विचीत्र प्राणी
माझ्या सहीचे इंग्रजी मध्ये संक्षिप्त रुप वि.प्रा. होते. वि.प्रा.= विचीत्र प्राणी .माझे माझ्या एकुलत्या एक बायकोने ठेवलेले पेट(परत प्राणी) नाव."तुझा नवरा जरा विचीत्र आहे तेंव्हा जरा संभाळुन" हा माझ्या सासूने साखरपुड्यानंतर सल्ला दिला आपल्या आवडत्या कन्येला. अर्थात हे नंतर कळले.
मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. पसंद पण पडली.(पहिल्या मैत्रीणी बरोबर विलक्षण साम्य). मोठ्या भावाबरोबर आधी ठरल्याप्रमाणे उगाच आढेवेढे न घेता होकार दिला.
मुलीच्या काकाने मुलीबरोबर बोलण्याचा प्रस्ताव मांडला. लगेच एका वेगळ्या रुमची व्यवस्था पण झाली. अशावेळी होणा-या बायकोबरोबर नेमके काय बोलायचे असते ह्या बाबतीत काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे मी नको म्हट्ले. सासूच्या चेहे-यावर आश्चर्य.
काका काही पाठ सोडेना. "अहो, जावईबापू, बघा आवडीनिवडी जुळतात का बघा"
त्यात आगावू चुलत मेहुणी ने भर घालायला सुरु केली "आताच बोला, नंतर निळणार नाही" चा सडलेला विनोद करुन. काय करावे सुचेना. मग शेवटी निर्धार केला आणि हत्यार काढले.
काय बोलु? कुठला विषय बोलु? कसली चर्चा करु? कसल्या आवडी निवडी? माझ्या भविष्यातील वैवाहिक जिवनाशी त्याचा काय संबंध. आणि समजा आवडी निवडी जुळल्या नाही तर काय करु? नकार देउ. (सासु चा चेहेरापांढरा फटक )ही माझी बायको- विषय संपला. काय जुळवाजुळव ती माझी मी बघुन घेईन. म्हणुन मी वि.प्रा.
एक बरे आहे गेल्या २३ वर्षात सासरकड्ची मंडळी माझ्या नादाला लागत नाही. वेळ वाचतो हो उगाच मनात नसताना ह्यँ, ह्यॅ करण्यापासुन.
लग्न झाल्यानंतर सुमारे ५ वर्षानी मोठ्या वहिनीने गणपती त एकदा बायकोला खाजगीत (मला कानावर पडेल ह्या आवाजात) विचारले. " तुला भिती वाटते का ग. तुझा नवरा कायम घोळ्क्यात. अगदी लहानपणापासुन बघतेय. आजही तेच आहे. आजकाल काही सांगता येत नाही. कुणी तरी गळ्यात पडली तर?"
बायकोने अगदी शांत आवाजात उत्तर दिले. " ह्यांच्या प्रेमात पडणा-याबद्दल मला भिती नाही सहानुभुती वाटेल. कारण ह्या माणसाकडे स्वःतवर प्रेम आणि आपल्या कामावर प्रेम करुन आणि कोणावर प्रेम करायला वेळ आणि जागा (?)शिल्लकच नाही.
जाता जाता: लग्नाच्या अगोदर चार दिवस मला अपघात झाला. दोन्ही हात संपूर्णपणे प्लास्टर मध्ये. अनेस्थेशियात जायच्या आधी डॉक्टरला दोन्ही हाताची दोन बोटे मो़क्ळी ठेवायला सांगितली होती हार घालण्याकरिता. लग्न पुढे ढकलण्यात अर्थ नव्हता. उगाच पैशाची नासाडी आणि मानसिक त्रास. परत आमच्याकडल्या कोणी पायगुण वगैरे वाद काढण्याची शक्यता होतीच की. सगळे लग्न एक कॉमेडीच होती. खास करुन प्लास्टर मधील नवरा हा फार मोठा मस्करी चा आणि सहानुभुती चा विषय झाला. माझे स्पेशलायझेशन माहित नसलेल्या भगिनीवर्गानी रिसेप्शन मधे समजुत काढताना डोळ्यात पाणी काढले.(३ महिने कळ सोस वगैरे). मी पण एक डायलॉग सुमारे १०० वेळा सहन केला. शेवट शेवटी तर ओरडून सांगावेसे वाटले, " प्लास्टर हाताला आहे" गप्प बसण्यात शहाणपणा होता.
सासुने ३.५ महिन्यात "जावई माझा भला म्हटले.
सासू सॉफ्टवेअर हार्डवेअर चे प्रॉब्लेम असलेली कपल्स रिफर करते. आता विचीत्र प्राणी नाय म्हणत.
एक प्रष्नः आज काल ३ ते ४ मिटींगा होतात म्हणे मुलगी बघितल्यानंतर. नेमके काय बोलतात ते होणारे जोडीदार? एवढ सगळ बोलुन होणा-या लग्नानंतर घट्स्फोटाचे प्रमाण का वाढते आहे.
वाचन
16187
प्रतिक्रिया
0