Skip to main content

काटेकोरांटीची फुलं.

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 07/11/2008 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
जावई कधीही यायचे. त्यांना आधी कळवायची अट नव्हती. सणासाठी यायचे असले तर त्यांच्या वडीलांचे पत्र यायचे.घरात एकच धांदल असायची. आजी तेव्हा जावयांच्या गावातच स्थायीक होती. जावई गब्बर माणूस. त्यांच्या जीपमधून आज्जी पण यायची.आईचा जीव खालीवर व्हायचा. घरात सहा पोरं. पाहुणे येणार म्हणजे महीन्याचं बजेट डळमळायला सुरुवात व्हायची. आमचा वाणी घाडगे.उधार द्यायचा पण वडीलांना उधारी खपायची नाही.पाहुणे म्हणजे जीवाला घोर.तोंड दाबून बुक्क्यांचा मार. आम्ही पोरं मात्र खूष असायचो. का खूष असायचो हे आजतगायत कळलं नाही.आत्या येणार म्हणजे सकाळी लवकरच येणार. आत्याचा नवरा मोठ्ठा वकील. घरची मालगुजारी.

बिहार-२

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 07/11/2008 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
बिहाराच्या प्राप्त स्थितीत आता बिहारी प्रजेने काय करावयाला हवे असा विचार माझ्या मनात आहे.बिहारी लोकांनी राजकिय भंपकपणा आणि उथळ प्रचाराच्या बाहेर यायला हवेच. राहुल राज प्रकरणात / धर्मराज प्रकारात बिहारी राजकिय नेते एक येत आहेत असे दृष्य दिसले. त्याचे कारण म्हणजे त्यांना बिहारच्या अस्मितेचा कळवळा असे न समजता लो़काना दिशाभुल करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मार्ग नाही हे आहे. आज नाही तर उद्या बिहारी लोकांनी त्यांना जाब विचारायला हवा की भारतातील गरीबी, शैक्षणिक दारिद्र्यता आणि विषमता आपल्याकडेच का आहे? कोणी सुखासुखी आपला प्रांत सोडत नाही, बेरोजगारीने या गरीब लोकांना इतरत्र जावे लागते.

पं.भीमसेन जोशी कुणाचे?

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 07/11/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरभास्कर पं.भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्यामुळे सर्वांनाच खूप आनंद झाला आहे. मिसळपाववर तर दुसरी दिवाळी साजरी होत आहे. माझ्या मनात ज्या विभूतींना सर्वोच्च आदराचे स्थान आहे त्यात पं.भीमसेन जोशी यांचा समावेश होतो. तेंव्हा त्यांच्या विरोधात मला एक अवाक्षरसुध्दा लिहायचे नाही किंवा वाद घालायचा नाही हे आधीच स्पष्ट करतो. विकीपीडियावर यासंबंधी माहिती शोधतांना एक गोष्ट मला जाणवली त्याबद्दल या ठिकाणी लिहीत आहे. आजवर ज्या आदरणीय लोकांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाला त्यांच्या यादीमध्ये नांवाबरोबर ती व्यक्तीचे मूळ राज्य किंवा राष्ट्र कोणते हे दिले आहे.

सर्वात मोठा जोक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 07/11/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटा मधिल एक हसु आणनारी बातमी भ्रष्टाचार कळवा... दोन लाख मिळवा! टेबलाखालचे' व्यवहार करणारे सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या अवैध मालमत्तेची माहिती कळवा आणि दोन लाख रुपये मिळवा, अशी घोषणा राज्य सरकारने केली असून मालमत्ता जितकी अधिक, तितके बक्षीसही वाढत जाणार आहे! सरकारी व निमसरकारी अधिकारी, कर्मचारी व लोकसेवक यांच्या अवैध मालमत्तेची खबर देणाऱ्यांना १० हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत बक्षीस देण्यात येईल. खबऱ्याने २५ लाखांपर्यंतच्या अवैध मालमत्तेची माहिती अॅन्टी करप्शन विभागाकडे दिल्यास त्याला १० हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.

भारतामधील दहशतवाद - एका नवीन वळणावर....

लेखक नाम्या झंगाट यांनी शुक्रवार, 07/11/2008 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
कर्नल श्रीकांत पुरोहित यांनी मालेगाव मधील बॉम्बस्फोटमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक कबुली दिल्याची बातमी नुकतीच वाचनात आली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3684027.cms भारतामधील दहशतवाद एका नवीन वळणावर येऊन ठेपला आहे. या बाबत आपल्याला काय वाटते???

बरेच काही..!

लेखक उपटसुंभ यांनी शुक्रवार, 07/11/2008 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
आठवशिल तर आठवेलसे बरेच काही. अजुनी आहे राहिले तसे बरेच काही. मुठीत नाही आली स्वप्ने खंत कशाला, ओंजळीतही मोहवेलसे बरेच काही.. क्षितिजापाशी सांज देऊनी गेली मजला. निशा, चांदणे, गंध, कवडसे बरेच काही.. तुझे वचन स्वप्नी येण्याचे म्हणून निजतो. घडले आहे जागवेलसे बरेच काही.. जगता जगता नकळत पायी तुडवत गेलो. श्रद्धा, निष्ठा, प्रेम, भरवसे बरेच काही.. आज किनारी उरलेले वेचण्यास आलो, वचने, शपथा, पावले, ठसे बरेच काही..! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

(चकणा )

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 07/11/2008 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
(चकणा ) उमाकांत काणेकर यांचे गीत असलेली , शोभा गुर्टू यांच्या आवाजातील एक अप्रतिम गझल ' उघड्या पुन्हा जहाल्या, जखमा उरातल्या ' याचे हे विडंबन त्यांची माफी मागून -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मिळता पुन्हा सगळा चकणा बशीतला दिसती मम डोळ्यांना मदिरा पेल्यातल्या घेऊ कशी नुसती घशात जळजळे सुरवात करताना, चकल्या पुढातल्या निघता वलय ओठी, हळुवार सिगारचे मिळतात त्या अजुनी शेंगा भाजलेल्या पिऊनिया उरावी, ती भुक लागलेली तू विसरलास होत्या नोटा खिशातल्या ----------------------
Taxonomy upgrade extras

शतकांच्या बाद्शहाला सलाम

लेखक वासुनाना आले यांनी शुक्रवार, 07/11/2008 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर भारतिय क्रिकेटचा खंदा आधरस्तंभ तितकाच नम्र विनयशील आणी सच्चा खेळाडु तो जितका खेळाडु म्हनुन श्रेष्ठ तितकाच एक व्यक्ती म्हनुन ही श्रेष्ठ आहे याच सचिनने आपल्या कारर्किदीतील प्रतेक शतकांमधे कोनाचा ना कोनाचा हात आहे असे सांगुन त्यांना धन्यवाद दिले म्हनुनच मटा च्या बातमीचा संर्दभ यथे देत आहे नारंगी नागपुरात सचिनच्या गुलाबी शतकाचा साज चढला आणि जामठा गावचे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम पावन झाले!