Skip to main content

मिपा ओळख २

लेखक चेतन यांनी सोमवार, 03/11/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

( कणा )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 03/11/2008 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
( कणा ) कवी - कुसुमाग्रज ------------------------------------------ ओळखलस का देवा मला?'- स्वर्गात आला कोणी शरीर होते सोडलेले, आत्म्याचीच वाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून : पृथ्वीवरुन आत्ताच आलो.

राज ठाकरेंवर देशद्रोहाचा खटला

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 03/11/2008 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म.टा मधिल बातमी झारखंडमधील धनबाद कोर्टातील मुख्य न्यायाधीश दीपक कुमार यांच्या कोर्टात मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात हत्या आणि देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. राजू मलिक नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून कोर्टाने राज ठाकरे यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०२,१४७,१४८,१४९ आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी २९ तारखेला करण्यात येणार असून , राजू मलिकने आपला भाऊ सकल याच्या हत्येचा आरोप राज ठाकरे यांच्यावर लावला आहे.

बघ तुला आठवण येते का ?

लेखक मूखदूर्बळ यांनी सोमवार, 03/11/2008 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
(सौमित्र ह्यांच्या 'बघ तुला माझी आठवण येते का' ह्या कवितेच स्वैर विडंबन करण्याचा एक प्रयत्न) कर्जवसूली साठी येणारे गूंड खिडकीत उभ राहून पहा बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? खिडकी बंद करून घे. दिवे पंखे मालव. सर्व नळ बंद करून टाक. बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? थडथडणार काळीज जागेवर आणायचा प्रयत्न कर. डोळे मीटून घे. देवाचा धावा कर. राम रक्षा म्हण. नाहीच आठवली तर भीमरूपी महारुद्रा म्हण. बघ तुला घेतलेल्या ग्रुहकर्जाची आठवण येते का? मग हळूच मागच्या दाराने बाहेर पड. चालत रहा भिती कमी होईपर्यंत. ती कमी होणार नाहीच. मग घरी ये. साडी बदलू नकोस.
Taxonomy upgrade extras

विचीत्र प्राणी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 03/11/2008 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सहीचे इंग्रजी मध्ये संक्षिप्त रुप वि.प्रा. होते. वि.प्रा.= विचीत्र प्राणी .माझे माझ्या एकुलत्या एक बायकोने ठेवलेले पेट(परत प्राणी) नाव."तुझा नवरा जरा विचीत्र आहे तेंव्हा जरा संभाळुन" हा माझ्या सासूने साखरपुड्यानंतर सल्ला दिला आपल्या आवडत्या कन्येला. अर्थात हे नंतर कळले. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंद पण पडली.(पहिल्या मैत्रीणी बरोबर विलक्षण साम्य). मोठ्या भावाबरोबर आधी ठरल्याप्रमाणे उगाच आढेवेढे न घेता होकार दिला. मुलीच्या काकाने मुलीबरोबर बोलण्याचा प्रस्ताव मांडला. लगेच एका वेगळ्या रुमची व्यवस्था पण झाली.

तनुलीचे गद्य,पद्य

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 03/11/2008 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबा बरोबर त्यांना पोहचवायला गेली होती.त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली, का असे गेलात तुम्ही ना बोलता ना सांगता सहवासाच्या संगतीची हिच का हो वाच्यता? नंतर घरी आल्यावर आईबाबांचं बोलणं तिने ऐकले. आईबाबा आले घरी म्हणती एकमेकामधे ठेऊया हिला उद्या डेकेअरमधे तनुली रात्री झोपली नाही.आजीआजोबांची तिला सतत आठवण येत होती. झोप येई ना मला वाटे आईला मज भूक लागली जवळ घेऊनी देई दुदु मला कसे सांगू मी तिला येई आठवण त्यांची मला दुसर्‍या दिवशी डेकेअरमधे टॉम,जेरी,क्याथ
Taxonomy upgrade extras

(तसा कुठे मी....)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 03/11/2008 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
गझलेच्या विशेषांकातली अनंत ढवळे ह्यांची 'तसा कुठे मी..' ही गजल वाचली आणि माझे जिवापाड चालवूनही फसलेले अनेक प्रयत्न डोळ्यांसमोर येऊन गेले!

मंत्रीमंडळ विस्तार..

लेखक सरपंच यांनी सोमवार, 03/11/2008 00:22 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मडळी, मिपाचे आजपर्यंतचे मंत्री.. चतुरंग, केशवसुमार, धोडोपंत, विकास, नीलकांत, प्रा डॉ बिरुटे, प्रियालीदेवी. मिपाचा रोजचा वाढता पसारा लक्षात घेता आम्ही मिपाच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करायचे ठरवले आहे...

तेंव्हाही - २

लेखक आजानुकर्ण यांनी रविवार, 02/11/2008 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवडत्या संकेतस्थळाचा दिवाळी अंक प्रकाशित झाला आणि त्यातली ही कविता वाचून आम्हाला आमचे गेलेले तें दिन याद आले. आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला... हाय :) दिवाळी अंकाला, गझलकारांना आणि विडंबनकारांना शुभेच्छा झाले होते जरि माझे मुंडण तेंव्हाही उगाच नव्हते केले मी भांडण तेंव्हाही! मला ठोकण्यासाठी जरि तू फिरून थकलिस मिटले नव्हते डोळे... तू कारण तेंव्हाही... कशास वाटे काळ थांबला कालच्यापरी असह्य झाले होते... सारे.. क्षण तेंव्हाही... तुझे नि माझे हिशेब होते चुकते झाले (तुझेच भरले पाकिट...