एखाद्या विस्तीर्ण अशा भूभागावर असंख्य लोक अनेक शतकापासून राहत असावेत. अनेक संकटांना एकत्र सामोरे जात असावेत, अनेक प्रथा-परंपरा समान असाव्यात. सांस्कृतीक इतिहास हा समान धागा असावा पण दुर्दैवाने काळाच्या ओघात एक विभाजन व्हावे. एकाच रात्रीत यातील लोकांची भूभागाच्या आधारे विभागणी व्हावी हे कदाचित तर्कसंगत असू शकेल. पण या विभाजनानंतर मात्र हे लोकांनी परस्परांना वैरी समजावेत आणि त्यांच्या निर्मूलनाचा एक कलमी प्रयत्न करावा अशी घटना काल्पनिक नसून वस्तुस्थिती आहे. प्रसंगी तृण खाऊ पण दुसर्या देशाचा नाश करू अशा प्रति़ज्ञा कराव्यात. या वस्तुस्थितीच्या दोन्ही देशाचे नाव आहेत भारत आणि पाकिस्तान.
२० व्या शतकाने अनेक शोध लावले अनेक नव्या कल्पनांना जन्म दिला. सर्व जगाचे एका प्रकारचे मापदंड आणि जीवन प्रणाली होऊ लागले पण या शतकाने सर्वात भयंकर अशा शोधाला जन्म दिला आणि तो म्हणजे राष्ट्राच्या सीमा. अनेक साम्राज्ये आली आणि गेली, पण या राजवटीत सामान्य माणसे, श्रमण,फकीर, संन्यासी, व्यापारी आणि कलावंत यांचे चलनवलन अबाधित पणे चालू होते. एक दिवस आला आणि देशाचे जाती, धर्मावरून विभाजन झाले आणि कायमस्वरुपी एकच सांस्कृतिक परंपरा निर्मितीला आळा बसला, इतके असते तर क्षम्य राहिले असते. आता एकत्र असणे, बंधुभाव असणे या ऐवजी लोकामध्ये द्वेश आणि दुर्भावनेने निष्पापांची हिंसा करावी असे गालबोट १००० वर्षाच्या काळखंडाला लागले. १०/१२ जण येतात, अत्याधुनिक शस्त्र सामग्री आणतात आणि शेजारी राष्ट्राच्या लोकांची अमानुषपणे हत्या करतात. केवढे हे क्रौर्य? अर्थातच या क्रौयाचा अंत दुप्पट अशा क्रौर्याने, बळाने होईल का? होईलही कदाचित. जगाचे अंतरंग बदलले आहे, अनेक पैलूंनी जगाचे राजकारण ग्रस्त झाले आहे. अनेक संस्कृती नष्ट झाल्या तसे आजची संस्कृती अशा मूठभर वेड्या माणसाच्या आतताईपणामुळे नष्ट होईल का या काळजीने केलेला हा लेखप्रपंच.
१९४७ ला या खंडप्राय देशाचे विभाजन झाले. त्यातल्या भारत नावाच्या देशाने शांततेची कास धरली. धर्माचे नावाने होणारे विभाजन अमान्य केले. धर्म, वंश, जात, वर्ण आणि भाषा अशा निकषाचे आणि असमानतेचे जे काही अस्तित्व होते ते मिटवण्याचे प्रयत्न सुरू केले. देश मोठा, सा़क्षरता कमी. परंतू पण प्रत्य़क्ष हिमालयाला खुजेपण वाटावे असे नेते, कार्यकर्ये असल्यामूळे सगळ्याच ठिकाणी यशाची चाहुल दिसू लागली. लोकांना आनंद वाटू लागला. वि़ज्ञान, तंत्रज्ञान, भाषा इत्यादींच्या प्रगतीने देश जगाच्या प्रगतिशील देशामध्ये जाऊन बसू लागला. कदाचित लवकरच महासत्ता होईल अशी भाकिते होऊ लागली.
दुसऱ्या पाकिस्तान या देशाने मात्र विपरीत मार्ग स्वीकारला, कोणा बलाढ्य देशाचे हित करण्यासाठी आपण त्याचे पाद्ये व्हावे असा हट्ट निर्माण झाला. इकडून तिकडून शस्त्र साह्य घ्यावे आणि हल्ला करावा, पण ज्या देशाचे ईश्वरच हालाहाल पचवणारे आहेत त्याला अशा हल्ल्याने काय फरक पडणार? या प्रक्रियेत धर्माच्या नावाने वेगळे झालेले पाकिस्तान मात्र दोन भागात विभाजित झाले.
