Skip to main content

मनात वसलेला गुलमोहर

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 01/06/2009 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हात लखलखणारे झुंबर मनात वसलेला गुलमोहर नजर खिळवुनी जिकडेतिकडे नजरबंदिचा खेळ खेळतो लाल तांबडे शेले उडवित हिरव्या छायेतुन सळसळतो गारुड याचे चराचरावर कधि पानांच्या पडद्याआडुन हळूच हसतो लाल तजेला कधि तेजाचे पलिते घेउन फुलांनीच हा रसरसलेला वैशाखाचा घुमवित जागर घरी, अंगणी, वाटेवरती कुठे माळरानी एकांती तप्त उन्हाच्या काहिलीतही मोहरलेली याची कांती पायांखाली कुंकुम-केशर
Taxonomy upgrade extras

ओ.सी.डी.

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 01/06/2009 07:45 या दिवशी प्रकाशित केले.
ओ.सी.डी. म्हणजे ऑबसेसीव कंपल्सीव डीसऑर्डर. आता ह्याला समांतर मराठी शब्द मला माहीत नाही. पापड,लोणचे, मुरंबा ह्यानी तो द्यावा. _______________________________________________________ अहो ब्रश आणला आहे ना. मग जानव्याने पाठ का खाजवताय.- बायको ब्रश ने हात लचकला तर? -मी काही लचकत नाही. वापरुन बघा. घाणेरडी सवय जानव्याची-बायको त्यात घाणेरडे काय? चेंबुर ला आमच्या चाळीत मे महीन्यात सर्व पुरुष मंडळीचा रात्री ९ वाजता पटांगणात सामुदायिक कार्यक्रम असायचा. ब्रंहानंदी टाळी लागायची त्यांची. त्यातला आनंद तुला नाय कळायचा. शी, ..ओ.सी.डी आहे ती- बायको. लगेच लक्षात आले काय भानगड आहे ते.

|| शिवराज्याभिषेक ||

लेखक मनीषा यांनी सोमवार, 01/06/2009 00:31 या दिवशी प्रकाशित केले.
काजळल्या रात्री - आशंकित गात्री उसासे ही धात्री - भयभीत । गोठलेले जिणे - बंध हे पडले कोडे हे कसले - ईश्वरास । दुर्दैवी पखाली - दैन्यही सामोरी कावड अंधारी - काळ वाही । अस्मानी, सुल्तानी - घोर हा जीवासी नसे आसराही - कोणा येथे । करपली भूमी - उजाड ही सृष्टी ओसाड ही वस्ती -खिन्न शांत । तेज ते उजळे - काळोख्या गर्भात आस ही नेत्रात - वसुधेच्या । स्वये भाग्य लक्ष्मी - बळ ते सावरी माळराना वरी - अवतरी । शपथ ग्रहण - करिती प्रमाण राष्ट्रास्तव प्राण - देऊ आम्ही । शृंखला दास्याच्या - गळोनी पडती बंध हे तुटती - अमानुष । निजाम, आदिल - ही कुतुबशाही मात अ

"दिलाचा दिलवर भेटला..."

लेखक शरदिनी यांनी सोमवार, 01/06/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
वाटंला डोळे जीव थकला धनी कधी हो येता घरला साजण माझ्या स्वप्नीच आला मला दिलाचा दिलवर भेटला तगमग जिवाची होतेया भारी रात सरली कधी येतेया स्वारी वृंदगान : मर्दानी तोरा हसतोय छान हिच्चा नवरा शारूख खान माझा डोळाच पटकन लागला मला दिलाचा दिलवर भेटला नणदेचा दादला डोळा मारी इष्टेटीवरती नज्जर सारी वृंदगान : बटाटे डोळे टमाटे कान नण्देचा नवरा इर्फ़ान खान हा ठेवा मी जपून ठेवला मला दिलाचा दिलवर भेटला राती अचानक खोलीत आला मला पाहुनी दिवा मालवला..

टाहो

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 31/05/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
तडकलेला माळ जळणारं रान फेसाळता धुराळा धुराळ्याच्या थारोळ्यांत टळटळीत उन्हाचं मी न्हाणं घेतोय ! गाठुळलेल्या बुंध्यावर ठणकणार्‍या सांध्यांवर सोलावलेली साल तराटलेल्या फांद्यांवर लटकणार्‍या कबंधागत मी टाहो फोडतोय ! शिशिर-बहर चक्राच्या नि वैशाख ज्वाळांचा हा सदाचा आवर्त नाही. मृगजळांच्या मागे जात माझा मलाच मी भ
Taxonomy upgrade extras

वाचनीय आणि चिंतनीय..

