संस्कृत ही मृत भाषा समजावी काय?
In reply to जी भाषा by विजुभाऊ
In reply to त्या by विसोबा खेचर
In reply to सहमत by वैशाली हसमनीस
In reply to तिच्या by विसोबा खेचर
In reply to तात्यानु, व by घाटावरचे भट
In reply to अहो पण by विसोबा खेचर
In reply to तिच्या by विसोबा खेचर
In reply to तिला वाचवायला आधी आम्हाला ती समजायला नको का? by महेश हतोळकर
In reply to तिच्या by विसोबा खेचर
In reply to मृत नाही अर्धमेली by अभिरत भिरभि-या
In reply to मुक्तसंगः by वारकरि रशियात
In reply to मुक्तसंगः by वारकरि रशियात
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
In reply to वावॅ ! जबरा by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
In reply to सरल सुबोधा विश्वमनोद्या नैव क्लिष्टा न च कठिणा ! by उर्मिला००
In reply to चांगला विषय :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजूनही शक्य आहे. by कलंत्री
In reply to सहमत by मुक्तसुनीत
In reply to सहमत by मुक्तसुनीत
In reply to मदत by विनायक प्रभू
In reply to मला संस्कृत थोडेफार येते. by प्रमोद देव
In reply to मला संस्कृत थोडेफार येते. by प्रमोद देव
In reply to सहमत पण भाकड प्रश्न by धनंजय
In reply to बहुतेक होत by विसोबा खेचर
आपण माझा मूळ चर्चाप्रस्ताव नीटसा वाचलेला दिसत नाही. आज मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, इत्यादी भारतीय भाषांमध्ये जशी सर्रास नवनिर्मिती होते तशी संकृतमध्ये का होत नाही हा माझा प्रश्न आहे! जमल्यास त्याचे उत्तर द्या..सर्रास म्हणजे किती? महाराष्ट्रात आदिवासींच्या ठाकर, गोंड, कोर्कू वगैरे भाषा आहेत. त्यांच्यात सर्रास नवनिर्मिती होते का? बहुधा वरील भाषांइतकी (म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या इतकी) नाही. त्या भाषांना मृत म्हणून कोणाला तरी हिणवण्यापेक्षा अधिक काय साध्य होते आहे? अगदी म्हणा, अहिराणीसारख्या गोड बोलीत "सर्रास" नवनिर्मिती होते आहे काय? बहिणाबाईंच्या कवितांच्या नंतर किती पुस्तकांची नावे लिहिता येतील? आता तुम्ही जर म्हटले, की संस्कृत, अहिराणी, ठाकर, कोर्कू भाषा १ लाखापेक्षा अधिक लोक व्यवहारासाठी वापरतात का (मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या इतकी म्हणजे कोट्यवधी लोक लागतील)? उत्तर : नाही. (मठूरमध्ये थोडेसेच लोक असतील - पण कुठल्याही ठाकर खेड्यापेक्षा खूप अधिक. मुंबईपेक्षा मठूरमध्ये आणि ठाकरांच्या खेड्यामध्ये - दोन्हीकडे कमी लोकसंख्या असेल.) संस्कृत, अहिराणी, ठाकर, कोर्कू भाषा १ हजारापेक्षा अधिक लोक नवनिर्मिती करतात का (मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या इतकी म्हणजे लक्षावधी लोक लागतील)? यांच्यात दिवाळी अंक निघू शकतात का? उत्तर : संस्कृतमध्ये - होय, पण लेखनाचा दर्जा निकृष्ट आहे. बाकीच्यांमध्ये बहुधा नाही. असे म्हणून अहिराणी, ठाकर, गोंड, कोर्कू भाषांना हिणवण्यापेक्षा अधिक काय साध्य होते? - - - - तुम्ही विचारता :