असो. सरळच्या युद्धाने लाभाऐवजी नामुष्कीच पदरी पडू लागली, मग माणसकीला परागंदा झालेल्या या देशाने मात्र अतिशय कुटील डाव खेळला. मूठभर माणसे जमा करावी, त्यांना काही आमिषे दाखवावी, नाहक अशा हिंदू-मुस्लिमाचा वैराचा बागलबुवा दाखवावा, थोडेफार सैन्य प्रशिक्षण द्यावे आणि भारत देशावर नियोजित हल्ले करण्याचे पाठवावे. त्यांच्या दुर्देवाने, अशा प्रयत्नाने हिंदू-मुस्लिम दंगे व्हावे,यादवी व्हावी अशी नतद्रष्ट ईच्छा मात्र फलद्रुप होईना. जनक्षोभ क्षमेना, युद्ध हवे, युद्ध हवे असा आक्रोश सुरु झाला. राजकारणी लोकांना फक्त कसेही करून राज्य हवे, प्रशासनाला सबबी हव्यात, या सर्वात आपल्या १००० वर्षाच्या समृद्ध अशा परंपरेचा बळी जातो का म्हणून केलेला हा लेख प्रपंच.
शेवटी या हल्ल्याचे स्वरूप आणि त्याला संभाव्य येऊ शकणारी शक्यता पाहून आमच्या मनातील १००० वर्षाच्या पुण्यश्लोक पूर्वजांच्या माणसाचे स्मरण झाले. त्यांचा प्रयोग आणि निष्कर्ष होते, प्रेम, अहिंसा आणि माणुसकी. त्यायोगे कोणतेही लक्ष्य असाध्य नाही. कोणतेही वैर दिर्घगामी नाही.
यासाठी काही विचार आणि योजना या विस्तृतपणे अगोदरच मांडण्यात आले आहेच. ( भाग ३).
मागच्या ५० वर्षातील द्वेशभावना कमी व्हावी, गांधींनी सांगितल्या प्रमाणे एक राष्ट्र नाही तरी, चला आदर्श शेजारी तर होऊ या विचाराने प्रेरित होऊन भारत-पाक शांतता मंच अशा संघटनेचे ७/८ वर्षापुर्वी निर्मिती झाली होती. त्याच्या एका बैठकीला सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती. या मंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे अध्य़क्ष आपले माजी नौदल प्रमुख श्री रामदास हे होते. एका राष्ट्राच्या नौदल प्रमुखाने विरुद्ध देशामध्ये, त्याच्या नागरिकामध्ये शांतता, बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून प्रयत्न करावा याचे मला कौतुकच वाटते. या संमेलनाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे भारत -पाक मधील हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या विधवा आणि मुलांचा संघ आहे. त्या दोन्ही देशाच्या संघाचे अध्य़क्ष स्थान मात्र एकाच व्यक्तीकडे होते, त्या म्हणजे सर्वोदयी कार्यकर्त्या कै. निर्मलाताई देशपांडे. सैन्य शक्तिचा आणि विघायक शक्ती चा एकमताचा संगम अनोखा होता.
श्री रामदास यांनी सांगितलेला प्रसंग, निवृत्ती नंतर त्यांनी भारत-पाक मैत्री या कार्याला वाहून घेतले होते. अशा एका प्रसंगी ते पाक सैन्यप्रमुख मुशर्रफ यांना भेटायला त्यांच्या कार्यालयात गेले होते. मुशर्रफ यांनी त्यांना लष्करी सलाम केला. सैन्यातल्या प्रथेप्रमाणे शत्रू सैन्याच्या वरिष्ठ नेत्याला युद्ध नसताना भेटले तरीही त्यांना आपल्या वरिष्ठाप्रमाणेच मान द्यावा लागतो. शांततेच्या प्रयत्नात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.
रामदास सारख्या पूर्ण आयुष्य सैन्यदलात काढलेल्या व्यक्तिला सुद्धा मैत्री आणि शांततेचे मोल समजते. शेवटी युद्धाचा बळी सैनिक आणि त्यांचे नातेवाईकच असतात ना?
