Skip to main content

आझम अमीर कसाब यांस अनावृत्त पत्र

लेखक येडा खवीस यांनी शनिवार, 06/12/2008 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
श्री आझम कसाब, नमस्कार, खरा म्हणजे तुला नमस्कार करायला नकोय...तुम्ही एवढा मोठ्ठा चमत्कार दाखवल्यावर आमच्या हिंदु प्रथेनुसार मी तो केलाय. तु आणि तुझ्या सहकाऱ्यांनी मुंबईवर दहशतवादी हल्ले करुन आम्हाला पार जेरीला आणलेस, जवळपास २०० नागरिक, कार्यक्षम दक्ष पोलिस अधिकारी यांचे बळी घेऊन मगच तुमच्या बंदुका थंडावल्या. परवा गेटवे ऑफ इंडीयावर झालेल्या रॅलीतुन यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की, आता नागरिकच जागे होतायत. राजकारणी आणि एकंदर ब्युरोक्रसी किती होपलेस आहे ते आता सगळ्यांना समजलय( निदान त्यामुळे २०० जणांच्या आत्म्यांना गती मिळेलंस दिसतय)...तुमचा हल्ला हा एक भ्याड हल्ला होता असं मी काही म्हणणार नाही.

आपल्याला काय करता येईल?

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 06/12/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिसळपाववर चांगली चर्चा झाली आणि होत आहे. दुर्दैवाने आपल्या हातात चर्चा करण्याशिवाय फारसे काही हातात नाही असे वाटते. एकूण सामान्य पापभीरू मंडळी एखाद्या झुरळाला मारताना सुध्दा हजारवेळा विचार करणार. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज राज्यकर्त्यांचे आणि सध्याच्या काळात दहशतवाद्यांचे रक्ताचे पाट वाहवणे आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ठराव पास करत होतो आणि सध्या चर्चा करत आहोत.

खेळ खुर्चिचा

लेखक मनोज यांनी शनिवार, 06/12/2008 15:56 या दिवशी प्रकाशित केले.
खेळ जुना खुर्चिचा हा पुन्हा नव्याने चालला जे गेले बळी त्यांचा खेद कुणा वाटला? कोण आले? कोण गेले? मारीले कुणी ? कोण मेले? सत्तेचे भुकेले बघ पुन्हा प्रवासा निघाले आतंकाचे कुंड जळते अन मुक्यांच्या आहूती कोणी रक्षावे कुणाला? षंढ सारे भोवती विध्वंसाचे पर्व मोठे आघात त्यांचे विषारी हात व्यस्थ रक्षकांचे खुर्चीचे सारे पुजारी हे नित्याचेचा आता सवय याची लाउन घे मेले त्यात तु नव्हता धन्यता मानुन घे
Taxonomy upgrade extras

"वाद"

लेखक अभिज्ञ यांनी शनिवार, 06/12/2008 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
"वाद" गेले बरेच दिवस सातत्याने मिपावर ,मुंबई वरिल अतिरेक्यांच्या हल्यामुळे त्याविषयी इथल्या सदस्यांनी वेगवेगळ्या धाग्यांमधून आपली मते हिरिहिरिने मांडलि. अतिरेक्यांच्या पोषणकर्त्या पाकिस्तान वर भारताने थेट हल्ला करावा पासून ते गांधीवादाने अतिरेक्यांना कसे पराभूत करता येइल वगैरे अनेक विचार समोर आले. वाचताना ब-याच वेळा गांधी"वाद" हा शब्द नजरेत आला. त्यातून एक विचार समोर आला म्हणजे कि हे व्यक्ति जन्मित "वाद" किंवा "ism" हे कालातीत असतात काय? गेल्या शतकाच्या सुरुवातीला रशियात व पुर्व युरोपात भांडवलशाहीच्या विरोधात कार्ल मार्क्सचा "साम्यवाद" वा "कम्युनिझम" जन्माला आले. त्यालाच पुढे "मार्क्सवाद" अस

इंटरनेटवरही आंबेडकर उपेक्षितच...

लेखक विकि यांनी शनिवार, 06/12/2008 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरनेटवरही आंबेडकर उपेक्षितच... मटाची बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3798972.cms येथेटिचकी मारा. आणि आपली मते कळवा. आज ६ डिसेंबर त्यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना प्रणाम !

पाकिस्तानने भारतीयांवर केलेली चिखलफेक

लेखक माझी दुनिया यांनी शनिवार, 06/12/2008 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच मला ईमेल ने आलेल्या ह्या लिंक्स पाहिल्या….आणि धक्काच बसला. पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर मुंबईतल्या अतिरेकी हल्ल्यावर्चा परामर्ष घेण्यात आला आहे. त्यात ज्या दोन व्यक्तिंच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत त्यापैकी एकाने सदर हल्ला भारतीय लष्करानेच केलेला आहे आणि पाकिस्तानवर उगाचच आरोप केला जात आहे असा जावईशोध लावला आहे. दुसर्‍या व्यक्तिने तर हल्ला भारतात झाला आहे; भारतात स्वत:च्या इतक्या बंडखोर चळवळी चालू असताना पाकिस्तानवर आरोप करताना भारताने विचार करायला हवा. शिवाय त्यांच्याकडे तसे काही पुरावे असतीलच तर त्यांनी त्यांचा ( रॉ ) ऑफिसर इथे पाठवायला हवा पुरावे घेऊन. आमच्या माणसाने तिथे का जावे ?

अतिरेक्यांचे निर्मूलन यावरील समारोपीय लेख.

लेखक कलंत्री यांनी शनिवार, 06/12/2008 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या विस्तीर्ण अशा भूभागावर असंख्य लोक अनेक शतकापासून राहत असावेत. अनेक संकटांना एकत्र सामोरे जात असावेत, अनेक प्रथा-परंपरा समान असाव्यात. सांस्कृतीक इतिहास हा समान धागा असावा पण दुर्दैवाने काळाच्या ओघात एक विभाजन व्हावे. एकाच रात्रीत यातील लोकांची भूभागाच्या आधारे विभागणी व्हावी हे कदाचित तर्कसंगत असू शकेल. पण या विभाजनानंतर मात्र हे लोकांनी परस्परांना वैरी समजावेत आणि त्यांच्या निर्मूलनाचा एक कलमी प्रयत्न करावा अशी घटना काल्पनिक नसून वस्तुस्थिती आहे. प्रसंगी तृण खाऊ पण दुसर्‍या देशाचा नाश करू अशा प्रति़ज्ञा कराव्यात.

गझनी बघण्याआधी ....

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 06/12/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
लोकांच्या आनंदावर विरजण घालणे हा आमचा आवडता छंद नव्हे जणु काहि आम्ही त्यासठिच जन्म घेतला आहे हि आम्हास खात्री आहे. अमीर खानच्या गझनी ची जे चाहते डोळ्यात प्राण आणुन वाट पहात आहेत त्यांना आत्ता पर्यंत ह चित्रपट कोणा तामिळ का तेलगु मुव्हीचा रिमेक आहे हे कळाले असेलच ! पण खरे तर हा चित्रपट २००० साली आलेल्या "Christopher Nolan" ह्याच्या "Memento" ह्या चित्रपटाची भ्रष्ट नक्कल आहे. जगातल्या श्रेष्ठ २५० चित्रपटांमध्ये ह्याचा २८ वा नंबर लागतो. अत्युच्च अभिनय आणी प्रत्येक प्रसंगात जाणवणारा दिग्दर्शकाचा ठसा हे "Memento" चे वैशिष्ठ्य.