त्या आज त्या प्रदेशांत प्रचलित नाहीत -... देअर यू आर..! का नाहीत हे सांगू शकाल काय?तुमचे अन्य प्रतिसाद वाचून असे दिसते की तुम्ही ज्ञानेश्वरीतील भाषेला आणि आजच्या नेवाशातील भाषेला एकच मानता - कारण भाषा प्रवाही असते. हे असे तुमचे मत असेल, तर ज्ञानेश्वराच्या आणि कालिदासाच्या भाषेला एकच मानायला काही हरकत नाही (कालिदास संस्कृत आणि प्राकृत मिसळून लिहीत असे.) आणि कालिदासाची भाषा आणि महाभारताची भाषा एकच म्हणायला हरकत नाही. तुमच्याच मताने ज्ञानेश्वरांची भाषा->प्रवाहाने->तुमची-आमची भाषा असे असेल, म्हणा. तर तुम्ही प्रवाही संस्कृत भाषाच बोलत/लिहीत आहात. (रामायणातली प्रवाही बोली -> कालिदासाची प्रवाही बोली -> महाराष्ट्रातील प्रवाही बोली -> ज्ञानेश्वरांची प्रवाही बोली -> मराठेशाहीची प्रवाही बोली -> आधुनिक ठाण्याची प्रवाही बोली). हे "पूर्वीच्या बोली आजकाल का प्रचलित नाहीत?" याचे उत्तर आहे. "पूर्वीच्या बोली" या आज कधीच प्रचलित नसतात. आज कित्येक मराठी लोकांना ज्ञानेश्वरी वाचून अर्थ लागत नाही. ज्ञानेश्वरांच्या वेळेला कित्येक मराठी लोकांना गीता वाचून अर्थ लागत नसे - हा सगळा एकच लांबलचक प्रवाह आहे. ज्ञानेश्वरांची भाषा जिवंत आणि कालिदासाची मृत म्हणण्याने काहीही हशील नाही. ज्ञानेश्वर तरी बरे - शब्द अर्धे-अधिक समजतात. महानुभावांची भाषा मला तर अर्ध्याहून अधिक समजत नाही! तर ती जिवंत म्हणायची की मृत? - - - ते तुमचे श्रद्धा वगैरे बद्दल विचार काय आहेत? मागे तुम्ही म्हणालात की तुमची हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि वैद्यकाबद्दल "गुरूंनी/डॉक्टरांनी सांगितले म्हणून" श्रद्धा आहे. मी तुमचे म्हणणे वैयक्तिकरीत्या मानले होते - असे काही मानायला मी तयार असतो, याचा पुरावा घ्या. मी स्वतः संस्कृत व्यवहारासाठी वापरत नसलो, तरी जर मला कोणी सांगितले, की ते लोक गुरूने सांगितल्यामुळे गुरूने शिकवलेले संस्कृत वापरतात, तर मी तितपत तरी मान्य करावे, नाही का? - - - मी तुमच्या लेखाशी बरीच सहमती दाखवली हे पुन्हा लक्षात आणून देतो. संस्कृत भाषेचा व्यवहारातला अल्प उपयोग बघता शिक्षणखात्याने त्याच्यावर त्या प्रमाणात खर्च करावा असे माझे मत आहे. (म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ, तेलूगू, बंगाली, वगैरेंच्या पेक्षा पुष्कळ कमी.) त्याच प्रकारे "सश्रद्ध पण सबळ प्रमाण नसलेल्या डॉक्टरकी"वर आरोग्य मंत्रालयाने फारच कमी प्रमाणात खर्च करावा असे माझे मत आहे. पण व्यक्ती म्हणून तुम्ही "डॉक्टराला हातगुण असतो" यावर श्रद्धा ठेवा की "आपण संस्कृत बोलतो" यावर. माझे काही म्हणणे नाही. ती तुमच्या श्रद्धेबद्दल वस्तुस्थिती असे मानायला मी तयार आहे.
वस्तुस्थिती मान्य न करता, काहितरी शाब्दिक शब्दच्छल करून मूळ प्रश्नाला पळवाट काढण्याच्या तुमच्या कसबाचे मी पुन्हा एकदा कौतुक करीन..!ठीक. मी मिसळपावावर मान्य करतो की कोणीही "आपण संस्कृत बोलतो" अशी श्रद्धा ठेवू नये. तुम्ही उलट मान्य करा की कोणीही "आपल्या डॉक्टराला हातगुण आहे" अशी श्रद्धा ठेवू नये. बघा - मिसळपावापुरती तरी मी खुद्द पळवाट बंद करून घेतली आहे. (मिसळपावाबाहेरच्या आयुष्यात मात्र "अमुक भाषा मृत आहे" असे मी म्हणणार नाही. फारतर "अमुक भाषेवर सरकारी पैसे खर्च करताना व्यवहारातील फायदे-तोटे बघा" एवढेच म्हणेन. वैयक्तिक पैसे कोणी कितीही खर्च करावेत - मला त्याचे काही नाही.)