१९०४ मध्ये लाहोरमध्ये एका हिंदूमहाविद्यालयाचे संमेलन होते. त्या संमेलनासाठी त्यांनी एका २६ वर्षाच्या कवीला भाषणासाठी बोलावले होते. त्या कवीने मी भाषण देणार नाही पण एक काव्य ऐकवेल असे सांगितले. त्या प्रसंगी त्याने एक काव्य, ज्याला आपण 'तराना-ए-हिंद' नावाने ओळखतो. ते सादर केले. ते काव्य म्हणजे 'सारे जहॊंसे अच्छा, हिंदोस्तां हमारा'. हे काव्य अल्पावधीतच पूर्ण भारताच्या कानोकोपरी पोहोचले. त्या काव्याने त्याकाळच्या सर्वच तरुणांना एक विजयगीत दिले, भारताच्या १००० वर्षाचा इतिहास ५/६ कडव्यात रचला गेला. आसेतुहिंद तरुणांना आपले काव्य मिळाले, परकीयाविरुद्ध एक अमोघ शस्त्र मिळाले. या काव्यनिर्मात्याचे नाव होते, अल्लामा महंमद इक्बाल.
पाकिस्तानाची निर्मितीचे श्रेय या प्रतिभावंत कवीला देण्यात येते. पाकिस्तानच्या कल्पनेला धैर्य आणि नैतिकता या कवीमुळे आली असे आजही मानण्यात येते. आजही या कवीचा जन्मदिवस पाकिस्तानामध्ये राष्टीय सुट्टीच्या साहाय्याने मानण्यात येतो.
आश्चर्य म्हणजे यांचे आजोबा हे हिंदू होते. रामसरण सप्रू. हे अफगाण राजाच्या दरबारात एक विद्वान म्हणून प्रसिद्ध होते.
पाकिस्तानांचे दुसरे निर्माते म्हणजे कायदे आझम जीना. जीना यांचे जिव्हाळ्याचे सर्व मित्र हिंदूच होते. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर त्याला राष्ट्रगीतही जीना यांच्या विनंतीनुसार एका हिंदूनेच बनविले होते.
जीना साहेबही २/३ पिढीपूर्वीचे हिंदूच होते. पाकिस्तानाची निर्मिती बाबर किंवा औरंगजेब यांच्या वंशजांनी न करता नवनिर्मित मुस्लिमांनी करावी हा खराखुरा दैवदुर्विस समजावा की नियतीची थट्टा? आपण हिंदू खरेच का कोठे कमी पडलो?
आज एखादे राष्ट्र नष्ट करणे तसे एखाद्या अण्वस्त्रधारी राष्ट्राला फारच सोपे झाले आहे. पाकिस्तान म्हटले तर समस्या आहे आणि म्हटले तर आवाहन आहे. १००० वर्षापासुन एकत्र राहत असणार्यांना मात्र हे आव्हानच आहे, आपल्या सहिष्णुतेला, सामंजस्याला आणि मुख्य म्हणजे हजारो वर्ष उन्नत असलेल्या संस्कृतीला.
आज जसे पाकिस्तानी अतिरेकी कोठेही येण्याचा धोका आहे, अमर्याद नाशाची शस्त्रे त्यांच्याकडे असतीलही. पण आपल्याकडे कधीही पराभूत न झालेले आणि होणारे असे एक शस्त्र आहे आणि ते म्हणजे प्रेम, करुणा आणि याचाच परिपाक असलेली मानवतावादी असलेली दृष्टी. आपल्यालाही आपल्यासारखीच भावना असलेल्या पाकिस्तानी नागरिकापर्यंत जाता आले पाहिजे, सेतू बांधता आला पाहिजे, शांतता आणि सद्भावनांचे महत्त्व पटविता आले पाहिजे. केवळ शब्दाच्या बुडबुड्याने काहीही साध्य होणार नाही हे नक्कीच.
पाकिस्तानच्या नागरिकांनाही आपल्याबद्दल प्रेमच वाटते. नेहरुंच्या मृत्युनंतर पाकिस्तानमध्ये उत्स्फुर्त हरताळ पाळण्यात आला. वसंत उत्सव मोठ्या आनंदाने पाकिस्तानमध्ये साजरा होतो. प्रेमचंद आणि उर्दु भारतीय लेखकाचे आजही बरेच चाहते आहेत.
जशी जशी आपली सद्भावना आणि शांततेचे मित्र दोन्ही देशात वाढत जातील तसे तसे अतिरेक्यांचे बल कमी कमी होत जाईल हे नक्की. शेवटी अतिरेकी अथवा शांततेचे सैनिक एका विचारसरणीतूनच निर्माण होतात. आपल्याला त्या विचारसरणी पर्यंत पोहोचता आले पाहिजे. मार्ग अवघड असला तरी खात्रीचा आहे, आज नाही तर उद्या आपण यशस्वी होऊच, एस्सो धम्मो सनंतनो, एस्सो मग्गो विशुद्धीयो ( हा धर्म सनातन आहे आणि हा मार्गही शुद्ध आहे).
