Skip to main content

द्विधा मनाची....

लेखक पारोळेकर यांनी शनिवार, 25/10/2008 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
एकाकी भटकतोय या अनोळखी दुनियेत सोबतीला नाही कुणी या एकेरी वाटेत... दिसत होतं लांबच लांब आकाश दिसत नव्हतं विसाव्याचं ठिकाण दिसत होतं एकच झाड त्याची होती आकाशाकडे मान माझ्यासारखीच द्विधा त्याची ही खंत होती मनात माझ्यासारखं असू नये कोणी हीच प्रार्थना करतो सद्गुरू चरणात रेटता रेटता... दिसलं एक विसाव्याचं ठिकाण जाऊन पाहतो तर काय? माझ्या आधीच तेथे कुणी विराजमान तेथून जावं की थांबावं हाच होता प्रश्न मनात कुणी मिळेल जीवाभावाचं या अनोळखी जगात....
Taxonomy upgrade extras

ऑफिसातलं ईलू-ईलू...!

लेखक पारोळेकर यांनी शनिवार, 25/10/2008 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या ग्लोबल युगात केव्हा, कुठे काय होईल, हे सांगने कठीन ! आपल्या ऑफिसात कुठल्या तरूण- तरूणीचे ईलू- ईलू सुरू असेल तर त्यात ते काय चुकीचे करीत आहेत. 'प्रेम' हे जीवनाच्या बागेत अलगद उमलणारे फूल आहे. ते फूल कॉलेजात तर कधी जॉब करत असलेल्या ऑफिसातही उमलते. कारण प्रेमाला कुणाचेही बंधन नसते. ग्लोबलायझेशनमुळे शासकिय असो अथवा खाजगी कार्यालयात पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करताना दिसतात. शिक्षण व आधुनिकतेने युगाचा पार चेहरामोहरा बदलून टाकला आहे. आपल्या आजी-आजोबांच्या जमान्यात स्त्रीचं जीवन म्हणजे 'चूल आणि मूल' ऐवढेच होते.

प्रकाशाशी जुळावं नातं! .. तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक राघव यांनी शनिवार, 25/10/2008 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
आज रात्री अन् उद्या सकाळी मी नेटवर येऊ शकणार नाही. म्हणून एक दिवस आधीच हा (कविता) प्रपंच!! प्रकाशाशी जुळावं नातं, अंधारातही प्रकाश व्हावा, क्षितिजावरल्या उषेसमवे, अंधार सारा दूर सरावा! पानांवरले दवबिंदू ते, प्रकाशानं तेजाळावेत, जीवनात तुम्हा सगळ्यांच्या, त्या दवबिंदुंसम, लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!! पणत्यांच्या शांत, संयमी अन् मंगल तेज सगळ्यांस स्फुर्तीदायी-आनंददायी व्हावे हीच सदीच्छा! तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! आपला, मुमुक्षु

कंदिल बनविणे: एक आनंददायी कला

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 25/10/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी हा सर्वार्थाने घरातल्या प्रत्येकाचा सण. दिवाळी आली की वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळं घर तयारीला लागतं. एकीकडे घराची साफसफाई, रंगरंगोटी चालु असते. तर दुसरीकडे फराळाचे मस्त पदार्थ चालू असतात. लहानांना सुट्ट्या असतात. पुर्वी किल्लेही बनवले जात. एकत्र कुटंबांमधे तर आपेष्ट जमलेले असतात. मनसोक्त हास्य विनोदात आठवडा कसा जातो ते कळतही नाहि. आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस! आमच्या घरी आज दिव्यांची रोषणाई आणि कंदिल लागतो. त्यामुळे गेला विकांत कंदिल बनविण्यासाठी राखून ठेवला होता. अजूनहि मी कंदिल घरीच बनवतो. दर तीन वर्षांनी तर कंदिलाचा सांगाडाहि नवा बनतो.

जम्मूतील हिंदूंकडून महाराष्ट्रातील हिंदूंनी बोध घ्यावा !

