माझी खुप गुंतवणूक काही आहे ICICI बॅंके मधे !!! मिपा चा छोटू !! [( [( [(

मातृमांगल्याचा महामहोत्सव.

लेखक कलंत्री यांनी मंगळवार, 30/09/2008 08:02 या दिवशी प्रकाशित केले.
मातृमांगल्याचा महामहोत्सव आणि महाराष्ट्र्शारदेच्या चरणी एक छोटेसे कमळ.
आजपासून महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभर मातृमांगल्याचा महामहोत्सव सुरु होत आहे. त्याचा सुंदर आढावा भाग्यश्री ताईंनी "आठवणीतलं नवरात्र" या लेखात घेतला आहेच. कृषी संस्कृती, मातृशक्ती आणि विद्याकलांची अधिष्ठात्री महासरस्वती यांच्या पूजनाचा त्रिवेणी संगम म्हणजे "शारदीय महोत्सव' आहे. आई जगदंबा भवानी ही अनेक प्रेरणांची स्त्रोत आहे. या अनेकविध प्रेरणेत शौर्य,शांती, भक्ति, बुद्धी, लेखन, कला इत्यादीचा समावेश होत असतो.

भेसूर रात्र (आणि आस्वाद)

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 30/09/2008 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
भेसूर रात्र (आणि आस्वाद) काल अचानक मी बसलो उठून रात्री लक्षात आले मजला अमावस्या ती सर्वपित्री कुठलेच नव्हते आवाज कुठलाच रव नाही थरथरत्या फांद्या अन् झाडाला झोप नाही पिंपळावरील मुंजा हसतो भेसूर तेव्हा सळसळत्या पानांचा उच्चार अस्फुट होई भुंकती मध्येच तेव्हा रस्त्यावरील कुत्री ऐकण्यासाठी त्यांना कानांची लक्तरे उरली ... १. वरील कविता अक्षरगणवृत्तात आहे की मात्रावृत्तात की मुक्तछंदात यावर प्रकाश टाकावा ही विनंती. २. कवितेचा नक्की आशय काय असे कुणी विचारल्यास आम्ही पानभर लिहायला तयार आहोत. ३. या कवितेत लपलेला सामाजिक आशय सापडला का?

नारळाच्या वड्या

लेखक शाल्मली यांनी मंगळवार, 30/09/2008 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
नारळाच्या वड्या साहित्य :- एका नारळाचा चव जेवढा चव आहे तेवढी साखर २ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून व साले काढून) थोडी वेलची पूड थोडी जायफळ पूड एका ताटाला तूप लाऊन तयार ठेवावे. कृती :- बटाटे कुस्करुन एकजीव करुन घ्यावेत. एका कढईमध्ये नारळाचा चव, साखर व कुस्करलेले बटाटे घेउन, मध्यम आचेवर ठेवावे.

दिड दिवस सुर्य....!!!

लेखक चिऊताई यांनी मंगळवार, 30/09/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी असे ऐकले आहे कि १७ ऑ़क्टोबर २००८ रोजी सुर्य ३६ तास म्हणजे दिड दिवस आकशात दिसणार आहे, हे खर आहे का?

"मी" माझ्या शरीरापेक्षा भव्य आहे.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 29/09/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं असं झालं,नलू प्रधान मला अचानक खूप दिवसानी एका समारंभात भेटली.तिची आणि माझी लहानपणची ओळख.ती आणि तिचे आईवडील आणि तिची आजी आमच्या शेजारी राहायची. श्री.वा.य.प्रधान एअर लाइन्स मधे पायलट होते.काही दिवसाने त्यांचं कॅनडात मॉन्ट्रीयल इथे पोस्टींग झालं.नलू त्यावेळी सहा वर्षाची होती.नलू तशी दिसायला खूपच क्युट होती.पण बिचारी एक हाताने अपंग होती.आता मला ती भेटली तेव्हा ती मोठी बाई झाली होती.तिला दोन मुलं होती.तिचा पती फॉरेनर आहे.एका चांगल्या कंपनीत व्ही.पी.

