बिहाराच्या प्राप्त स्थितीत आता बिहारी प्रजेने काय करावयाला हवे असा विचार माझ्या मनात आहे.बिहारी लोकांनी राजकिय भंपकपणा आणि उथळ प्रचाराच्या बाहेर यायला हवेच.
राहुल राज प्रकरणात / धर्मराज प्रकारात बिहारी राजकिय नेते एक येत आहेत असे दृष्य दिसले. त्याचे कारण म्हणजे त्यांना बिहारच्या अस्मितेचा कळवळा असे न समजता लो़काना दिशाभुल करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच मार्ग नाही हे आहे. आज नाही तर उद्या बिहारी लोकांनी त्यांना जाब विचारायला हवा की भारतातील गरीबी, शैक्षणिक दारिद्र्यता आणि विषमता आपल्याकडेच का आहे?
कोणी सुखासुखी आपला प्रांत सोडत नाही, बेरोजगारीने या गरीब लोकांना इतरत्र जावे लागते. यासाठी बिहारी नेते हेच जबाबदार आहेत.
अर्थात हे सर्वांना ठाउक आहेच. मात्र आपण / महाराष्ट्रातील नेत्यांनी तेथील वर्तमानपत्रात यावर लिहिले पाहिजे. हव्या असतील त्या जाहिरीती, आकडेवारी प्रसिद्ध केल्या पाहिजे. त्यामुळे बिहारच्या लोकांना काही तरी विचारप्रवृत्त करता येईल.
दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील कॉग्रेस, भाजपा, रिपा इत्यादी समान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपापसात विचारविनीमय केला पाहिजे. त्यासाठी अभ्यासदौरे आखले पाहिजे.याद्वारे चर्चा, संवादाने द्वेष आणि दुर्भावना कमी होऊ शकते.
तिसरा समान दुवा म्हणजे समान भाषा, जाती असल्याला लोकांचे संवाद व्हायला हवे. उदा, मारवाडी, गुजराथी, पंजाबी अथवा समान भाषासुत्र असलेल्या लोकांनी भेटी देऊन हा प्रश्न आपापल्या परीने सतत चर्चेत ठेवला पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सर्वोदयी अथवा अनेक निमसरकारी संस्था यानी विचारप्रबोधनाचे कार्य करावयालाच हवे.
अजून एक विचार येतो की सध्या आंतरजातीय विवाह होत असतात, मराठी मुले बिहारी मुलीशी जर लग्न करणार असतील तर सांस्कृ्तिक बंधन अजूनही घट्ट होतील, अर्थातच यावर प्रामाणिक विचार व्ह्यायला हवा.
सध्या निवडणुकांचा ज्वर येणार आहे. माहिती आणि प्रबोधनानेच हा विषय समजु आणि संपु शकतो.
ही संधी जर हातातुन गेली तर माहित नाही काय होईल ते?
१ ते १० वी पर्यंत आपण नेहमीच प्रति़ज्ञा केली होती, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.
बिहारच्या समस्येने आपण सर्व भारतीय म्हणून एक आलोतर या प्रतिज्ञापूर्तीचा आंनद नक्कीच वेगळा असेल.
बिहार ही समस्या न समजता संधी म्हणुन समजली तर.... यात भ्रष्ट नेत्यांची आहुती देता आली तर....बिहारचे नष्टचर्य आणि फुटीरता वाद्यांचे अस्तित्व या संकटातुन संपलेच पाहिजे.
वाचने
6056
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म
अ रे बा प रे
In reply to ह्म्म by इनोबा म्हणे
वस्तुस्थिती.
In reply to अ रे बा प रे by टारझन
वस्तुस्थिती.
In reply to अ रे बा प रे by टारझन
खरी वस्तुस्थिती
In reply to वस्तुस्थिती. by कलंत्री
हे मात्र आवडले नाही.
In reply to खरी वस्तुस्थिती by टारझन
तेच्या पेक्षा.....
In reply to अ रे बा प रे by टारझन
माझी सरळ
बिहार ही
हिंदीतील आलेले एक संगणकीय डाक / ढकल पत्र.
बिहार हा परका नाही
खरी समस्या....
In reply to बिहार हा परका नाही by हेरंब