Skip to main content

धिरडं (बालकथा)

लेखक शाल्मली यांनी सोमवार, 10/11/2008 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
धिरडं
मिसळपावचे पाहुणे संपादक ऋषिकेश यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ही बालकथा लिहित आहे. ही बालकथा माझी आजी मला लहानपणी सांगत असे. कोण्या एका काळी एका गावात एक भटजीबुवा राहत होते. घरोघरी पूजा सांगून ते आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरत असत. एकदा त्यांना शेजारच्या गावात पूजा सांगण्यासाठी बोलावणे आले. शेजारचे गाव थोडे दूर होते.

माझीही फोटोग्राफी

लेखक लंबूटांग यांनी रविवार, 09/11/2008 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
मला फोटोग्राफीमधील जास्ती काही कळत नाही. मॅन्युअल सेटिंग्ज वापरून काढलेले काही फोटो. Trial and Error करून ही छायाचित्रे काढली आहेत. Blur effect यावा म्हणून हे शटर स्पीड कमी करून काढलेले काही फोटो.

माझा फिरून- डोकं- वर काढणार्‍यांवर विश्वास होता.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 09/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
गावात आमच्या घराच्या समोर एक वाडा होता.त्याला अम्ही चांभारवाडा म्हणायचो.प्राथमीक शाळेत शिकण्याची त्यावेळी पण सक्ति असल्याने ह्या वाड्यातली बरीच मुलं आम्ही ज्या शाळेत जात असू त्या शाळेत शिकायला यायची.मी जवळ जवळ सातवी पर्यंत ह्या शाळेत शिकलो.आणि नंतर मुंबईला पुढच्या शिक्षणासाठी आलो.माझ्या शाळेत त्यावेळेला ह्या चांभारवाड्यातल्या मुलां पैकी पांडूरंग मोची नावाचा मुलगा होता.तो खेळायला हुषार असल्याने शाळेत तसा प्रसिद्ध होता.त्याची माझी शाळेतली ही ओळख त्यादिवशी खूप वर्षानी परत उजळणीला आली. मी चर्चगेट स्टेशनवर पाचपस्तिसच्या विरार डबलफास्ट गाडीची वाट पहात उभा होतो.

दिलिप चित्रे साहेबान्शि असहमत - पहा आजचा मटा - रविवार दिनान्क ९ नोवेम्बर २००८

लेखक चिन्कु यांनी रविवार, 09/11/2008 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे साहेब, आपल्या सारख्या थोर माणसाकडून इतकी मोठि चुक अपेक्षित नव्हती. हा देश "हिंदुस्थान" नसून "भारत" आहे. आपण "हिंदुस्थानी" शब्दाएवजी "भारतीय" शब्द वापरणे अधिक संयुक्तिक ठरले असते. असो. आपल्या सारखी माणसे अधिक आहेत महाराष्ट्रात आणि ती मराठीच आहेत याची आम्हाला देखील लाज वाटते. राज्यघटना वगैरे बोलायला ठीक आहेत हो पण नुसत्या बाता मारुन पोट भरत नाही. जर राज ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत ना. तर आपण योग्य मार्ग सुचवा. आपले हात तोंड कोणी धरले आहे. लोक आपले आभारच मानतील. आपल्या माहिती साठी सांगतो जो माणूस आपले घरदार सोडून दुसर्‍या ठिकाणी जातो तो पैसे कमवायला.

आय पील भाग -२

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 09/11/2008 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
The problem with I -pill is the way it is presented to population through ad blitz. It is an implement with its own complications few known today and few not known for now. The biggest of them is its extensive use as contraceptive than remedy to contraceptive failure once in a while. It is used by married/ unmarred couples like an aspirin tablet for headache. माझा मिपा वरचा वावर सूक्ष्मपणे न्याहाळणार्‍या माझ्या एका डॉक्टर सहकार्‍याचे हे मत. . ....... ह्या औषधाचा उपयोग खालीलप्रमाणे. १.

