Skip to main content

सचिनचे अभिनंदन !!

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 17/10/2008 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
सचिनचे अभिनंदन !! कसोटी क्रिकेट मधे सर्वाधीक धावांचा ब्रायन लाराचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिनने आज आपल्या नावावर केला आहे. मोहालीत आज आपल्या १५२ व्या कसोटी सामन्यात खेळताना सचिनने सर्वोच्च धावसंख्या केली . यावेळी प्रतिस्पर्धी संघ ऑस्ट्रेलिया असणे ही पण एक विशेष गोष्ट. सचिनचे अभिनंदन तसेच या कसोटीत शतक झळकवण्यासाठी त्याला शुभेच्छा !!

ती येण्याची चाहूल लागली

लेखक धुमधडाका यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
थवे फ़ुलले पक्ष्यांची शाळा भरली संध्याकाळ बासरीने गुणगुणली मला ती येण्याची चाहूल लागली पाणी बेभान थिरकले डोंगर संधीप्रकाशाने उजळले दिवसाची घालमेल थबकली मला ती येण्याची चाहूल लागली सृष्टी चैतन्यात चिमुकली झाली अंबरात सांज ऊतू गेली पायवाटांत ओढ भिरभिरली मला ती येण्याची चाहूल लागली मेघ रेशमी गारव्याच्या अंथरुणात उतरले डोळे संध्येच्या पंखांनी झाकले अरुणाने रात्रीला हाक दिली . मला ती येण्याची चाहूल लागली !!!! मला ती येण्याची चाहूल लागली !!!! ---हे वाचलेलं आवडलं अशी जर खरचं आली तर स्वागत करीन धुमधडाक्यात
Taxonomy upgrade extras

सेन्सेक्स १०,००० च्या खाली

लेखक सागर यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
सेन्सेक्स १०,००० च्या खाली शेवटी ज्या गोष्टीची भिती होती तेच झाले. सेन्सेक्स आज बंद कदाचित १०,००० च्या वर होईलही. पण आज सेन्सेक्स ने १०,००० च्या खाली बुडी मारली .आत्त्ता मी पाहीले तेव्हा सेन्सेक्स (९९४१) वर होता. काल जगात सगळीकडेच शेअरबाजारांनी दाखवलेली निराशा आपल्या बाजाराने दाखवली नाही तर नवलच. गुंतवणुकदारांनी काय करावे? हा खूप मोठा प्रश्न पडला असेन. मागच्या आठवड्यातच मी म्हटले होते की सेन्सेक्स १०,००० च्या खाली येण्याचे स्पष्ट संकेत असतानाही सेन्सेक्स लगेच ह्या मर्यादेच्या खाली जाणार नाही.

नाट्यसंगीत

लेखक mina यांनी शुक्रवार, 17/10/2008 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
किती सांगुं तुला..... गीत-अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत-अण्णासाहेब किर्लोस्कर स्वर-बालगंधर्व नाटक-संगीत सौभद्र (१८८२) राग-आनंद भैरवी (मूळ संहिता) ताल-धुमाळी मिपाच्या या धोरणानुसार लेखन संपादित केले आहे... आणिबाणीचा शासनकर्ता.
Taxonomy upgrade extras

भाव (रणजित देसाई यांच्या 'आलेख' या ग्रामीण कथा संग्रहातील कथा)

लेखक mina यांनी शुक्रवार, 17/10/2008 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
येथील लेखन काढून टाकलेले आहे. कृपया हे वाचा व यापुढे सहकार्य करा अशी कळकळीची विनंती... --आणिबाणीचा शासनकर्ता.

