Skip to main content

तहानलेल्या शाळांना आता पा़णी मिळणार

लेखक mina यांनी शनिवार, 01/11/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशातल्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही याची माहीती सरकारला झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशाच्या दुर्गम भागातील एक लाख शाळांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोंडल्याची (डोंबलाची ) गाणी

लेखक मूखदूर्बळ यांनी शनिवार, 01/11/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
(थोडस चर्‍हाट : भारत- ऑस्ट्रेलीया कसोटी मालिका सध्या रंगतदार अवस्थेत आहे. गेल्यावेळेची मालिका ही रंगतदार झाली होती. पण ती मालिका जास्त गाजली ती खेळा व्यतीरिक्त इतर कारणांमूळे. कांगारूंची शेरेबाजी (स्लॉजींग) , हरभजन- सायमंडस वाद , पंच स्टीव्ह बकनर ह्यांचे पक्षपाती निर्णय इत्यादी इत्यादी.
Taxonomy upgrade extras

तांदळाची चकली

लेखक सखी यांनी शनिवार, 01/11/2008 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशात असताना नेहमीच चकलीची भाजणी मिळणे शक्य नसते, परवाच ही कृती एका मैत्रिणीकडुन मिळाली आणि चकल्या चांगल्या, झटपट व कुरकुरीत झाल्या. साहित्य - २ कप तांदळाचे पीठ, १ कप बेसन, १/२ कप बटर, १ छोटा चमचा तिखट, थोडासा ओवा, तिळ, हळद चवीनुसार मीठ कृती - दोन्ही पीठे एकत्र मिसळून घ्यावीत. बटर थोडेसे वितळून घ्यावे व पिठात घालावे, बाकीचेही सर्व साहीत्य या पिठात घालणे. एका भांड्यात गरम पाणी करुन ते बेताबेताने वरील पिठात घालुन, पिठ चांगले मळुन घेणे. तेल कढईत चांगले गरम करावे. सो-याला आतुन तेल लावुन एका प्लास्टीकच्या कागदावर ४-५ चकल्या पाडुन घ्याव्यात व लगेच एकीकडे तळायलाही घ्याव्यात.

निमीत्त एका सणाचे

लेखक कोदरकर यांनी शनिवार, 01/11/2008 05:22 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलोवीन च्या निमीत्ताने बरीच छोटी मंडळी माझ्याकडुन चॉकलेट घेवून गेली. विशेष म्हणजे बहुतांश भारतीय वंशाचे होते. सण भुतांचा असूनही... आपल्या राज्यात छट पुजेच्या भोवती जमा झालेला धुराळा हे आपले दुर्देव नाही का?

या सम हा ...!

लेखक मनीषा यांनी शनिवार, 01/11/2008 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ : Esplanade - on the bay , Singapore ३० ऑक्टोबर २००८ Masters of Percussion सभागृहात मिट्ट काळोख होता. टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता होती. सारंगीचे सूर सभागृहात पसरू लागले... एक प्रकाशझोत स्टेजवर दिसू लागला.. त्यात एक तरुण आपल्या सारंगीतून सूरांची उधळण करत होता‌. सर्वजण मंत्रमुग्ध होउन पाहत/ऐकत होते. थोडावेळ आलापी झाल्यावर शेजारील तबल्यातून एक ताकदवर, खणखणीत बोल उठला... प्रकाशझोत आता तबल्यावर आला होता.... तो तोच होता. अनेक वर्ष त्याने रसिकांच्या र्‍हुदयावर अधिराज्य गाजवलेलं आहे... त्याला आज तालाच्या दुनीयेत कोणी प्रतिस्पर्धी नाहीत... तो च... उस्ताद झाकीर हुसेन.

