क्युकेनहॉफ: हॉलंड

कोलबेर कलादालन
मार्च एप्रिल आणि मे ह्या तीन महिन्यांच्या सुमारास कधी नेदरलँडस/ हॉलंड देशाच्या भेटीवर असाल तर ऍमस्टरडॅम जवळील 'क्युकेनहॉफ' या गावाला भेट दिलीच पाहिजे. वर्षातुन फक्त तीन महिने खुली असणारी ट्युलीपच्या फुलांची अवर्णनिय बाग इथे आहे. गेल्या वर्षी सुदैवाने त्याचसुमारास ऍमस्टरडॅम मध्ये असल्याने ह्या बागेस भेट दिली आणि तिथले सौंदर्य पुरेपुर पाहू शकलो. मोहक ट्युलीप फुलांचे असंख्य प्रकार इथे काय पाहू आणि काय नको अशी अवस्था करुन सोडतात. तिथली काही चित्रे इथे देत आहे. _______________________________________________________
वर्गीकरण

27 टिप्पण्या 6,564 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

वाव! सह्ही! हीच का ती "ये कहाँ आ गये हम"मधली बाग?

कोलबेर नवीन

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हीच का ती "ये कहाँ आ गये हम"मधली बाग?
नाही, ते शुटींग बहुधा ट्युलिप्सच्या मळ्यात केले आहे. ह्या बागेच्या बाहेर आलेकी आजुबाजुला अनेक मळे आहेत त्यात लांबच लांब (चतुरंग ह्यांनी वर्णन केलेल्या) ट्युलिप्सच्या रांगा दिसतात.

स्वाती दिनेश नवीन

क्यूहेनहाउफच्या आठवणी ताज्या केल्यास रे..:) फोटो तर अप्रतिमच.. ट्यूलिप्सचे गाव आहेच फार सुंदर.. स्वाती

प्राजु नवीन

एकदम सह्ही. अप्रतिम रंग... मला "देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुये" हे गाणं आठवलं. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते नवीन

केवळ अप्रतिम... शब्द नाहियेत. शेवटची २ छायाचित्रं दिसली नाही. बिपिन कार्यकर्ते

कोलबेर नवीन

In reply to by बिपिन कार्यकर्ते

शेवटची २ छायाचित्रं दिसली नाही.
काही तरी तांत्रीक गडबड असावी. अजुनही दिसत नसतील तर कळवा फ्लिकरची लिंक पाठवतो.

चतुरंग नवीन

सर्व प्रकाशचित्रे उत्कृष्ट आली आहेत! (मागे एकदा एप्रिलमधे ऍमस्टरडमला विमान उतरताना कित्येक एकर पाहिलेले ट्यूलिप्सचे मळे आठवले. सुंदर रंगीबेरंगी पोषाख घातलेले हजारो कसरतपटू हारीने उभे असावेत असे दिसणारे ते दृश्य आठवले!) चतुरंग

खादाड_बोका नवीन

मी हॉलंडला थंडीत गेलो होतो, त्यामुळे ट्युलिपचे बगीचे बंद होते. आता फोटोपाहुन हळह्ळ होते की काय "Miss" =(( केले. पुढच्यावेळेस जाईल तेव्हा नक्की पाहील. मला तर स्वप्नातही भुक लागते....

लिखाळ नवीन

उत्तम ! :) मस्त फोटो... मजा आली. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी नेमके आम्ही मित्रमंडाळी काउअकेनहॉफला गेलो होतो... आणि माझा वाढदिवस ते तिथे साजरा वगैरे करतील असे मला स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. ती बाग छानच आहे. -- लिखाळ.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

क्या बात है ! किती सुंदर !

विसोबा खेचर नवीन

वरूणदेवा, केवळ अप्रतीम चित्र..! जियो... तात्या.

सूर्य नवीन

सर्वच छायाचित्रे सुंदर !! अप्रतिम !! - सूर्य.

आजानुकर्ण नवीन

In reply to by प्रियाली

शब्द अपुरे आहेत. हेच म्हणतो. आपला, (अल्पाक्षरी) आजानुकर्ण

छोटा डॉन नवीन

In reply to by आजानुकर्ण

वर्णन करायला शब्द अपुरे आहेत असेच म्हणतो ... कायपण म्हणा, च्यामायला प्रशस्त दिवाणखान्यात लावायला अशी छायाचित्रे असणे हा दुग्धशर्करा योग. छोटा डॉन " अफवा न पसरवणे व पसरवणार्‍याला थारा न देणे ह्या सर्वसामान्य सुजाण नागरिकांच्या जबाबदार्‍या आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडता का ? " [ अपने अड्डे पे जरूर आना ,

सखाराम_गटणे™ नवीन

In reply to by छोटा डॉन

>वर्णन करायला शब्द अपुरे आहेत असेच म्हणतो ... सहमत

कोलबेर नवीन

अभिप्राय नोंदवणार्‍या सर्वांचे आभार! ही बाग आणि तिथे बघायला मिळणारे ट्युलिप्स अवर्णनीयच आहेत. आपल्याला आवडलेल्या ट्युलीपचे कांदे/रोपे तिथे विकत देखिल मिळतात जे तुम्ही तुमच्या बागेत देखिल लावु शकता. (कस्टमच्या कचाट्यात अडकू नये म्हणून बहुदा) थेट घरच्या पत्त्यावर पार्सल देखिल करतात. उन्हाळ्यातल्या तीन महिन्यात कधी युरोपात असाल तर ह्या बागेला भेट देण्याचे नक्की ठरवा. - कोलबेर

रेवती नवीन

सगळं खरं असूनही खोटं वाटावं असं आहे. ही ती बाग नसली तरी अमिताभ आणि रेखा हमखास आठवतात. रेवती

झकासराव नवीन

एकसे बढकर एक फोटो आहेत सगळे. मस्त फ्रेम बनेल प्रत्येक फोटोची. :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

सुनील नवीन

अप्रतिम फोटो. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.