'शिववडा पाव' विरुध्द 'कांदे-पोहे'?
महाराष्ट्रातील सध्याच्या अनेक घडामोडी पाहता नजिकच्या काळात विधानसभा निवडणुका कधीही होऊ शकतात यात शंका नाही. मराठी- अमराठी वाद, मराठा आरक्षण याचबरोबर आता ही राजकीय कुरघोडी मराठी खाद्यपदार्थांपर्यंत पोहोचली आहे.
शिवसेनेने नुकताच शिवाजी पार्क वर वडा पाव संमेलन आयोजीत केले होते. महाराष्ट्रातील २७ नावाजलेले वडापावचे स्टॉल्स होते. त्यातील एकाला शिववडापावचे हक्क मिळणार आहेत.
मिपाच्या लेखनपट्टीवर आमचं दुसरं शतक.आंकडेमोड- वाचक हो,तुमच्यासाठी!
(सैनिक हो,तुमच्यासाठी ह्या गाण्याचा आधार घेऊन)
आज जणू झालो आम्ही सचीन तेंडूलकर
दोन शतके लेखनाची लिहूनी मिपावर
येती हे शब्द तुम्हा सांगण्या अमुच्या ओठी
वाचक हो, तुमच्यासाठी
लिहीत लिहीत आम्ही नित्यकर्म अवघे करतो
वाचतो अपुल्या क्षेत्री लेखनाची स्फुर्ती घेतो
परी आठव येता तुमची प्रेरणा स्फुरतसे बोटी
वाचक हो, तुमच्यासाठी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी न थारा
राहूनी पश्चिम देशी लक्ष अमुचा मायदेशा सारा
आठवणी तिकडच्या येऊनी डोळ्यात होतसे दाटी
वाचक हो, तुमच्यासाठी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
विषय अनेक जमती काय लिहू याची नसे खात्री
स्वपनात येऊनी कविता काळजा खुलविते देठी
वाचक हो, तुमच्यासाठी
बळी राजा....
गाळुनि घाम
करी रात्रनदीन काम
कधी कुलव पाभर
कधी सोबत नांगर
खेळ जीवनाचा त्यानं
असा मातीत मांडला.
मागतो दान दैव
त्याच्याशी भांडला.
धरनी आईच्या कुशीत परितो
सा-या स्रुष्टिच धन
भल्या आभळा एवढ
गड्याच मोकळ मन
बरसती नभ पडतात धारा
धरनी आईच्या कुशीला मग फूटे पाण्याचा पाझर
पेरितो रान सार
मग पुन्हा मुखी पांडूरंगाचा गजर
फुलून येत रान त्याच
जसा मोराचा पिसारा
आता खुलुन आल सपान त्याच
त्याच्या दुखाला थोडा इसरा
फूले त्याच रान
दारी सावकार उभा
७/१२ च्या उता-यावर वाढलेला
पिढयान पिढयानचा तो बोजा .
लड़की लेक त्याची मैना
हाती घेउन गोफन उभी ती पिकात
ओठी गाण्यांची लकेर
पाखरांचा थवा उड
Taxonomy upgrade extras
काही कविता.
टरकावलेला चतकोर
तुकडा कागदाचा.
हवातसा वारा आल्यावर
मिजासखोर पतंग झाला.
हक्काचे आकाश
मागायला मोकळा.
---------------
अल्लाद टिक्करबिला खेळणारा अंगठा.
उंबर्यात ठेचकाळून पुन्हा पुन्हा
रक्ताळला काळानिळा.
आता,
घरभर लंगडी लंगडी.
-------------------------
बारीक दाताच्या फणीनी
आयुष्याची एकेक बट विंचरून
मी विचारलंच ,
ठकूबाई,ठकूबाई,
जाणार कुठे गं
होमसीक झाल्यावर.
--------------------------------
एकेक वर्षं उसवत गेलं
अंगणापासून चौकापर्यंत
चिंध्यांच्या चेंडूंसारखं.
कृष्णा,पुरे झाल्या का
भरजरी शालूच्या धांदोट्या.?
--------------------------------------
(पतंग,टिक्करबिल्ला, ठकू बाहुली,चिंध्यांचा चेंडू या
Taxonomy upgrade extras
नार्को ! एक दिलखुलास मुलाखत...
हेमंत करकरे यांनी काल अतिरेक्यांशी सामना करतांना हौतात्म्य पत्करले. केवळ दोनच दिवसांपूर्वी मी एकंदर एटीएसच्या कारभाराबद्दल एक उपहासात्मक मुलाखत लिहिली होती.
