Skip to main content

सावली

लेखक राघव यांनी बुधवार, 22/10/2008 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागे एकदा श्रीवर्धनला गेलो असतांना किनार्‍यावर मस्त वातावरण होते. त्या पार्श्वभूमीवर सावलीच्या माध्यमातून विरह मांडण्याची कल्पना सुचली. ती हुरहुर शब्दांत मांडण्याचा हा प्रयत्न!!
Taxonomy upgrade extras

ससा आणि कासव

लेखक अरुण वडुलेकर यांनी बुधवार, 22/10/2008 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
ससा आळसाने आणि आपल्या वेगाच्या घमेंडीने झाडाखाली झोपला आणि मागाहून आलेल्या कासवाने शर्यत जिंकली. ससा जागा झाला तसा कासवाने शर्यत जिंकलेली पाहून वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी संतापला. कासव जलचर आहे आणि आम्हा वनचरांच्या वनात येऊन आमच्यावर कुरघोडी करण्याचा त्यांना कांही एक अधिकार नाही असा घोष करू लागला. या वनावर आम्हां वनचरांचाच केवळ हक्क आहे. जलचरांनी येथून हद्दपार झाले पाहिजे असा डंका पिटू लागला. त्याच्या गर्जनांनी सगळे जंगल दणाणून गेले. वाघ,सिंह, लांडगे, कोल्हे सशाच्या गर्जनांचा आपापल्या परीने विचार करू लागले. पण नुसतेच विचार करीत राहिले.

घरटे २

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 22/10/2008 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
माझी नजर आपसूकच अपराध्यासारखी खाली गेली. कारण, मी त्याच्यासाठी काहीही करू शकलो नव्हतो. करणार तरी काय? ती समोरची जमीन एका बिल्डरला विकल्या गेली होती. तेथे आता अपार्टमेंट बनणार होते. मी घरात आलो अचानक मन भूतकाळाकडे आकर्षिल्या गेलं. वेळेच्या रथाची चाके उलटी फिरू लागली........ त्यावेळी मी नुकताच सायनरला राहायला आलो होतो. अंजली अजून पाळण्यात होती. नवीन बांधकामाचे व्रण अजून शिल्लक होते. दिवाळीमध्ये रंगकाम केल्यामुळे येणाऱ्या एका वेगळ्याच सुगंधाची अनुभुती तेथे येत होती.

दिवाळी (?)

लेखक हर्षदा विनया यांनी बुधवार, 22/10/2008 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी जवळ आली नाही का? मग गेली तिही खरेदीला, बरेचसे पैसे घेऊन, बरेचसे !! शिरली एका मोठ्याशा दूकानात, स्वतःचे कपडे घेता घेता हळूच, वाकून पाहत होती, पलीकडच्या, "men's section" मध्ये, तिथे न्याहाळत होती अधिक तन्मयतेने! "कोणता रंग उठून दिसेल तूला?, हा असा shirt आवडेल तूला?" विचारत राहीली मनातल्या मनात.. .................... ,........... (http://www.karadyaachhata.blogspot.com/)

उत्सव - वाटेवरील रंग

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 22/10/2008 01:46 या दिवशी प्रकाशित केले.
सहा ऋतुंचे सहा सोहळे. पण मला बुवा या न्यु इंग्लंडातली पानगळती (फॉलियेज/फॉल) फार आवडते. उन्हाळा संपून गुलाबी थंडी सुरु होते तसा हिरवा गर्द असणारा निसर्ग रंग पलटू लागतो. उंच-उंच झांडांचे शेंडे पिवळे-लाल पडू लागतात व बघता बघता सगळा परिसर पिवळा धमक व लाल भडक मखमलीने सजून गेलेला असतो. वरमाँट, न्यू हँप्मशरला तर सगळेच जातात. पण दररोज आनंद देणार्‍या कामावर जाताना दिसणार्‍या आजूबाजूंचा झाडांचे कौतुकही करावे म्हणून मी विषेश चित्रे काढली.

"आई मी असं पुन्हा करणार नाही गं!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 21/10/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
देसायांचा नातू तसा उनाड होता.पण तसा तो वयाने लहान होता.त्यांच्या घरावर एका खोबणीत एका पक्षाने घरटं बांधलं होतं.

नवागताच्या दोन चारोळ्या

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 21/10/2008 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
आत्मसमर्पित माझी कविता विडंबनाच्या वेदीवरती परशूलाही लाज वाटते कविता माझी मुग्ध हासते * * * * * * माझी कविता, लयबध्द मयु री .... मनाच्या अंगणात ती खेळे निष्णात पारधी मागे, हाती विडंबनाचे जाळे

चंद्रयान - १

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 21/10/2008 18:47 या दिवशी प्रकाशित केले.
हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान उद्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावण्याच्या तयारीत आहे. ते सुमारे पांच दिवसांनी चंद्रावर पोचेल आणि त्याच्याभोंवती १०० किलोमीटर अंतरावरून त्याला प्रदक्षिणा घालत राहील. या घिरट्या घालत असतांनाच त्यावर बसवलेल्या अत्याधुनिक उपकरणांद्वारे चंद्राविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती ते यान गोळा करणार आहे.

नव्या भोंडल्यातले एक गाणे

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 21/10/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी, त्रिवेणी दोघी बहिणी काव्यात नव्हतं तिसरं कोणी काव्याची गेयता चोरली कोणी मी नाही चोरली कवितेनी चोरली विडंबनदादा येईल गं दादाच्या मांडीवर बसीन गं दादा तुझी कविता चोरटी अन् मला म्हणते पोरटी घातली काठी कवितेच्या पाठी काव्यातून, काव्यातून चारोळी मोठी.. फुटली कविता झाल्या चारोळ्या नवागतांनी वाजवल्या टाळ्या ...