खिडकी

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 17/10/2008 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्ही काही काळजी करू नका. दिवसाचा तर प्रवास आहे. पोहोचल्यावर लगेच फ़ोन करतेच मी तुम्हाला." गाडी सुटता सुटता अनुराधाने पुन्हा एकदा सुभाषला सांगीतले. वेग घेणाऱ्या गाडीबरोबर धावणारा सुभाष तिला आणि सोनुला हात हलवून निरोप घेता घेता दिसेनासा झाला. त्याबरोबर आणखी वेळ न दवडता शेजारी बसलेल्या बाईने लगेच सोनुकडून आपली खिडकीची जागा मागून घेतली. मस्तपैकी मांडी घालून कोपऱ्याला रेलून तिने मासीकात डोके खुपसले. सोनुने नाराज होऊन आईच्या बाजुची आपल्या जागेवर टेकल्यासारखे केले. त्या लठ्ठ खवीस बाई शेजारी बसण्याची तिची मुळीच इच्छा नव्हती. जरी खिडकीच्या बाहेरचे तिथून चांगले दिसले असते तरी!

करवा चौथ व हिंदी मालिका, सिनेमा

लेखक नितीनमहाजन यांनी शुक्रवार, 17/10/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आज करवा चौथ आहे. अश्वीन महिन्यातील संकश्टी चतुर्थी म्हणजे करवा चौथ. समस्त उत्तर भारतात अतीशय श्रध्देने साजरा होणारा सण. कोणी जाणकार या करवा चौथ बद्दल अधिक माहिती देईल काय? सर्व हिंदी मालिका, सिनेमांमध्ये हा सण अतीशय विस्ताराने दाखविला जातो. घरातील सुवाशीण दिवसभर उपवास करून रात्री आपल्या पतीदेवासह चंद्र दर्शन घेतल्याशिवाय अन्न भक्षण करीत नाही.

श्री. राज ठाकरे - एक जेट विजय - एक चिंतन

लेखक श्री यांनी शुक्रवार, 17/10/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
जेट एअरवेजने परवाच्या दिवशी घेतलेला ८०० कामगार कपातीचा निर्णय काल रात्री मागे घेतला. जेट व्यवस्थापनाने परवा तडकाफडकी ८०० कामगारांना काढण्याचा निर्णय घेतला. बहुतेक कामगार प्रोबेशन पिरियड वर होते, त्या सर्व कामगारांनी श्री. राज ठाकरेंन कडे धाव घेतली. मुंबईत श्री. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसा निमीत्त बडे - बडे नेते उपस्थित होते, तरीहि जेट कामगारांनि श्री. राज ठाकरेंची भेट घेतली. राज यांनी जेट व्यवस्थापनाला जाहीर ईशारा दीला. म.न.से. चे शिष्टमंडळ काल जेट व्यवस्थापनाला भेटले त्यावर त्यानी २ दिंवसांची मुदत मागितली. त्या नंतर काल रात्री जेट एम. डी. श्री.

संस्कृत ही मृत भाषा समजावी काय?

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 17/10/2008 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील.. १) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर. २) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी. ३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी.. या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला संस्कृत भाषा मला कुठेच दिसत नाही... या बाबतीत वरील मुद्द्यांचा खालीलप्रमाणे उहापोह करता येईल.. १) आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे.

इंदौर...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 17/10/2008 03:02 या दिवशी प्रकाशित केले.
खोबार सारखं इंदौर पण आमच्यामनातला एक कोपरा अडवून बसलं आहे. लहानपणी इंदौरला जायचा / राहायचा खूप योग आला. १९८३ साली एक दिवस बाबा संध्याकाळी घरी आले ते ही बातमी घेऊनच की त्यांची बदली इंदौरला झाली आहे आणि आई बाबा आणि माझी ताई असे इंदौरला जाणार. माझे शिक्षणाचे महत्वाचे वर्ष असल्याने मी काही जाणार नव्हतो. मला फक्त दिवाळीच्या सुट्टीत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत इंदौरला जायला मिळणार होतं. त्यानिमित्ताने, इंदौरला भरपूर येणंजाणं झालं. तो पर्यंत मुंबई एके मुंबई करणार्‍या आम्हाला इंदौर एक स्वर्गच वाटायला लागला होता. माझ्या (किंबहुना आमच्या सर्वांच्याच) आयुष्यातला तो एक खूपच सुंदर काळ आहे.