Skip to main content

दर्शन भारत मातेचे (भाग २)

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 19/11/2008 00:49 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई-पुणे दृतगती मार्गावरुन पुण्याला वळसा घालून शिक्रापूर मार्गे अहमदनगर-बीड असा आमचा प्रवास सुरु झाला. अद्यापपर्यंत दृतगतीमार्गावर दोनवेळेला टोल भरला होता. पण वाचलेल्या वेळामुळे अन हा महामर्ग नसताना पूर्वीच्या मार्गावर अनेकदा तासन तास घालवल्याच्या आठवणी विसरलेल्या नसल्याने हा टोल भरताना काही वाटले नाही. पुढे पुण्याच्या वळणरस्त्यावर असताना बंधू म्हणाला, "अण्णा, पुढच्या वळणावर काही तरी गडबड असणार आहे". मी चमकलोच. "तुझा अध्यात्मातला अभ्यास चांगला आहे. पण तुला भविष्य कधिपासून कळायला लागले?" मी प्रश्न टाकला. तसे आम्ही त्या वळणापर्यंत पोचलो होतो. आणि काय आश्चर्य तेथे एक अपघात झालेला होता.

दिलखुलास

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 19/11/2008 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज झी मराठी च्या लिट्ल चॅम्प्स चा कार्यक्रम पाहिला आणि शंकर महादेवनला मानला! शंकर महादेवन आजचा पाहुणा परिक्षक होता आणि शंकर महादेवनने आपल्या दिलखुलासपणाने सर्वांना जिंकुन घेतले. एका प्रथितयश कलाकाराने उमलत्या कलाकारांना ज्या उस्फुर्तपणे, ज्या उत्साहाने आणि ज्या पद्धतिने दाद दिली त्याला तोड नाही. परिक्षक हे बहुधा स्पर्धकांचे कौतुकच करतात, काही सल्ल्ला वा सुचना देतात आणि प्रोत्साहनही देतात, कधी सौम्यपणे त्रुटी नजरेस आणुन देतात. मात्र 'मी' पण विसरुन सर्व बालस्पर्धकांचे कौतुक शंकर महादेवनने केले त्याला दाद दिलीच पाहिजे. अगदी पहिली फेरी हिंदी गाण्यांची होती.

<पुन्हा पुन्हा मी!!!!>

लेखक पिवळा डांबिस यांनी बुधवार, 19/11/2008 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा पुन्हा मी!!!> (श्री प्रवीण खेर्डेकर यांच्या "पुन्हा पुन्हा मी" या कवितेवरून प्रेरणा घेऊन.......) जीवनात नसेल टिकवले ब्रम्हचर्य आम्ही हात अधिक महत्वाच्या कामामध्ये व्यस्त आहे... असे उठसूठ बोंबा मारत जाऊ नका डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? बेवडे म्हणून जीवनभर आम्हाला हिणवता.... श्रीखंड पुढ्यात आलं की कोणाला बनवता? आम्ही असू "टल्ली", पण तुमच्यात संयम किती पक्का आहे? असे डोळे फाडून पाहू नका डांबिस व्हायचं म्हणजे काय चेष्टा आहे? तुम्हाला पोरगी पटत नाही, याचा दोष आमच्यावरच आश्रमात कितीही शिकवा, तुमचे घोडे आडवळणावरच.... असा अन्याय आमच्यावर करणं किती रास्त आहे? असे स्मायली टाकून सट
Taxonomy upgrade extras

प्रयोजनाविण दिवा एकटा . .......... मरण न येण्याची स्थिती

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 18/11/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
प्रयोजनाविण दिवा एकटा, उगाच जळतो आहे सरत्या वातीसरसे जळते, भोग जाळतो आहे काजळ काळ्या काचेमधुनी, हवा मागतो आहे जळत्या तेलासरसे उरले, थेम्ब मोजतो आहे किती उजळल्या खोल्या आणिक, किती जाळल्या वाती भिंती पडल्या वासे तुटले, तुटली उरली नाती आता जगणे असेच जगणे, उरे न काही हाती जगता जगता जळता जळता, संपून जाती वाती -- सागरलहरी (उर्फ लहरी सागर) माझे हे मि पा वरचे पहिलेच लि़खाण आहे. मला छंद वगैरे कळत नाही. सूचना व अभिप्रायांची प्रतीक्षा. पार्श्वभूमी - माहीतीतील एक गृहस्थ पक्षाघाताने आजारी होते. वृद्ध .. विधुर.. आयुष्य .. सुखे दु:खे सारे पाहून सोसून झालेले ..