सौभाग्याचे रंग-सौरंगी

लेखक रामदास यांनी सोमवार, 29/09/2008 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
दोन आठवड्यापूर्वी सकाळी हिंदुस्थान टाईम्सची कॅफे पुरवणी चाळत असताना जहांगीर आर्ट गॅलरीतल्या एका चित्र प्रदर्शनाचा फोटो पाहीला. फोटो पाहिल्यावर मी मंत्रमुग्ध झालो.पाच दहा मिनीटं माझ्या डोळ्यासमोर रंगपट उलगडत गेला. तपशील वाचल्यावर कळलं की ही चित्रं प्रदर्शनाचं नाव सौरंगी आहे आणि कलाकाराचं नाव आहे शंकर देवरुखे. त्या चित्राची मोहीनी एव्हढी जबरदस्त होती की त्या दिवशीचे बाकी सर्व कार्यक्रम रद्द करून मी जहांगीर आर्ट गॅलरीकडे पळत सुटलो. मनात अनेक शंका होत्या. आर्टीस्ट भेटेल का? आपण जर दाद दिली तर ऍकनॉलेज करेल का? जहांगीरच्या प्रदर्शनाची एक खासीयत असते. आर्टीस्ट फार व्यस्त असतो.

बंदिनी

लेखक जयवी यांनी सोमवार, 29/09/2008 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मजात लाभली बंधने जगातली कुशीत जरी पहुडली कोवळी कुमुदिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी तरुणाई चिवचिवते स्वप्नी पंख पसरते जनकाच्या परी सदनी पराधीन नंदिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी सप्तपदी चालता जोडवी हासती नजरकैद कुंकाची असून हृदयस्वामिनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी सांजकाली जीवनी पुत्र सुकाणू धरी पुनश्च वाट चालते पायी बेडी घालुनी ती एक बंदिनी, ती एक बंदिनी जयश्री
Taxonomy upgrade extras

एवढंसं आभाळ

लेखक जयवी यांनी सोमवार, 29/09/2008 19:15 या दिवशी प्रकाशित केले.
कालच झी टिव्ही वर "एवढंसं आभाळ" हा सिनेमा बघितला. दिग्दर्शकानं फार सुरेख हाताळलाय हा नाजूक विषय. प्रतिक्षा लोणकर, आनंद शिंदे आणि ऋत्विक नाडकर्णी ह्यांच्या नैसर्गिक अभिनयाने अधिकच वास्तविक सुद्धा वाटतो. आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणजे नक्की काय झालंय हे सुद्धा न कळण्याइतका भाबडा मुलगा....जेव्हा ते सगळं आपल्या कुवतीप्रमाणे समजून घ्यायचा प्रयत्न करतो... तेव्हा त्याची होणारी चिडचिड, सोबत आई-वडिलांची अगतिकता....... आणि मग अचानक त्याला मिळालेला मार्ग... असं काहिसं कथानक. प्रत्येक छोट्‍या मुलाचं आभाळ त्याच्या आई-वडिलांच्या आभाळातच असतं.....आणि तो तेच आभाळ आपलं समजत असतो.

स्वप्नसुंदरी

लेखक अनिरुद्धशेटे यांनी सोमवार, 29/09/2008 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नसुंदरी हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा भरला होता, तोच हात मेंदीने, तेव्हा रंगला होता ! नथनीचा तुझा त्यावेळी डौलच न्यारा होता, गालावरील लालीचा रंग लाजरा होता! डोळ्यांमध्ये निरागसता पराकोटीची जपलेली, गोष्ट माझ्या प्रेमाची तव ओठी लपलेली ! वाळवंटातही कोठेतरी हिरवळ थोडी असावी रखरखत्या या जीवनात माझ्या सावली तुझी मिळावी ! अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras