Skip to main content

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/01/2009 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे..

साद

लेखक सुचेता यांनी बुधवार, 28/01/2009 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
घालावी तुज साद अव्याहत हाच नाद आवरता आवरेना थोपवू कसे मना क्शणोक्शणी तुझे भास भेटायाचे हिच आस कसाबसा सरे दिस रात उरे स्मरणास पुसण्यास नाही कोणी गालावर सुकले पाणी एकदाच तुज भेटावे मनीचे भाव जुळावे हिच शेवटली आस जिवाने घेतला ध्यास सुचेता सुळे

गांधी आणि नेहरू घराणे

लेखक तात्यालबाड यांनी बुधवार, 28/01/2009 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी, १५ ऑगस्ट या आणि इतर दिवशी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांचे इतके कोडकौतुक होते की त्याला काही मर्यादाच नाहीत. जणू काही भारताला स्वातंत्र्य ह्याच दोघांनी मिळवून दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, वासुदेव बळवंत फडके, राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, इतरप्रांतीय अनेक अज्ञात स्वातंत्र्यसैनिक यांचे काहीच योगदान नाही ? ते काय तुरुंगात गोट्या खेळत होते ? ज्या शिक्षा ह्या स्वातंत्र्यसैनिकांनी भोगल्या आहेत त्या प्रकारच्या शिक्षा गांधी,नेहरू यांनी भोगल्या आहेत काय ? निदान मला तरी माहीत नाही. असल्यास माझा गैरसमज दूर करावा.

सावरकर आणि आपण

लेखक ए. प्रशांत यांनी बुधवार, 28/01/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.

मारहाण वृध्दांना स्त्रियांना.... कितपत योग्य??

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 28/01/2009 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो... रामसेना आणि मनसे ... काल बातमी वाचली... वृध्द आणि स्त्रियांना मारहाण. आजच्या पेपरला बातमी वाचली. मनसे ने माफि मागितली आहे झाल्या प्रकाराबद्दल. कार्यकर्ते हे स्वघोषित नेत्ते झाले आहेत कां? ही अशी मार हाण कितपत योग्य आहे ( रामसेना असो की मन्से असो)?? http://tinyurl.com/dyrnwo

आताही प्रेम तसेच आहे का?

लेखक धनंजय यांनी बुधवार, 28/01/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आताही प्रेम तसेच आहे का? ********** नवे होते प्रेम जे वर्षांपूर्वी काही सांग आहे आताही ते तसेच का? भेटतो रोजच तुला सकाळ-संध्याकाळी काळीज प्रत्येकवेळी धडधडते का? सदाचा तोच तंटा भांडून झाल्यावरती होतो खालीवरती जीव तसाच का? तुझ्यासाठी झुरत नाही पूर्वीसारखा तरी नाही पारखा प्रेमाला मी आहे माझी खात्री असशील माझ्यासाठी घट्ट होतात गाठी ओढल्या तरी ********** (वाचलेल्या कवितेचा एम् पी ३ दुवा)
Taxonomy upgrade extras

एका वंशसंहाराची स्मृती

लेखक बुद्ध यांनी बुधवार, 28/01/2009 07:28 या दिवशी प्रकाशित केले.
येथे वाचा अभिजित थिटे यांनी वंशसंहार दिवस वरती चांगला लेख लिहला आहे. २७ जानेवारी हा जागतिक वंशसंहार दिन म्हणुन पाळला जातो. येथे दुस-या महायुधा मधील वंशसंहार विषयी लिहला आहे. हा लेख वाचल्यानंतर कम्बोडिया वंशसंहार अणि आर्मेनिया मधील वन्शासन्हाराची आठवण झाली. येथे वाचा

या काव्याचा अर्थ नक्की काय ?

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 28/01/2009 01:58 या दिवशी प्रकाशित केले.
हा प्रश्न मला वर्षानुवर्षे पडलेला आहे. खालील गाणे माझ्या आवडीचे. आशाबाई भोसल्यांच्या , दीनानाथांच्या , वसंतरावांच्या , आणि अलिकडे राहुल देशपांडे या युवा गायकाच्या तोंडी ऐकलेले आहे. पण त्याचा अर्थ मला काही माहिती नाही. शब्द नीट आठवतात. शब्दांचे अर्थही समजतात. पण एकूण गाण्याचा अर्थ मला कळलेला नाही. पण अर्थ कुणी सांगेल तर वर्षानुवर्षीचे माझे कोडे सुटेल.

वर्षपूर्ती

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 28/01/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
`मिपा'च्या चरणाशी आल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं. एवढा प्रदीर्घ काळ मिपानं, मिपाकरांनी, संपादकांनी आणि मुख्य म्हणजे तात्यांनी या पामराला सहन केल्याबद्दल हार्दिक आभार! :D परवाच खरडवहीतून नंदनने वर्षपूर्तीच्या (आगाऊ) शुभेच्छा दिल्या, तेव्हा माझ्याही ते लक्षात आलं. नाहीतर अशी वर्षंबिर्षं लक्षात ठेवणं, अवघडच जातं. हल्ली तिशी उलटल्यानंतर तर स्वतःचा वाढदिवसही लक्षात राहू नये, असंच वाटतं मला! :$ तर ते असो. 28 जानेवारी 2008 ला पहिला लेख टाकला इथे. त्याआधी सहा-सात महिने ब्लॉगवर लिहीत होतो. तिथेही मजा येत होती.

साखरेचा पाक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 28/01/2009 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
साखरेचे निरनिराळ्या प्रकारचे पाक असतात १]साखरेचा घट्ट पाक २]साखरेचा कच्चा पाक ३]साखरेचा पक्का पाक ४]साखरेचा एकतारी पाक ५]साखरेचा पाक ६]साखरेचा दोन तारी पाक या सर्व पाकात नेमका काय फरक असतो?. हे निरनिराळे पाक कुठे वापरले जातात? हे पाक कसे केले जातात? [क्रुति] पाक बिघडतो म्हणजे नेमके काय होते? साखरेचा एक तारी व दोन तारी पाक असतात त्या प्रमाणे आणखिन किति तारी पाक असतात?? मी.पा. मान्यवर यावर काहि माहिति देवु शकतिल का?