आपल्याला काय करता येईल?
नमस्कार मंडळी,
मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मिसळपाववर चांगली चर्चा झाली आणि होत आहे. दुर्दैवाने आपल्या हातात चर्चा करण्याशिवाय फारसे काही हातात नाही असे वाटते. एकूण सामान्य पापभीरू मंडळी एखाद्या झुरळाला मारताना सुध्दा हजारवेळा विचार करणार. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज राज्यकर्त्यांचे आणि सध्याच्या काळात दहशतवाद्यांचे रक्ताचे पाट वाहवणे आपल्याला शक्य होत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात ठराव पास करत होतो आणि सध्या चर्चा करत आहोत.
मिसळपाव