दिलीप पुरुषोत्तम चित्रे साहेब,
आपल्या सारख्या थोर माणसाकडून इतकी मोठि चुक अपेक्षित नव्हती. हा देश "हिंदुस्थान" नसून "भारत" आहे. आपण "हिंदुस्थानी" शब्दाएवजी "भारतीय" शब्द वापरणे अधिक संयुक्तिक ठरले असते. असो.
आपल्या सारखी माणसे अधिक आहेत महाराष्ट्रात आणि ती मराठीच आहेत याची आम्हाला देखील लाज वाटते. राज्यघटना वगैरे बोलायला ठीक आहेत हो पण नुसत्या बाता मारुन पोट भरत नाही. जर राज ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत ना. तर आपण योग्य मार्ग सुचवा. आपले हात तोंड कोणी धरले आहे. लोक आपले आभारच मानतील. आपल्या माहिती साठी सांगतो जो माणूस आपले घरदार सोडून दुसर्या ठिकाणी जातो तो पैसे कमवायला. त्याचे घरदार तेथे नसते त्यामुळे तो माणूस काहीही काम करायला आणि कितीही वेळ काम करायला तयार असतो. कारण त्याचे उद्दिष्ट पैसे कमावणे हे असते. अशी कितीतरी मराठी माणसे माझ्या माहितीत आहेत जी दुबई, आखातात काम करतात. अगदी दिवसाचे १६-१६ तास देखील कामे करतात. त्यामुळे मराठी माणसे आळशी आहेत वगैरे बोलणे चुकीचे आहे. एक वस्तुश्तिति लक्षात घ्या जयाचे घरदार एथे आहे त्याला घरची देखील कामे असतात त्यामुळे तो दिवसाचे कितीही तास कितीही कमी मजुरीवर तो राबू शकत नाही. ह्या वस्तुस्थिती कडे हेतुपुर्वक दुर्लक्ष करून आपली विद्वता दाखवू नका. मालक लोक आपले पैसे वाचवण्यासाठी परप्रांतीय मजदूर घेतात. कारण ते कमी पगारावर काम करतात ह्याचे मुख्य कारण ह्याना तेवढे देखील पैसे त्यांच्या राज्यात मिळत नाहीत. त्यांच्या दृष्टीने हा पगार खूपच असतो. परंतु एथे घरदार असणारा माणूस तेवढ्या कमी पैशात कसे काम करेल ह्याचा ही विचार करा. आपले डोके जरा चालवा आणि ह्यावर मार्ग सुचवा.
आता राज ठाकरे ह्यांच्याबद्दल, जो माणूस काम करतो ना त्याच्याकडुनच चुका होतात. मान्य आहे राज ठाकरे चुकले असतील पण ह्याचाच दुसरा अर्थ असा की ते काहीतरी काम करत आहेत. भले त्यांच्याकडून चुका झाल्याआसातील पण चुकांतुनच माणूस शिकतो, तसे ते ही शिकतील आणि योग्य मार्ग निवाडतील. पण आपल्या सारख्या विद्वानानी देखील योग्य मार्ग सुचवावा ना.. आणि एवढे तरी मान्य करा की राज ठाकरे ने इच्छा तर दाखवालीय स्थानिक लोकांसाठी काही करायची. त्याच्या मार्गात फुले टाकु शकत नसाल तर निदान काटे तरी पसरू नका...
वाचने
6474
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
न्याय सारखाच असावा
अदिती ---असहमत
चौरीचोरा
In reply to अदिती ---असहमत by वेताळ
एक दुरुस्ती
In reply to चौरीचोरा by ३_१४ विक्षिप्त अदिती
पन अदिती
पुन्हा तेच..
In reply to पन अदिती by वेताळ
बिहार्या
In reply to पुन्हा तेच.. by अभिरत भिरभि-या
कंटाळा आला आहे पण तरीही ....
In reply to बिहार्या by रम्या
एंप्लॉयमे
In reply to कंटाळा आला आहे पण तरीही .... by ३_१४ विक्षिप्त अदिती
बर्याच मराठी वर्तमान पत्राच्या विभागवार आवृत्या निघतात....
In reply to एंप्लॉयमे by llपुण्याचे पेशवेll
राज ठाकरे, मराठी अस्मिता की स्थलांतरचे राजकारण?
त्या
???
पण मला हा चित्रे त्याचा लेख वाचल्यावर कळाला
दिलीप चित्रे, विचार, संस्कॄती आणि प्रकटन.
अतिशय योग्य आणि मुद्देसुद प्रतिसाद पेशवे.
कन्नड भाषा.
तिच तर मोठी गंमत आहे.
किंचित अवांतर
In reply to तिच तर मोठी गंमत आहे. by अनामिका
नाशिक
In reply to किंचित अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
मराठी माणूस
दोन निरिक्षणे
तुझा मुद्दा मान्य
आगे बढो अनामिका
सर्वसाधारण विधान??
मराठी माणुसच मराठीच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर उठलाय.
बरोबर. बिहा
योग्य प्रतिसाद