Skip to main content

(वगैरे...)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 15/01/2009 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल वगैरे... पुरे जाहले ते फरारी वगैरे पुन्हा सज्ज झालो शिकारी वगैरे खरे सांगतो टाकलेलीच नाही तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे विचारा खरोखर निघालास कोठे? तुम्हा वाटले ना शिवारी वगैरे कशाचीच आता नशा येत नाही जरी घेतली प्रथम धारी..

बाला,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 15/01/2009 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
तू मुसमुसलेली, षोड्शा,सुंदर बाला, घातला नजरेन,तू,ह्रुदयावर की घाला. नजर धारधार, यौवनाचा कहर, तू तिलोत्तमा नि रतीहुन भासे सुंदर. साडीत लपेट्ले,गोरे कोवळे तन, काचोळीत बांधले, खट्याळ ते यौवन यौवन गंध दरवळे अवती भवती, उन्मादक नजर आग भडकवे वरती. तो मुखडा सुंदर,गोजिरा अन लाजरा ते नयन चेट्की, त्यावर पापण्यांचा पहारा. ओठांची महीरप,करे मम मनांस दंग आत असे दंतपंक्ती कि शुभ्र मोत्याची रांग. तू मधु शर्वरी, चांदणी तु शुक्राची सुंदर चाफेकळी तू, कळी लावण्याची, उतरली भू तळी रंभा की अप्सरा वळती तुझकडे वारंवार की नजरा. काय करावी शायरी तव रुपावर शब्दांचा खजीना,अपुरा वाटे खरोखर कीती करु गोळा मी शब्दांचे हे क

खाज!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 15/01/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
'माज!' वाचल्यावर 'खाज' सुटली नाही तर रंग्या कसला? तेव्हा सादर आहे .. कालचा 'गजकर्ण' थोडा आज आहे , आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कोणत्या वैद्याकडे मी जात नाही, आपल्या वैदूगिरीचा माज आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ कालच्या 'पेल्यातले' तात्पर्य थोडे, अन उद्याचा 'बेवडा' अंदाज आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ घोरण्याचा ध्यासही आहे कधीचा, अंगणातच घोंगडी अन 'बाज' आहे॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे ॥ तोंड मी कोठे कधी लपवू पाहातो ना जनाची वा मनाची 'लाज' आहे ॥ आणि त्याची फार मोठी 'खाज' आहे चतुरंग
Taxonomy upgrade extras

तिखटामिठाचे आप्पे आणि चटणी

लेखक रेवती यांनी बुधवार, 14/01/2009 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : एक वाटी तांदूळ, अर्धी वाटी हरभर्‍याची डाळ, पाव वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी कच्चे जाड पोहे, हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, पाव वाटी धूवून चिरलेली कोथिंबीर, दीड टेबलस्पून कच्च्या तेलाचे मोहन. कृती : आदल्या दिवशी तांदूळ व दोन्ही डाळी स्वच्छ धूवून पाण्यात भिजत घालव्यात. रात्री परत एकदा धूवून सरसरीत वाटून एकत्र करून उबेच्या जागी झाकून ठेवावे. दुसरे दिवशी आप्पे करायच्या वेळी जाड पोहे पाण्यात धूवून कुस्करून मिश्रणात घालावेत. मीठ, मिरची व आल्याचे वाटण घालावे.

मिपा मुखपृष्ठ: अभ्यंकर वहिन्या ते बाबूजी!

लेखक भास्कर केन्डे यांनी बुधवार, 14/01/2009 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाच्या मुखपृष्ठावर आजकाल अभ्यंकर वहिन्यांची वर्दळ असते. त्यांच्या अनुमोदनानंतर मिपाच्या तर्रीवर ताव मारायला आम्ही मिपाच्या दालनांमध्ये प्रवेश करतो. आज मात्र मिपाचे दर्शन मंगलमय वाटले. सकाळी सकाळी बाबूजींची आठवण, त्यांनी वीर सावरकर बनवताना केलेले शर्थीचे प्रयत्न, खाललेल्या खस्ता यांचे स्मरण करुन दिल्याबद्दल मिपाचे आभार! वीर सावरकर बनवताना बाबूजींनी वर्षानुवर्षे एक तपश्चर्याच केली. तिची माहिती सर्वसाधरणपणे मराठी जनतेला नाही. मला वाटते बाबूजींच्या या तपाची माहिती असणारे वा ती तपश्चर्या थोड्याफार प्रमाणात जवळून बघणारे काहीजन मिपावर आहेत.