त्यांचा आता मृत्यू झालेला असतांना इतका ताजा लेख इथे असणे मला माझ्या हिंदू संस्कारांमुळे अनुचित वाटते म्हणून तो लेख अप्रकाशित करत आहे.
खालील प्रतिक्रियांना मी प्रतिसादात उत्तर देत आहे.
माझी पहिली क्रिकेट मॅच...
१० वी ला होतो...आपण कधी क्रिकेट खेळत नव्हतो..पण असे ठरले होते की प्रत्येक वर्गातला एक संघ असायला पहिजे..मग काय मला पण नाईलाजाने घेतले..दोन दिवस प्रक्टिस केले...कॅप्टन च्या लय शिवा खालल्या..पण करणार काय्...एक कॅच नाय का एक रन नाय्...पण आपल्याला रावल्याची बॅट लय खास वाटली..त्या बॅटने मी एक फुल सिक्स मारला होता..बॅट हातात बसली होती..
.
प्रॅक्टिस थोडीसी झाली होती...थोडाफार टुकुटुकु खेळु शकत होतो असे दिसत होते..
आणि मग काय मॅच चा दिवस आला.....पहिली बॅटिंग विरोधी टीम ची १० ओव्हर ८४ धावा काढल्या...आणि मी ८४ हजार खाल्ल्या शिवा..साला मी जिथे उभा होतो तिकडेच बॉल हवेत यायचा....एक नाय दोन नाय ६ कॅच स
तो षटकार!!!
शाळा-कोलेजात असताना, आम्ही क्रिकेट जाम खेळायचो बुवा! मी आणि माझे बरेचसे मित्र कोलेज सुटले रे सुटले कि क्रिकेट्साठी जमायचो अन अगदी काळोख होइपर्यत खेळायचो. जेवणाची वेळ, चहा याची जराही आठवण नसायची तेव्हा......
आमच्या खेळण्याच्या २ जागा होत्या, एक हायवे जवळ असलेला 'सर्विसिंग रोड', आणि दुसरी म्हंजे 'अलकनंदा मैदान'.
तसा मी क्रिकेट्च्या सर्वच क्षेत्रात (फंलदाजी, गोलदाजी व क्षेत्ररक्षण) पांरगत होतो. म्हंजे रेकार्डच तसा होता आपला...समोरच्या फंलदाजाने चेंडु उंचावर टोलावला असेल, आणि खाली का जर मी क्षेत्ररक्षणासाठी असेन तर आमच्या टीमचा गोंलदाज जराही जोशमध्ये न येता गपचुप बोलिंग मार्कवर जात असे.
ह्या लाजिरवाण्या घरात....
२/३ दिवस घरी काही कारणामुळे लवकर जात होतो रात्रीचा, त्यामुळे टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो ! परमेश्वरा, अरे काय अर्थहीन आणी महामुर्ख मालीका असतात हो ह्या टि.व्हि. वर.
एक मुलगा अपंग, एका मुलाची बायको माहेरच्या श्रीमंतीचा प्रचंड माज असलेली आणी त्याला कयम चुकीचे सल्ले देणारी, मुलगी वेडी आणी हरवलेली, वडिलांना अर्धांगवायुचा झटका आलेला आहे आणी ते कमी कि काय म्हणुन ते तुरुंगवारी सुद्धा करुन आले आहेत येव्हड्यातच. आणी मालीकेचे नाव काय तर म्हणे 'ह्या गोजिरवाण्या घरात'. डोंबलाचे गोजिरवाणे ?
निरभ्र
झाकोळल्या सावल्यांनी
हुंकार असा का द्यावा
डोळ्यांतला तुझा तो
मज मारवा स्मरावा
कागदावर झरझर अक्षरं उमटत जातात...
दिवसही एखादा असा येतो की आठवणी दाटून येतातच. सकाळच्या वेळी तर हमखास. दाटून येतात त्याही संध्याकाळच्याच आठवणी...
'काय करते आहेस?' आधी 'तू नभातले तारे...'ची गुंजारव. त्याच्या कॉलसाठी आपण लावून ठेवलेली. आणि त्यापाठोपाठ त्याचा प्रश्न. नेहमीचाच. वेळही नेहमीचीच. पश्चिमेला गुलाबी छटा येतात तीच. एक छोटासा संवाद आणि नदीकाठी पुलावरची भेट. नदीही साथ देणारीच. पूर्व-पश्चिम. त्यामुळे पुलाचे दोन्ही कठडे त्या दिशांना. आपण बसायचो तो पश्चिमेचाच.
मिसळपाव