Skip to main content

तनुलीचे गद्य,पद्य

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 03/11/2008 04:16 या दिवशी प्रकाशित केले.
तनुलीचे आजीआजोबा जेव्हा परत जायला निघाले त्यावेळी तनुली आपल्या आईबाबा बरोबर त्यांना पोहचवायला गेली होती.त्याचवेळी तिच्या लक्षात आलं की हे आता परत येणार नाहीत,त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून नंतर ती मनांत म्हणाली, का असे गेलात तुम्ही ना बोलता ना सांगता सहवासाच्या संगतीची हिच का हो वाच्यता? नंतर घरी आल्यावर आईबाबांचं बोलणं तिने ऐकले. आईबाबा आले घरी म्हणती एकमेकामधे ठेऊया हिला उद्या डेकेअरमधे तनुली रात्री झोपली नाही.आजीआजोबांची तिला सतत आठवण येत होती. झोप येई ना मला वाटे आईला मज भूक लागली जवळ घेऊनी देई दुदु मला कसे सांगू मी तिला येई आठवण त्यांची मला दुसर्‍या दिवशी डेकेअरमधे टॉम,जेरी,क्याथरीन आणि सेरा म्हणाली तिला, "रडूं नकोस अशी, येतील तुझी आईबाबा संध्याकाळी." मी मनात म्हणाले "कसं सांगू मी त्याना की,आईबाबांचे पण आईबाबा असतात,ते आता कसे परत येणार?" समजाविले मला आईने रात्री रडूं नकोस तूं त्याच्यासाठी येतील ते पुढच्या वर्षी आहे मला त्याची खात्री हे एकून तनुलीला बरं वाटलं.ती आईला म्हणाली, लाविला मी त्यांना लळा रडुन सुकला माझा गळा असतील ते तिथे बेचैन जातील हे ही दिवस झटकन होईन मी तोवरी मोठी पटकन लुडुलुडु चालण्या एव्हडी गुलुगुलु बोलण्या एव्हडी घेतील ते मज कमरेवरती सांगिन मी मग त्यांना सत्वरी "का असे गेलात तुम्ही ना बोलता ना सांगता सहवासाच्या संगतीची हिच का हो वाच्यता?" श्रीकृष्ण सामंत
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2237
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

तनुलीचे प्रकटन छान वाटले. आ़जीआजोबांचा सहवास काही औरच !!

तनुलीची कथा आवडली. --लिखाळ.

पक्या,लिखाळ, आपल्याला लेखन आवडलं हे वाचून बरं वाटलं. आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com