मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(वगैरे...)

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल वगैरे... पुरे जाहले ते फरारी वगैरे पुन्हा सज्ज झालो शिकारी वगैरे खरे सांगतो टाकलेलीच नाही तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे विचारा खरोखर निघालास कोठे? तुम्हा वाटले ना शिवारी वगैरे कशाचीच आता नशा येत नाही जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे जराशी सुगंधी असावी सुरा ही पिण्या येत जाते उभारी वगैरे तिथे एकटा मीच होतो विवाहित सुखी सर्व जे ब्रम्हचारी वगैरे चला दूर जाऊ, नवे बार शोधू इथे फार झाली उधारी वगैरे कवींना म्हाणे रोज येतात धमक्या दिली "केशवा"ला सुपारी वगैरे पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे..

वाचने 4038 वाचनखूण प्रतिक्रिया 24

प्राजु 15/01/2009 - 01:50
एकदम जबरा... खरे सांगतो टाकलेलीच नाही तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे हाहाहाहा.... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

टुकुल 15/01/2009 - 02:42
लै भारी कशाचीच आता नशा येत नाही जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे =)) =))

चतुरंग 15/01/2009 - 02:50
कवींना म्हाणे रोज येतात धमक्या दिली "केशवा"ला सुपारी वगैरे पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. दुसर्‍या डावात पहिल्याच चेंडूवर षटकार गुर्जी! ज ह ब ह र्‍या हा !! चतुरंग

मदनबाण 15/01/2009 - 04:47
कवींना म्हाणे रोज येतात धमक्या दिली "केशवा"ला सुपारी वगैरे पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. झकास.... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

चेतन 15/01/2009 - 10:56
+++१ गुरुजी एकदम फार्मात. पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. माझ्यासारख्यांना मात्र खुप आनंद झाला. अशिच मजा वर्षभर येत रहावी (आनंदित) चेतन

विसोबा खेचर 15/01/2009 - 12:49
क्लास रे! :) चला दूर जाऊ, नवे बार शोधू इथे फार झाली उधारी वगैरे हे सर्वात मस्त! :) आपला, (रोख-रोकडा!) तात्या.

मूखदूर्बळ 17/01/2009 - 13:00
जबराट :) . चला दूर जाऊ नवा पक्ष शोधू इथे फार झाले 'प्रभा'री वगैरे . मराठ्या खरोखर निघालास कोठे? इथे मातले ते बिहारी वगैरे .

खरे सांगतो टाकलेलीच नाही तुझी मात्र चर्या.. दुपारी!?.. वगैरे जराशी सुगंधी असावी सुरा ही पिण्या येत जाते उभारी वगैरे लै भारी ! परिकथेतील सुराजकुमार |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

शंकरराव 16/01/2009 - 18:54
कशाचीच आता नशा येत नाही जरी घेतली प्रथम धारी.. वगैरे क्या बात है व्वा ! मजा आली .. केशवराव लगे रहो..

सुनील 16/01/2009 - 19:39
पुनरागमन दणक्यात झालं आहे!! चला दूर जाऊ, नवे बार शोधू इथे फार झाली उधारी वगैरे मस्तच!! अवांतर - शेवटचे कडवे नंतर टाकले काय? काही तासांपूर्वी नव्हते (असे वाटते!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

धाकली 16/01/2009 - 19:46
वाह!! क्या बात है!!! चला दूर जाऊ, नवे बार शोधू इथे फार झाली उधारी वगैरे आणि हे तर उच्च्चच्!! तिथे एकटा मीच होतो विवाहित सुखी सर्व जे ब्रम्हचारी वगैरे फारच छान... मजा आली!!

जयवी 17/01/2009 - 12:18
विडंबन...ते ही इतक्या कठीण रदीफ चे...... मानलं बाबा तुम्हाला...... !! जबरदस्त !!

केशवसुमार 18/01/2009 - 00:21
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार

सुप्रिया 23/01/2009 - 16:51
कवींना म्हाणे रोज येतात धमक्या दिली "केशवा"ला सुपारी वगैरे पुन्हा एकदा हा सुरु त्रास झाला.. बरे बंद होती "सुमारी" वगैरे.. मस्तच !!!

वा. खूप दिवसांनी छान विडंबन वाचून बरं वाटलं. वेलकम ब्याक... मिसळीत पडली पुन्हा तीच तर्री पुन्हा आज आली खुमारी वगैरे ते वरच ठेवा (कीप इट अप)