In reply to सर्रास म्हणजे किती? by धनंजय
In reply to सर्रास by विसोबा खेचर
मुद्दा असा आहे की आज मराठी, हिंदी, इंग्रजी इत्यादी भाषांमध्ये विपूल लेखन होते, चित्रपट, नाटकाची नवनिर्मिती होते तशी संस्कृतमध्ये होतांना दिसत नाही! ... ठाकर, गोंड, कोर्कू या भाषा जिवंत आहेत किंवा नाही हे मला माहीत नाही. तसेच अश्या इतरही अनेक भाषा असतील! माझा चर्चाप्रस्ताव संस्कृत भाषेशी निगडित आहे!आता असे वाचा : मराठी, हिंदी इंग्रजी भाषांमध्ये विपुल लेखन होत असेल. तसेच अशा इतरही अनेक भाषा असतील! तुमचा चर्चाप्रस्ताव संस्कृत भाषेशी निगडित आहे... आणि मुद्दा असा आहे की ठाकर, गोंड, कोर्कू या भाषांत काही थोडे लोक बोलताना दिसतात. तसेच संस्कृतमध्ये बोलताना दिसतात! आता एके ठिकाणी स्वतःच वेगळ्या भाषांची उदाहरणे देऊन, दुसर्या ठिकाणी वेगळ्या भाषांची उदाहरणे अमान्य करणे म्हणजे शब्दच्छल नव्हे काय? आलटूनपालटून उलटसुलट मुद्द्यांचा भडिमार केलात तर उत्तरात गोंधळलेला फापटपसाराच मिळेल. :-) (हे वाक्य रागाने लिहिलेले नाही. "फापटपसारा नको" वाक्याला उत्तर आहे.) ३. तुम्ही (किंवा मी) जाहिराती बघितल्या नाहीत तर काय करावे? तुम्ही (किंवा मी) नाहीतरी किती बारीकसारीक भाषांतल्या जाहिराती बघतो? तुम्हाला त्या भाषेत रस असला, तर शोधा, म्हणजे सापडेल. मला खुद्द प्रचलित संस्कृत भाषेबद्दल फारसे स्वारस्य नसल्यामुळे मी शोधायचे कष्ट घेत नाही.
आपल्या प्रतिसादातून मला याचे अद्यापही समधानकारक उत्तर मिळालेले नाही. असो,मी अगदी पहिल्या वाक्यातच काही प्रमाणात सहमती दर्शवली आहे. तुमच्या १-२-३ व्याख्येपुरती मी सहमती दिलेली आहे. तेवढी पुरेशी असावी. पण तुमची "मृत"ची १-२-३ व्याख्याच सर्वमान्य नाही. आणि मग ती व्याख्या "केवळ कोणालातरी हिणवणारी" असे म्हटले आहे. यामुळे तुमच्या १-२-३ वैयक्तिक व्याख्येपुरती माझी सहमती बदलत नाही. कुठल्या बाबतीत तुम्हाला उत्तरातून समाधान हवे आहे, ते मला कळत नाही. (माझे नाव गूगलल्यास असे दिसेल की मी एका लहान संस्कृत पत्रिकेत अगदी लहान प्रमाणात उपसंपादकपणा [प्रुफे तपासणे] करतो. याचे कारण असे नव्हे, की मला संस्कृतातल्या नवनिर्मितीत फारसे स्वारस्य आहे. मला जुने संस्कृत ग्रंथ वाचण्यास कोणी मित्राने मदत केली होती - यात मला स्वारस्य आहे. त्याची फूल ना फुलाची पाकळी परतफेड म्हणून या पत्रिकेसाठी प्रुफे वाचतो. त्यामुळे तुम्हाला दिलेली आंशिक सहमती, आणि तुमच्या व्याखेला विरोध, दोन्ही प्रामाणिकच आहेत. शब्दच्छलासाठी शब्दच्छल नाही.)
In reply to नक्की काय चालले आहे? by रामपुरी
In reply to तात्या खरं by भाग्यश्री
जी भाषा