Skip to main content

भक्तीमार्ग का ज्ञानमार्ग!

लेखक केदार केसकर यांनी शुक्रवार, 12/12/2008 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भक्तीमार्ग का ज्ञानमार्ग यावर चर्चा चालु होती. मला जो विचार त्या वेळेला सुचला तो असा. याचा अर्थ कोणताही मार्ग कमी प्रतीचा आहे असा नाही. मला भावलेला माझाच विचार शुध्द भावनेनी इथे देत आहे. भक्तीमार्गापेक्षा मी ज्ञानमार्ग अधिक मानतो. भक्तीमार्ग विश्वास देतो, तर ज्ञानमार्ग आत्मविश्वास! केदार

असचं वाटलं म्हणुन|

लेखक केदार केसकर यांनी शुक्रवार, 12/12/2008 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मी खरतरं चारोळी वगैरे करत नाही. पण अचानक ही काल सुचली. इथे देत आहे. कशी वाटतेय नक्की सांगा. उजेडापेक्षा अंधारातच मला जास्त बरं वाटतं| लपवून ठेवलेलं पाणी तिथे सहज डोळ्यात साठतं| मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो| काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो|| लो.अ. केदार
Taxonomy upgrade extras

एक विलक्षण अनुभव

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 12/12/2008 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
आय.आय.टी.सारख्या अत्युच्च संस्थेतुन शिक्षण ,एक व्यवसाय,मुळ गाव अगदी साधे.ही माहीती ऐकल्यावर ती व्यक्ती तुम्हाला कोण वाटेल एखादी आय टी प्रोफेशनल किन्वा कष्टातुन भविष्य घडवलेली एखाद्या संस्थेची अध्यक्ष.अह! ती तशी नाही. कारण काल मी या व्यक्तीला भेटलो .ती नोकरी करत नाही आणि तीचा व्यवसाय तर नाहीच नाही मग ती करते तरी काय ?? पुर्णवेळ राजकारण !!!!!!!!!!

मुम्बई त्रासदी-Help Line

लेखक शिशिर यांनी शुक्रवार, 12/12/2008 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मुम्बई चे माजी खासदार किरिट सोमैया यांचा Web Site वर मुम्बई त्रासदी संदर्भात मृत्/जख्मीं चा संपूर्ण तपशील तसेच गरजूं साठी वैद्यकीय तथा आर्थिक मदती साठी Help Line उपलब्ध आहे. मि.पा. च्या वाचकां साठी त्याची Link देत आहे. http://www.kiritsomaiya.com/26-11attack.htm www.kiritsomaiya.com

सुपर अँटीस्पायवेअर

लेखक कोलबेर यांनी शुक्रवार, 12/12/2008 06:19 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक कालपासुन संगणकावर कुठलीही साईट उघडली की एखादा पॉप अप उपटू लागला. मी उघडलेल्या साईट्सही नेहमीच्याच होत्या. तिथुन पॉप अप्स येत नाहीत ही खात्री होती. दोन तीनदा हा प्रकार झाल्यावर लक्षात आले, कुठलातरी ऍडवेअर/मालवेअर सारखा विषाणू घुसला आहे. लगेच आयईची सगळी कॅश मोकळी केली आणि कुक्या/हिस्ट्री वगैरे उडवुन लावले. पुन्हा ब्राउजींग सुरू केले तरी तोच प्रकार सुरू झाल. मग लक्षात आले की आपल्याकडे कुठलेही स्पायवेअरच नाही. लगेच 'विंडोज डिफेंडर' डाउनलोड केले आणि सगळा संगणक पिंजुन घेतला. त्याने किरकोळ एक दोन ट्रॅकिंग कुक्या उडवल्या पण त्यानंतरही बाकीची स्थिती जैसे थेच.

सहानुभूती आणि प्रत्यक्ष कृती

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 12/12/2008 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, लहानपणापासूनच आपण परोपकाराय पुण्याय वगैरे ऐकत आलेलो असतो. अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा दुसर्‍याला मदत करुन मोठ्यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या मुलांच्या कथा आपल्यावर संस्कार व्हावा म्हणून दिलेल्या असतात. त्यामुळे दुसर्‍याला मदत करायची असते हे कुणी मुद्दामहुन शिकवण्याची गरज असते असे मला तरी कधी वाटले नसते. पण एक प्रसंग अचानक घडला की ज्यामुळे मला शिकवण आणि प्रत्यक्ष कृती यात काय फरक असतो ते समजले. मी शाळकरी असतानाचा प्रसंग आहे. अगदी लहान नव्हतो. दहावीत वगैरे असेन. गणपती उत्सवाच्या वेळी आम्ही काही मित्र गणपतीचे देखावे पाहायला गेलो होतो.

क्युकेनहॉफ: हॉलंड

लेखक कोलबेर यांनी गुरुवार, 11/12/2008 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यांच्या सुमारास कधी नेदरलँडस/ हॉलंड देशाच्या भेटीवर असाल तर ऍमस्टरडॅम जवळील 'क्युकेनहॉफ' या गावाला भेट दिलीच पाहिजे. वर्षातुन फक्त तीन महिने खुली असणारी ट्युलीपच्या फुलांची अवर्णनिय बाग इथे आहे. गेल्या वर्षी सुदैवाने त्याचसुमारास ऍमस्टरडॅम मध्ये असल्याने ह्या बागेस भेट दिली आणि तिथले सौंदर्य पुरेपुर पाहू शकलो.