सारथी : स्वारी किल्ले प्रबळगड...,Prabalgad

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 14/01/2009 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रबळगड आणि डावीकडे कलावंतीण नमस्कार मित्रहो.. मगच्या रविवार - सोमवारी मि व माझा मित्र मोनिश पनवेल जवळच्या प्रबळगडावर गेलो होतो. दोघेच होतो त्यामुळे गाडीवरच निघालो.सोबत तंबू ,शिधा ,भांडी-कुंडी , झोपायचं सामान घेतलं. सधारण तीन साडेतीन तासानी ठाकूरवाडी म्हणजे पायथ्याच्या गावात पोचलो.मुंबई अगदी या गावापर्यंत येउन पोचली आहे.

सारथी : मंदी ,माणूस आणि महाराज...

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 14/01/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
जगभर मंदीची लाट जोरदार वहात आहे.अजून वर्षभर तरी ती रहाणार असे आपले अर्थतज्ञ सांगत आहेत.सहाजीकच भारतालाही ती झळ पोचत आहेच.बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.व्यवसाय बंद पडत आहेत.महागाई वाढत आहे.अशा सर्व गोष्टींचा परीणाम शेवटी माणसाच्या मनावर होणारच.मग तो कुठेतरी आधार शोधू लागणार.दान धर्म ,बाबा,बूवा ,महाराज यांच्या कडे ओढला जाणार.तिथे गेल्यावर काळजीतून आपली मुक्तता होईल अशी त्याची भाबडी आशा असणार... हल्ली बाबा ,महाराज, प.पू.

सारथी

लेखक ओंकार देशमुख यांनी बुधवार, 14/01/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मराठी ब्लोग वर मिसळपाव मधून बय्राच जणांच आगमन झालं आधिही मी इथे आलो होतो पण सदस्य झालो नव्हतो.असो आज झालो.माझ्या ब्लोग वरचे नवीन लेखन मी या कट्यावर नक्कीच सादर करीन... http://pune-marathi-blog.blogspot.com/

ज्योतिषावरील काही प्रश्न

लेखक रम्या यांनी बुधवार, 14/01/2009 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
घरी लग्नाची बोलणी सुरू झाली आणि पत्रिका, रास, नाडी, गुण वगैरे वगैरे गोष्टी एकापाठोपाठ एक कानावर येत गेल्या. आजूबाजूचे बरेच लोक रास, नाडी, गुण आणि इतर शब्द अगदी सहजपणे वापरतात पण रास म्हणजे काय? नाडी म्हणजे काय? असे मूलभूत प्रश्न विचारले तर मात्र समधानकारक उत्तरे मात्र कोणीही दिली नाहीत. मिपाच्या सदस्यांपैकी कोणाची मदत घेऊन प्रश्नांची उत्तरे मिळतात का हे पाहण्यासाठी हा लेखन प्रपंच. प्रश्न खालील प्रमाणे १. एखाद्याची रास म्हणजे नक्की काय? एखाद्याच्या जन्मवेळी चंद्र (कि सुर्य?) ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तिची जन्मरास असं काहीसं ऐकलं आहे. पण नक्की माहीत नाही. २.

आता कुठ कुठ जायाच हनिमुनला

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 14/01/2009 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रकटन फक्त 'कोरी पाटी' करिता आहे. मुंबई स्थित नव दांपत्यांकरिता आहे. मी हाताच्या फ्रॅक्चरने हनिमुनला जाउ शकलो नाही. ३ महिने घरीच होतो. नंतर का कुणास ठाउक नंतर जमलेच नाही. आता कुठ कुठ जायाच हनिमुनला लोणावळा, खंडाळा, कोल्हापुरचा पन्हाळा, बेंगलोर, गोवा नि काश्मिरला सदाबहार रेखावर चित्रित हे गाणे लागले की अगदी 'जांबुवंत' जमान्यात लग्न झालेल्या लोकांच्या चेहे-यावर सुद्धा स्मित उमटवते. उसासे येउ लागतात. लोणावळा, खंडाळा हरकत नाही.