लेखकश्रीकृष्ण सामंतयांनी सोमवार, 20/10/2008 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा सुपरींटेन्डन्ट ऑफ एक्साईझ ह्या प्रमोशनवर मुंबईला जाण्यापुर्वी,अख्या रतनागिरीचे हेड होते.पुर्वी सरकारी नोकरांच्या घरी शिपाई नोकर घरकामाला रहायचे. त्याना घरात आईला मदत करण्या पलिकडे मला आणि माझ्या धाकट्या भावाला
संभाळायचं काम पण करावं लागायचं.ब्रिटीश लोकानी ती पद्धत घालून दिली होती.
आमचे आजोबा आमच्याकडे रहायचे.
एकदा काय झालं,एका शिपायाची बदली झाल्यावर त्याच्या जागी दुसरा शिपाई आला होता.तो जरा पायाने अधू होता.म्हणून अण्णांनी त्याल घरचीच हलकी हलकी कामं करायला घरीच ठेवला होता. तो जरा कायदेबाज होता.
लेखकचतुरंगयांनी सोमवार, 20/10/2008 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
नीरज कुलकर्णी यांची 'मदार' कशावर आहे हे बघून मला माझी मदार विडंबनावरच कशी आहे त्याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि....
नवटाक ह्या कवींची, भाषा सुमार आहे...
आता विडंबने ही, माझी मदार आहे...
आश्वासने मिळाली, त्यांना जरी कुणाची;
निश्चीत आज त्यांची, कविता शिकार आहे...
मी हासलो तुलाही, वाचून ओळि सार्या;
असतील दोन जमल्या, तिसरी चुकार आहे...
का भाव मोल केला, ही शायरी अशी का?
मारुन सर्व बाता, होतो फरार आहे!
'हे काव्य आज त्याचे, उसवून काढले मी!!'
हा कोणता निराळा, शिंपी टुकार आहे?
गझला किती कवींच्या, मी फाडल्या प्रभावी;
'रंग्यास' कल्पनेचा, चढला बुखार आ
लेखकसौरभ वैशंपायनयांनी सोमवार, 20/10/2008 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
११,९५३ – ११,९५३, अरे नाहि नाहि शेअरमार्केट चा निर्देशांक नाहिये हा. सकाळी प्रत्येक क्रिकेट रसिक हि संख्या घोकतच उठला असेल. करोडो रुपयांचे कोलगेट स्माईल देणार्या, स्विपशॉट किंवा लॉंग ऑफ ला चेंडु तडकावणार्या सचिन तेंडुलकरच्या एखाद्या पोस्टरला त्यांनी मनोभावे नमस्कार केला असेल आणि “सच्चिन धाऽऽऽऽऽऽऽऽऽव रे! धाव!” अशी आर्त साद त्या क्रिकेटच्या देवाला घातली असेल. “सचिन तेंडुलकर लारापेक्षा फक्त १५ धावा मागे”, “सचिन विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर” अश्या मथळ्यांशिवाय “आज सचिन विश्वविक्रम घडविणार” या वाक्यासमोर “उद्गारचिन्हा” ऐवजी “प्रश्नचिन्ह” बघुन माझ्याप्रमाणेच अनेकांची “खचकली” असेल.
लेखकminaयांनी सोमवार, 20/10/2008 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
परक्यांनाही आपलसं करतील
असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोड पडावं
अशी काही गोड माणसं असतात
किती मोठ भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात !!
.............................
............................
काळाचे बांध फुटून जातात
वाहून जाते पाणी
तरिही मैत्रीचा अंकूर
तग धरुन राहतो
कारण भिजत राहतात
त्या फक्त आठवणी !
...............................
............................
लेखकव्यंकुयांनी सोमवार, 20/10/2008 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मी सचिन तेँडूलकरचा मोठा भक्त आहे. सचिनने गेली दोन दशके आपलं वर्चस्व सिध्द केलंय. त्यातही अनेक वेळा दुखापतींनी डोके वर काढूनही आज तो तितक्याच कणखरपणे उभा आहे. दुखापतींनंतरही दमदार पुनरागमन करण्यात त्याचा हातखंडा आहे.
लेखकस्वाती दिनेशयांनी सोमवार, 20/10/2008 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ वाट्या मैदा, १ चहाचा चमचा ड्राय यिस्ट, १ चहाचा चमचा साखर, कोमट पाणी १/२ वाटी, १/२ चहाचा चमचा बेकिंग पावडर, १/४ च.चमचा मीठ, १ टेबलस्पून तेल, २ टेबल स्पून दही, २ टेबलस्पून दूध,थोडे बटर वरून घालण्यासाठी.
कृती-
एका वाडग्यात यिस्ट+साखर कोमट पाण्यात घालणे व उबदार जागी ५/७ मिनिटे ठेवणे.
एका तसराळ्यात मैदा+बेकिंगपावडर+मीठ एकत्र करणे.त्यात तेल,दही,दूध घालणे, नंतर यिस्ट+साखरेचे मिश्रण घालणे व एकत्र करणे.
लेखकस्वाती दिनेशयांनी सोमवार, 20/10/2008 13:22 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य -
५०० ग्राम बोनलेस चिकन, २ ते ३ चमचे चिकन मसाला, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा हळद,१ चमचा तिखट, १/२ चमचा कसूरी मेथी (ऑप्शनल), १ पेराएवढे आले, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १ चहाचा चमचा साखर, २ टेबलस्पून बदाम किवा काजू पावडर, १ मोठा कांदा, ५ ते ६ मध्यम लालबुंद टोमॅटो,१ चमचा टोमॅटो केचप, २ टेबलस्पून तेल, २ ते ३ टेबलस्पून बटर, पाऊण ते १ कप फ्रेश क्रिम,मीठ, कोथिंबिर सजावटीसाठी.
कृती -
चिकन स्वच्छ करुन लहान तुकडे करुन घेणे.आलं लसणीची पेस्ट करणे.च
लेखकफटूयांनी सोमवार, 20/10/2008 03:10 या दिवशी प्रकाशित केले.
सहज तू नळी वर भटकत असताना "जहर" चित्रपटातील "अगर तुम मिल जाओ" या गाण्याचं पाकीस्तानी रुप पाहायला आणि ऐकायला मिळालं.
हे गाणं त्यांच्या १९७४ साली आलेल्या त्यांच्या "इमानदार" या चित्रपटात होतं...
गाण्याची मुळ गायिका तस्सवर खानुम... आवाज एकदम भारदस्त... श्रेया घोशालच्या गोड आवाजाहून पुर्णपणे वेगळा...