स्मृति बालपणाची

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 31/10/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
फिरून आली मला स्मृति निघून गेलेल्या त्या जमान्याची त्या माझ्या बालपणाची अरेरे,एकटेच सोडून जाणार्‍या अन पुन्हा कधीच न येणार्‍या त्या बालपणाची ते लुटुपुटुचे खेळणे ते लुटुपुटुचे संवगडी ते धावत पळून जाणे शीव मला असे ओरडणे विसरपडेना अजुनही त्या सुखदेयी स्वप्नाची त्या आनंददायी बालपणाची फिरून आली मला स्मृति निघून गेलेल्या त्या जमान्याची रडावे पुन्हा पुन्हा आठवून ते गतदिवस बालपणाचे स्मरावे पुन्हा पुन्हा आठवून ते संवगडी बालपणाचे फिरून आली मला स्मृति निघून गेलेल्या त्या जमान्याची अन पुन्हा कधीच न येणार्‍या त्या बालपणाची श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras

कुणी एक गझलाकार

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 31/10/2008 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
हे जे काही मी रचलं आहे, ते नक्की कुठल्या काव्यप्रकारात बसेल हे माझ्या ल क्षात येत नाहीये. पण जसं सुचलं, तसं लिहिलं. घ्या सांभाळून दादानु गझलांची चळ्त रचतोच आहे छापण्या पुढे व्हा, मी येतोच आहे कुणी सांगण्या येई, गझल दे करुनी मागण्याआधी मी देतोच आहे लिहिण्यास पाने पड्ली, जराही कमी ती मुलांच्या वह्या मी उसवतोच आहे भिऊनी पळाले शब्द ओळीमधुनी गचांडी धरुनी, त्यांना बसवतोच आहे ओळ्खून गझलाकारास, प्रतिक्रिया जर दिली 'तिलाही' धुवाधार धुतोच आहे

संयमी जगज्जेता!!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 31/10/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
२९ ऑक्टोबर २००८, जर्मनीमधल्या बॉन शहरातल्या 'आर्ट अँड एक्झिबिशन हॉल'ला जत्रेचं स्वरुप आलं होतं! सहाजिक आहे, दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी मधे पट मांडून एकमेकांसमोर बसलेले होते. बुद्धीबळाच्या जगज्जेतेपदाचा सामना सुरु होता. १२ डावांच्या ह्या मालिकेत जो कोणी ६.५ गुण मिळवेल त्याच्या गळ्यात विजेतेपदाची माळ पडणार हे नक्की होतं. आनंद विश्वनाथन (भारत) २००७ चा जगज्जेता वि. व्लादिमीर क्रामनिक (रशिया) २००८ सालासाठी त्याला आव्हान देणारा असा हा सामना होता. आनंद ६ गुणांसह आघाडीवर होता, त्याच्या आणि विजेतेपदाच्या मधे फक्त अर्ध्या गुणाचं अंतर होतं. उत्सुकता शिगेला पोचली होती.

चेंज ऑफ गार्ड

लेखक विकास यांनी शुक्रवार, 31/10/2008 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
आज (३१ ऑक्टोबर) महाराष्ट्र टाईम्स आणि सामना मधे वाचलेल्या बातम्यांप्रमाणे बाळासाहेब ठाकर्‍यांनी माहीती असलेली बातमी, "उद्धवच्या हाती शिवसेनेची सूत्रे दिली असताना मला भेटायला येण्याचे काय प्रयोजन ? " असे म्हणत काही प्रमाणात अधिकृत केली. जो पर्यंत शिवसेना हा किमान महाराष्ट्रासाठी प्रबळ पक्ष आहे, तो पर्यंत त्यांच्यातील अंतर्गत घडामोडींचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रावर सहज पडू शकतो. त्यामुळेच या घटनेचे महत्व.

आवाज कुणाचा ?

लेखक मूखदूर्बळ यांनी शुक्रवार, 31/10/2008 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाच्या आयुष्यात 'आवाजाच' अगदी म्हणजे अगदी महत्वाच स्थान आहे. माणूस जन्माला आल्यापासून जो ' आवाज' करायला सुरुवात करतो, तो जन्मभर आवाज करत किंवा ऐकत मार्गक्रमण करत असतो. अगदी आयुष्याच्या 'अथ' पासून 'इती' कान कसले कसले कष्ट सहन करत असतात बिचारे. आता नेहेमीचच उदाहरण घ्या. तूम्ही कधी कधी (कधी कधी नव्हे नेहेमीच) लोकल गाडीची वाट बघत उभी असता. लोकांचा कलकलाट सूरु असतो. मध्येच ध्वनीक्षेपकावर कसली तरी 'खूडबूड' ऐकायला येते. " एक विशेष सूचना". तूम्ही पंचप्राण एकत्र करून 'ती' ऐकण्याचा प्रयत्न करता. " खर्र... खर्र... खूर्र... खूर्र... खड.. खड.. खडाक खूडूक गाडी खट खट उशीराने ...........