लेखक सनातन यांनी शनिवार, 25/10/2008 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
जम्मूतील हिंदूंनी हिंदुस्थानातील चळवळीचे नेतृत्व करावे, हे आव्हान समस्त हिंदूंना अभिमानास्पद वाटावे, असेच आहे. एक दिवसाच्या लाक्षणिक संपाने व १२ तासांच्या बंदने जनजीवन किती विस्कळीत होते, याची जाणीव समस्त हिंदु प्रजेला आहे. अमरनाथ जमीन प्रकरणी जम्मू व परिसरात बंद, मोर्चे, संचारबंदी व गोळीबार हे सर्व तब्बल दीड महिना चालू होते. परिसर बेचिराख झाला होता. दैनंदिन आवश्यक वस्तू मिळाल्या नाहीत, तर मनुष्य त्वरित शरण येतो; मात्र जम्मूतील लढवय्या हिंदूंनी दीड महिना हे यज्ञकुंड धगधगत ठेवले. भविष्य काळात लढा देण्यासाठी त्यांचे मनोबल वाढले आहे.

विषकन्या (पूर्ण)

लेखक अरुण मनोहर यांनी शनिवार, 25/10/2008 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागील वेळी पूर्ण न लिहीता, ईस्नीपचा ऑडियो टाकला होता. त्यामुळे काहींची गैरसोय झाली होती.
Taxonomy upgrade extras

या रे या!

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 25/10/2008 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशाही मार्गाने चर्चेने आणि प्रबोधनाने महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्याचा उपदेश करण्यार्‍या सर्वांसाठी...! ही कविता (बालकवींची क्षमा मागुन) समर्पित....! या भैयांनो या रे या... लवकर भर भर सारे या मजा करा रे मजा करा हि मुंबई तुमची समजा ! स्वस्थ बसे आणि फसे तोची खरा मराठी असे नवि झोपडी बांधा या... या नगराला लागुनिया ! गिरगांव दहिसर भैयांना मसजिद मुलुंड बाकिच्यांना वाढती गर्दी गाड्यांना फौज दिसेना कोणाला ! चपलगति बिहारी येति "हे" आले "ते" आले.. तर मग मुंबई सोडूनिया आपणच शोधू नवि दूनिया....!
Taxonomy upgrade extras

"मेल्यावर जीवाचं काय होतं?"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 24/10/2008 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मेहूणी हेमा माझ्या पत्नी पेक्षा तशी बरीच वयाने लहान.गेले कित्येक वर्ष ती आपल्या नवर्‍याबरोबर इंग्लंडला एडिंबरा इथे राहाते.आता ती आजी झाली आहे तिची नातच पाच वर्षाची झाली आहे. ह्या गणपतिच्या सणाच्या दिवसात ती तिच्या नातीला घेऊन आमच्याकडे महिनाभर राहायला आली होती.तिच्या नातीला गणपती उत्सव कसा साजरा करतात हे तिला दाखवायचं होतं. एक दिवशी बोलता बोलता आमचा विषय निघाला की, "मेल्यावर जीवाचं काय होतं?" हेमाला गेल्या वर्षाचा एक जुना प्रसंग आठवला.ती म्हणाली, "मला काय वाटतं आणि त्यावेळी काय घडलं ते तुम्हाला आठवून आठवून सांगते." प्रस्तावना करताना ती म्हणाली, "मी काही अशी एकटीच मनुष्यप्राणी नाही की ह

पेन्सिल रेखाटन

लेखक वर्षा यांनी शुक्रवार, 24/10/2008 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
माझी आवडती हिरॉईन रेखाटायचा एक फसलेला प्रयत्न! माध्यमः Derwent Charcol Medium & Dark, RAFFINE 2B Graphite pencil -वर्षा

नाही तर नाही.... जा!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 24/10/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, खालील गझल मी मायबोली च्या गझल कार्यशाळेसाठी लिहिली होती. नाही रदिफ घेऊन लिहायची होती गझल. गझल लिहिण्यासाठी महत्प्रायास करावे लागले आणि अजूनही लागताहेत. ही गझल कार्यशाळेसाठी पाठवल्यावर तिच्यात १-२ बदल करून संयोजकांनी तिला निर्दोष गझल असे जाहीर केले आणि माझा जीव भांड्यात की मतल्यात पडला.. खरंतर, गझलेच्या कार्यशाळेमध्ये भाग घेण्यापूर्वीही जवळ जवळ २ ते २.५ महिने मी गझल लिहिण्याचा अखंड प्रयत्न करत होते.. त्यासाठी माझे गुरू आणि मिपाचे गझलकार आणि निवृत्त विडंबन सम्राट केशव सुमार उर्फ अनिरूद्ध अभ्यंकर यांना भरपूर त्रास दिला आहे.
Taxonomy upgrade extras