
साहित्य- २ वाट्या मैदा, १ चहाचा चमचा ड्राय यिस्ट, १ चहाचा चमचा साखर, कोमट पाणी १/२ वाटी, १/२ चहाचा चमचा बेकिंग पावडर, १/४ च.चमचा मीठ, १ टेबलस्पून तेल, २ टेबल स्पून दही, २ टेबलस्पून दूध,थोडे बटर वरून घालण्यासाठी.
कृती-
एका वाडग्यात यिस्ट+साखर कोमट पाण्यात घालणे व उबदार जागी ५/७ मिनिटे ठेवणे.
एका तसराळ्यात मैदा+बेकिंगपावडर+मीठ एकत्र करणे.त्यात तेल,दही,दूध घालणे, नंतर यिस्ट+साखरेचे मिश्रण घालणे व एकत्र करणे. चांगले मळणे.मळायला अजून पाणी हवे असले तर पाण्याऐवजी दह्याचे पाणी किवा ताक घेणे.
एक सुती फडके ओले करुन पिळणे व त्याने ह्या मळलेल्या गोळ्याच्या वाडगा झाकून उबदार जागी २५ ते ३० मिनिटे ठेवणे.
अवन १५० अंश से. ला प्रिहिट करणे.
एका बेकिंग ट्रेला तेलाचा हात लावून घेणे किवा त्यावर बेकिंग पेपर पसरून घेणे.
साधारण अर्ध्या तासानंतर फडक्याखालील गोळा थोडा फुलून येईल आणि नरमही होईल. ह्या गोळ्याचे ४ ते ५ गोळे करणे. पोळपाटावर मैदा भुरभुरून घेणे व एकेक गोळा घेऊन लांबट आकाराचे नान जाडसर लाटणे. एका वेळी २ ते ३ नान बेकिंग ट्रेमध्ये लावून घेणे.
१५० अंश से. वर १० ते १५ मिनिटे बेक करणे. हलका गोल्डन ब्राउन रंग आला पाहिजे. नंतर अवन मधून काढून ब्रशने किवा चमच्याने बटर लावणे. गरम गरम नान बटरचिकन किवा मटरपनीर किवा व्हेज कोल्हापुरी इ. कशाही बरोबर 'हादडणे'.

मस्तच!
कुलचा आणि नान
In reply to मस्तच! by ऋषिकेश
स्वातीताई,
.
वा
मस्तच!