Skip to main content

लेखनचोर्य (कृपया ह्यावर नवीन कॉमेंट्स नकोत -कोतवालांनी क्षमा मागितली आहे)

लेखक केदार यांनी शुक्रवार, 30/01/2009 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच आम्ही येथील सदस्य घाशीराम कोतवाल ह्यांचा जाणता राजा ब्लॉग वर गेलो. त्याची लिंक मला http://misalpav.com/node/5805 इथे मिळाली. आणी अहो आश्चर्यम. शिवाजी महाराजांवर मी मायबोली दिवाळी अंक २००८ मध्ये लिहीलेल्या शिवाजी महाराजाच्यां लेखाला "शिवाजी महाराजांची राज्य व सैन्यव्यवस्थ"" त्यांनी आपल्या स्वतःच्या ब्लॉग प्रसिध्दी दिली व लेखक म्हणूण स्वतचे नाव दिले. मूळ लेख आपण इथे पाहून शकता. http://vishesh.maayboli.com/node/46 तसेच इथेही.

कुणी घर सांगता का घर?

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 30/01/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भांडारकर रस्त्यावरच्या रणजित हॉटेलला जायचं होतं. तसा कार्यक्रमांनिमित्त अनेकदा गेलो असेन तिथे. पण अजूनही ते प्रभात रोडला, की भांडारकर रोडला, हे अजून आठवत नाही. ते शोधताना आधी प्रभात रोड, मग भांडारकर, असे करत राहिलो. अखेर कार्यक्रम संपल्यानंतर पोचलो. तसा कार्यक्रम बुडवून फार काही नुकसान नव्हते, पण केवळ माझ्या वेंधळेपणामुळे तो बुडाला, हे महत्त्वाचे. :S पत्ते शोधण्याची आणि लक्षात ठेवण्याची आमची ही नेहमीची बोंब! पुण्यात आता बारा वर्षे होतील, पण अजूनही लोखंडे तालमीपासून भरत नाट्य मंदिराला कसे जायचे, हे पक्के नाही सांगता येणार मला!

बाळासाहेबांना कोंडून ठेवताना

लेखक अन्वय यांनी शुक्रवार, 30/01/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यातील अतूट नात्याची एक सुरेख आठवण वाचा... http://beta.esakal.com/2009/01/29102110/balasaheb-thakrey-and-politics…

प्रियेच्या भेटी---

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 30/01/2009 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियेच्या भेटी चांद्ण्या उन्हात प्रेमाचे घरटे काटेरी वनात कट्यांनासुद्धा गुलाबाची सय वेडाची ओढ वेडच वय तारका हाती जागल्या राती वारयाचा आलाप भैरवी गाती दूर किनारी पहाट उभी खेळूदे चांद्ण निवांत नभी
Taxonomy upgrade extras

वाविप्र-२

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 30/01/2009 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
संगणकामधले मला फारसे कळत नाही. तो माझा डोमेन नाही. हा शब्द पण मला हल्लीच कळाला. माझी डोमेन्स जरा वेगळी. असो. मुख्यपृष्ठावर खव एकाच वेळी काढायला निलकांत ला व्यं नी करा असे दिसल्यावर मी लगेच तसा व्य नी केला. त्याने ताबडतोब खव काढुन टाकली. असे केल्याने काय होते. खव खव कमी केल्याने मिपाच्या मेंदुवर चा ताण कमी होउन कार्यक्षमता वाढते काय? तसेच व्य. नी पण काढले तर असा ताण कमी होईल काय. डोक्यातले इतर नको ते विचार काढले तर 'कार्यक्षमता' वाढते असे म्हणतात. तसाच काही प्रकार इथे होतो का? जाता जाता: डोमेन चे स्पेलिंग काय? DOMEN ka DOMAIN

बटाटा- मटार रोल

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- १. ४/५ उकडून मॅश केलेले बटाटे २. १ वाटी मटार ३.२/३ चमचे आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट ४. ५/६ ब्रेडचे स्लाइस कडा काढुन ५. १ चमचा गरम मसाला ६. तेल ७. चीमूटभर साखर ८. १ चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर ९. फोडणीसाठि - मोहरी, जिर, हिन्ग १०. मीठ ११. रवा किव्वा ब्रेड्क्रम्स १. मटार गरम पाण्यात घालावेत पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व मटार चाळ्णीवर ओतून त्यावर लगेचच गार पाणी ओतावे. २. थंड झाल्यावर मिक्सर मधून थोडेसे क्रश करून घ्यावेत. ३.

प्रहारच्या रीलॅक्स पुरवणीत माझे लेख.

लेखक नीधप यांनी शुक्रवार, 30/01/2009 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या म्हणजे ३१ जानेवारी २००९ पासून दर शनिवारी 'प्रहार' या दैनिकाच्या रीलॅक्स पुरवणीमधे माझे लेख येणार आहेत. कॉश्च्युम डिझायनिंग हा माझा विषय. याच्या अनुषंगाने लेख आहेत. जरूर वाचा आणि प्रतिसाद द्या. दुवा मिळाला की इथेच प्रसिद्ध करीन. १. पहिला लेख 'सोंग सजवायची कला' ३१ जानेवारी २००९ http://epaper.prahaar.in/epaperimages/3112009/3112009-md-you-4/23271713… २.

ग्रेव्हीजची रेसिपी

लेखक ज्योति यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील सुगरणी॑नो मला रेड व ग्रीन ग्रेव्हीच्या रेसिपीज देउ शकाल का?

कळले मला ना........

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
कळले मला न केव्हा तूझ्यात गून्तले मी पापणीत साठले पाणी प्रीतीत नाहले मी ओठ जरा थरथरले अंग अंग शहारले नकळत सारे घडले पण गूपित तुला कळले कळले मला न केव्हा मेघ दाटून आले नयनात जमली स्वप्ने रात्रीत जागले मी गीत जरा स्मरले सप्तसूर जूळले तूझ्या डोळ्यात पाहून मलाच मी विसरले कळले मला न केव्हा फूल उमलून आले आसवांची झाली फूले गंधात दंगले मी

बकूळ फूले

लेखक मानसी मनोजजोशी यांनी शुक्रवार, 30/01/2009 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओन्जळितल्या बकूळ फुलांना ओन्जळित तूझ्या धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला सांग प्रीया तू देशील का? ओन्जळितल्या त्या बकुळ फुलांना पापणीत तूझ्या ठेवशील का? पापणीतून अलगद त्यांना मनात सामावून घेशील का? अखेपर्यंत आठवणीने मनात तू जपशील का? सूखलेल्या निर्माल्यवत त्या फुलांना ओन्जळित पून्हा धरशील का? या बकूळ फुलांचा मधूगंध मजला पून्हा प्रीया तू देशील का?