आजच्या या लेखाचा आणि लेखमालेचा समारोप मी ' तराणा-ए-हिंद' नेच करेल,
सारे जहॊं से अच्छा, हिंदोस्तां हमारा, हम बुलबुल है इसकी यह गुलिस्ता हमारा,
गुरबत मै हो अगर हम, रहता है दिल वतन मै, समझो हमे वही ही दिल है हमारा,
मजहब नही सिखाता आपसमै बैर रखना, हिंदी है हम, वतन है हिंदोस्ता हमारा.
युनान ओ मिस्त्र ओ रोम, सब मिट गये जहॊ से, अब तक है बाकी, नाम ओ निशान हमारा,
कुछ बात है की हस्ती, मिटती नही हमारी, सदियो से रहा है दुष्मन, दौर ए जमाना हमारा,
जय हिंद.
टिपा : १ ) या लेखमालेतील १ लेख अतिरेकी कसे बनतात? दुसरा लेख गांधीविचाराने कसा याचा मुकाबला करता येईल आणि तिसरा लेख छोट्या प्रमाणात आपणला काय करता येईल. आजचा लेख वैर कसे अनावश्यक आहे आणि प्रेमाने परत आपण मनाने एक येऊ शकतो का यावर आहे.
२) भारताने स्वातंत्र्यचळवळीत बरेच काही कमावले असले तरी बराच मोठा भूभाग गमावलेला आहे.
३) दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या आहे, भारताची शांततेचा प्रयोग इतरांनाही पथदर्शी ठरु शकतो.
४) शेवटी पटले ते तुमचे आणि अग्राह्य आहे ते माझे.
याद्या
13530
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
धन्यवाद(सम
लेख वाचला नाही
समारोप केल्याबद्दल धन्यवाद!!!
In reply to लेख वाचला नाही by टारझन
>>पण या
येथे पाकिस्तानचा उल्लेख अभिप्रेत आहे.
In reply to >>पण या by यशोधरा
>>असे आणि
In reply to येथे पाकिस्तानचा उल्लेख अभिप्रेत आहे. by कलंत्री
समारोप
सुटलो एकदाचा !!!
हुश्श....
कलंत्री
१+
In reply to कलंत्री by अवलिया
हे राम !
कलंत्रीजी
का नाही?
In reply to कलंत्रीजी by परिकथेतील राजकुमार
'दुरितांचे
या
काय हे एवढ्यात आटपते घेतले?
या आहेत मुंबईकरांच्या भावना !!!
नाण्याची दुसरी बाजू
तराना-ए-मिली??????
In reply to नाण्याची दुसरी बाजू by विकास
मुद्राराक्षस
In reply to तराना-ए-मिली?????? by धम्मकलाडू
विकिपंडित आणि गूगलज्ञानी
In reply to मुद्राराक्षस by विकास
विकासराव यांस
In reply to विकिपंडित आणि गूगलज्ञानी by धम्मकलाडू
अजूनही ज्ञान टिचकीसरशी मिळत नाही
In reply to विकासराव यांस by मुक्तसुनीत
कुंपण
In reply to अजूनही ज्ञान टिचकीसरशी मिळत नाही by धम्मकलाडू
प्रयत्न चालू ठेवा
In reply to कुंपण by विकास
म्हणूनच तर..
In reply to प्रयत्न चालू ठेवा by धम्मकलाडू
अभ्यासू
In reply to विकिपंडित आणि गूगलज्ञानी by धम्मकलाडू
चुकीचे नाही
In reply to मुद्राराक्षस by विकास
फरक
In reply to चुकीचे नाही by आजानुकर्ण
तपशील... तपशील...
In reply to फरक by विकास
गम्मतच....
In reply to तपशील... तपशील... by झुमाक्ष (verified= न पडताळणी केलेला)
दाई
In reply to गम्मतच.... by कलंत्री
मा .कलंत्री
भारत एक देश म्हणून नेमके काय करीत आहे?
आपण विचार
In reply to भारत एक देश म्हणून नेमके काय करीत आहे? by कलंत्री
मग तो युद्धाचा असो अथवा शांततेच्या मार्गाचा असो >>
In reply to भारत एक देश म्हणून नेमके काय करीत आहे? by कलंत्री