रबडी

लेखक स्वाती दिनेश यांनी रविवार, 09/11/2008 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य- २ लिटर दूध(जास्त फॅट असलेले), १ वाटीभर साखर, वेलचीपूड,केशराच्या काड्या, बदाम,पिस्त्यांचे काप,चारोळी कृती- मायक्रोव्हेव प्रूफ काचेच्या भांड्यात दूध घ्यावे, ८०० वॅटला ३ मिनिटे गरम करावे, दार उघडून ढवळावे.परत ३ मिनिटे गरम करावे. असे दूध निम्मे होईपर्यंत करावे. मग साखर घालून ढवळावे,परत ३ मिनिटे गरम करावे.ढवळून परत आटवावे. असे जितकी दाट रबडी हवी तितके आटवावे.दूध उतू जाणार नाही याकडे लक्ष द्यावे लागते. मी १०% फॅट असलेले कोंडेन्स्ड मिल्श घेते म्हणजे कमी आटवायला लागते. मायक्रोव्हेव नसेल तर आपल्या पारंपरिक पध्दतीने मोठ्या आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात दूध आटवावे.

ति........................

लेखक उम्मि यांनी रविवार, 09/11/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यान्दा ति मला दिसली तेव्हा मी ओफ़्फ़िस ट्रान्सपोर्टसाठी पिकअप पोइन्ट्वर उभा होतो. (तशी ति जागा मोक्याचि व स्टेशननजिक असल्यामुळे बरेच आय.टि वाले, बि.पि.ओ वाले, आणि बेन्केत काम करणारे आम्हि एकमेकान्चि सोबत करत बसची वाट पहात होतो.) आमच ओफ़्फ़िस एकच आहे, हे ति माझ्याच बसमध्ये चढ्ल्यावर समजल. मी तेव्हा नविनच जोइन केलेल. ति दिसायला अतिशय मोहक. वर्णाने निमगोरि.. नाकि-डोळि निटस... नाजुक चणीची.... मध्यम बान्ध्याची.....रेखिव चेहरयाची......त्या दिवशी बस ओफ़्फ़िसला पोहचेपर्यत मी एकटक तिच्याच कडे बघत होतो.

केरळ्चा पेरिप्प वडा

लेखक सायली पानसे यांनी रविवार, 09/11/2008 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
केरळ मधिल अतिशय चविष्ट वडा ..... महाराष्ट्रात बटाटा वडा तसा तिथे हा. साहित्य : तुरीची डाळ - १-१/२ वाटी आले - पाउण इंचा चा तुकडा हिरव्या मिरच्या- ३-४ ( तिखट आवडत असल्यास जास्त पण घेउ शकता.) कढिपत्ता- १५-१६ पाने (२-३ काठ्या) चिरुन घेणे कांदा- १ मध्यम आकाराचा.. बरिक चिरुन घेणे. जिरे- १/२ चमचा तिखट - १/२ छोटा चमचा मीठ - चवीनुसार हळद- १/२ छोटा चमचा हिंग- एक चिमुट कच्च्या तेलाचे मोहन - १-१/२ चमचा प्रथम तुरीची डाळ ४ तास पाण्यात भिजवुन घ्यावी.

केरळ चा पेरिप्प वडा

लेखक सायली पानसे यांनी रविवार, 09/11/2008 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
केरळ मधिल अतिशय चविष्ट वडा ..... महाराष्ट्रात बटाटा वडा तसा तिथे हा. साहित्य : तुरीची डाळ - १-१/२ वाटी आले - पाउण इंचा चा तुकडा हिरव्या मिरच्या- ३-४ ( तिखट आवडत असल्यास जास्त पण घेउ शकता.) कढिपत्ता- १५-१६ पाने (२-३ काठ्या) चिरुन घेणे कांदा- १ मध्यम आकाराचा..