मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बटाटा- मटार रोल

मानसी मनोजजोशी · · पाककृती
Image removed. साहित्य:- १. ४/५ उकडून मॅश केलेले बटाटे २. १ वाटी मटार ३.२/३ चमचे आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट ४. ५/६ ब्रेडचे स्लाइस कडा काढुन ५. १ चमचा गरम मसाला ६. तेल ७. चीमूटभर साखर ८. १ चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर ९. फोडणीसाठि - मोहरी, जिर, हिन्ग १०. मीठ ११. रवा किव्वा ब्रेड्क्रम्स १. मटार गरम पाण्यात घालावेत पाण्याला उकळी आल्यावर गॅस बंद करावा व मटार चाळ्णीवर ओतून त्यावर लगेचच गार पाणी ओतावे. २. थंड झाल्यावर मिक्सर मधून थोडेसे क्रश करून घ्यावेत. ३. कढईत तेल गरम करून फोडणी करावी त्यात आल, लसूण, मिरचि व कोथिम्बीरीची पेस्ट घालावी. ४. क्रश केलेले मटार घालून परतावे. ५. गरम मसाला,अर्धा चमचा लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर , साखर व मीठ घालूनपुन्हा परतावे व झाकण ठेऊन एक वाफ आणावि व गॅस बन्द करावा. हे मिश्रण थंड होऊ द्यावे. ६. ५/६ ब्रेडचे स्लाइस पाण्यात भिजऊन ठेवावेत मऊ झाल्यावर त्यातिल पाणी काढुन टाकावे व स्मॅश केलेल्या बटाट्यात मिक्स करावे. ७. वरिल मिश्रणात उरलेला लींबाचा रस किव्वा आमचूर पावडर व मीठ मिसळावे व मिश्रण एकजीव करावे. ८.वरिल मिश्रणाची पारी करून त्यात मटारचे मिश्रण भरावे व रोल करून रवा किव्वा ब्रेड्क्रम्समधे घोळवून तेलात खरपूस तळावेत

वाचन 11382 प्रतिक्रिया 0