
साहित्य -
५०० ग्राम बोनलेस चिकन, २ ते ३ चमचे चिकन मसाला, १ चमचा गरम मसाला, १/२ चमचा हळद,१ चमचा तिखट, १/२ चमचा कसूरी मेथी (ऑप्शनल), १ पेराएवढे आले, ४ ते ५ लसूण पाकळ्या, १ चहाचा चमचा साखर, २ टेबलस्पून बदाम किवा काजू पावडर, १ मोठा कांदा, ५ ते ६ मध्यम लालबुंद टोमॅटो,१ चमचा टोमॅटो केचप, २ टेबलस्पून तेल, २ ते ३ टेबलस्पून बटर, पाऊण ते १ कप फ्रेश क्रिम,मीठ, कोथिंबिर सजावटीसाठी.
कृती -
चिकन स्वच्छ करुन लहान तुकडे करुन घेणे.आलं लसणीची पेस्ट करणे.चिकनच्या तुकड्यांना निम्मी आलेलसूण पेस्ट व चिकनमसाल्यातला निम्मा मसाला (साधारण मोठा चमचाभर) चोळून ५ ते १० मिनिटे ठेवणे.तोपर्यंत कांदा चौकोनी चिरणे,टोमॅटोच्याही फोडी करणे.
एका कढल्यात तेलावर हे चिकन पिस गोल्डन ब्राउन रंगावर परतून घेणे व बाजूला काढून ठेवणे.
त्याच कढल्यात उरलेल्या तेलावर बटर घालणे व त्यावरच कांदा परतणे, उरलेला चिकन मसाला,गरम मसाला, तिखट, हळद, कसूरी मेथी , उरलेली आले लसूण पेस्ट घालणे व परतणे.टोमॅटो घालणे व परतणे. अगदी थोडे पाणी घालून झाकण ठेवून शिजवणे.सगळे मिश्रण एकजीव झाले पाहिजे.थोडे गार झाले की मिक्सरमधून हे मिश्रण काढणे. एकदम गुळगुळीत झाले पाहिजे.
आता हे मिश्रण परत कढल्यात घालून ४ ते ५ मिनिटे शिजवणे. १ चमचा टोमॅटो केचप घालणे.हवा असल्यास किंचित तंदूर कलर घालणे.चिकनपिसेस घालणे व परत साधारण ५ ते ७ मिनिटे शिजवणे. चमचाभर साखर व चवीनुसार मीठ घालणे. फ्रेश क्रिम घालणे व ढवळणे. कोथिंबिरीने सजवणे.
आच पूर्णवेळ मध्यम ठेवणे.
गरमगरम बटरचिकन नानबरोबर सर्व्ह करणे.

बटरचिकन + नान
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
नान
In reply to स्स्स्स्स्स्स्स्स्स्स by ऋषिकेश
आग्ग्ग्ग्गग्ग्गाआआआय्य्य्याआआ
मस्तच
कोण म्हणालं ?
In reply to मस्तच by मनस्वी
:-|
In reply to कोण म्हणालं ? by टारझन
स्वाती ताई
मसाला..
In reply to स्वाती ताई by शिप्रा
सहमत
In reply to मसाला.. by स्वाती दिनेश
आम्ही अंडी
गोडुसपणा
साखर
In reply to गोडुसपणा by ललिता
स्सही !!!
छे..
फोटो व
उत्तम पण...
स्वातीवहि
वॉव!
आहाहा
+१
In reply to आहाहा by सहज
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
१३ खणखणीत
सुचवणी....
आभार!
In reply to सुचवणी.... by प्रभाकर पेठकर
बटर चिकन बद्द्ल धन्यवाद
बटर चिकन बद्द्ल धन्यवाद
धन्यवाद.