पसंत अपनी अपनी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 18/11/2008 22:34 या दिवशी प्रकाशित केले.
"आई चांगली की मावशी? " असं कुणी विचारलं तर आपण काय आणि कसं उत्तर देऊ? त्यातलाच प्रकार एका व्यक्तीच्या मनात आला.
Taxonomy upgrade extras

(अ)निवासी

लेखक कोलबेर यांनी मंगळवार, 18/11/2008 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर सगळी माणसे निवासी काय अनिवासी काय. साले एनाराय तिकडे बसुन मजा मारतात वर इकडच्या नावाने बोटे मोडतात तिकडच्या थंडगार हापीसात बसून इथल्या भुकबळींवर चर्चा रंगतात.. "अरे इतकीच काळजी वाटते तर या ना परत भारतात" मग अनिवासींनी मांडायचा डॉलरचा हिशोब गेल्याच महिन्यात पाठवलेल्या वनवासी कल्याण आणि आश्रम शाळेला त्यासोबत एक सल्ला सार्‍या निवासी जनतेला "दान धर्म सोडा,निदान वेळच्या वेळेला इन्कम टॅक्स भरा.." शेवटी अनिवासी काय निवासी काय? हजारातला एखादा बाबा आमटे तर हजारात नउशे बाबा भामटे काही निवासी भामटे तर काही अनिवासी भामटे.

पुन्हा पुन्हा मी

लेखक द्विज यांनी मंगळवार, 18/11/2008 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनात नसेल मिळवले "आरक्षण" आम्ही कारण आमची स्वतःवर निष्ठा आहे असे उठ्सुठ बोम्बा मारु नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कर्मठ म्हणुन जीवभर आम्हालाच हीनवता चतुर्थीला बोलावुन कोणाला तुम्ही बनवता ? आम्हाला जातिवादी म्हणणार्या॑नो तुमच्यात स॑यम किती पक्का आहे ? असे डोळे फाडुन बघू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? कितीही तुम्ही पुढे जावो बोट मात्र आमच्यावरच आम्ही शान्त्ततेचे घोट पिले तरी घोडे आड वळणावरच हा अन्याय न्यायदेवतेच्या डोळ्यामध्ये चिपडासारखा पक्का आहे असे बोट दाखवुन हिनवू नका ब्राम्हण म्हणजे काय चेष्टा आहे ? काळाच्या ओघात परिस्थितीसमोर नमते आम्ही घेतले घेतले त॑ घेतले सारे जीवावरच ब

खेळ दोन ओळींचा - २

लेखक राघव यांनी मंगळवार, 18/11/2008 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ मागल्यावेळी सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी - खळाळत्या नदीतीरी सांज घेते ठाव ..... पुढची ओळ काय होऊ शकेल ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं. हि कविता नाही. त्यामुळे फक्त दोनच ओळी असणारेत. अट एकच, वर लिहिलेल्या पहिल्या ओळीशी निगडीत अशीच दुसरी ओळ असायला हवी! मागल्यावेळी तर भन्नाट डोकी चाललेली.. यावेळी बघुयात कसे काय जमते ते! मुमुक्षु :)

गारवा कृपेचा..!

लेखक राघव यांनी मंगळवार, 18/11/2008 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानाचीया डोहा जाऊ मी कशास, चरणांची आस मजलागी | माऊलीचे प्रेम, झरा करुणेचा, गारवा कृपेचा, पुरेसाहे | नका घेवू आता दासाची परीक्षा, तीच गोड भिक्षा मज द्यावी | तुम्हा माझी आण, पुरवा तहान, दर्शनास प्राण व्याकूळले | मुमुक्षु
Taxonomy upgrade extras

अहिराणी बोली भाषा ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये) हि मराठी (च) बोली भाषा आहे.

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/11/2008 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
येथे अहिराणी बोली भाषा कुणाला येते आहे? ( आत्ताच्या आंदोलनाचा काहिही सबंध जोडू नये) हि मराठी (च) बोली भाषा आहे. आठे अहिराणी कोन्ले यस ? अहिराणी हाई भासा खानदेस मधार बोल्त्स. (जळगाव, धुय, नंदुर्बार आन नाशिक ना काही भाग) कवयत्री बहिणाबाई, कवी महानोर आठलाच शेतस. मना बाप नी सटाणा (बागलाण) ले बदली व्हती तव्हळ हाई भासा जराशीक शिकनू. हाई भासा बू (लै) भारी शे.