लेखक बहुगुणी यांनी रविवार, 31/05/2009 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. मधील हा छोटासा लेख चिंतनीय आहे. मुद्दा: "...काही वर्षांपूर्वी ज्या प्रकारचे वाद निर्माण करण्याचे धाडसही कोणी केले नसते, आणि केलेच असते तर बहुसंख्य समाजानेच उपेक्षेने किंवा सक्रिय निषेधाने त्यांना गप्प बसवले असते, असे वाद वारंवार निर्माण होताना दिसू लागले आहेत..."

मराठी माणसाचा तारणहार कोण?

लेखक घोडीवाले वैद्य यांनी रविवार, 31/05/2009 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
राजकारणात सद्‌हेतूने येणारांची संख्या आता घटलीये. किंबहुना या लोकांना आता राजकारणात स्थानच राहिलेले नाही. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हा राजकारणाचा नियम झालाय. एक विचार घेऊन आम्ही राजकारणात येतो, जनतेच्या उद्धार हेच आमचे कर्तव्य आहे, असे आश्‍वासक शब्द वापरून राजकारणात स्थिर स्थावर व्हायचे आणि नंतर वाट्टेल तशी भूमिका बदलून लोकांनी टाकलेल्या विश्‍वासाला हरताळ फासायचा. हे थोड्या बहुत फरकाने प्रत्येक राजकीय पक्षालाच लागू आहे. त्यात कॉंग्रेस हा तर व्यवहारवादीच पक्ष आहे. तरीही सामान्य जनांमध्ये हाच पक्ष लोकप्रिय आहे. त्याची कारणे आर्थिक व्यवहारांशीच निगडीत आहे.

स्टॅलिनशाही!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 31/05/2009 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
चेन्नईतल्या आपल्या निवासस्थानी करुणानिधी ऐटीत आपल्या सिंहासनावर बसले होते. पक्षाच्या आमदार-खासदारांची गर्दी झाली होती. करुणानिधींच्या सिंहासनाच्या डावीकडे होते त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र अळगिरी. त्यापलीकडे नातू दयानिधी मारन. उजवीकडच्या बाजूला पहिल्याच खुर्चीत होते त्यांचे दुसरे पुत्र स्टॅलिन. पलीकडे मुलगी कनिमुरी. सगळ्यांचे चेहरे चिंताक्रांत होते. विषय गंभीर होता. काही झालं तरी तमीळ अस्मितेचा प्रश्‍न होता! तमिळनाडूच्या जनतेनं टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरतील असेच प्रतिनिधी दिल्लीत पाठवणं आवश्‍यक होतं. करुणानिधींनी एकेकाला मत विचारायला सुरवात केली. पण कुणीच काही बोलायला तयार नव्हतं.

ओळखा पाहु,,,,

लेखक शार्दुल यांनी रविवार, 31/05/2009 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्ते मित्रहो,,,, पु.ल. न्ची खालील वाक्ये कुठ्ल्या लेखातील आहेत ते ओळ्खा,,,,,,,,,! १. फाशी ची शि़क्शा सुनावली की न्यायाधिश आपली लेखनि मोड्तो म्हने , माझा सुट शिवुन झाल्याव्र त्या शीम्प्याने आपली सुइ मोड्ली असेल,,,,!!!!!!! २.सगले शुद्ध् वाले बेशुद्ध् पड्ले असतील,,,,,,,,,.. ३. ओठाना का लिप्स्टिक लावते तुझी मम्मी??? मला वाट्ले पुढे आलेल्या दातान्ना,,,,,,! ४. तिने टुथपेस्ट च्या जाहीराति मधल्यासार्खे हसुन दाखवले, मी आजवर खालेल्या पान तम्बाखु ची जाहीरात केली,,,,,,, ५. काय तब्येत होती मामा तेव्हा तुम्ची!!!!!!!!!! :)

कसं सांगू ....?

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 31/05/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
कसं सांगू .....! तुला पटणारही नाही. साक्ष तुझ्या-माझ्या गुपिताची, तो निशिगंध.... अबोल झालाय ! तुला आठवतं.........? त्या अनुरागी क्षणांवरती त्याच्याही गंधाची पखरण होतीच. त्या कैफाचा स्पर्षवारा, त्यालाही हवासा वाटला. ताटातुटीच्या क्षणी........! 'पुन्हा येते' म्हणालीस, आली नाहीस. तुझ्या प्रतीक्षेत तो मात्र, कोमेजून गेलाय......! माझं कांही नाही.....! पण निदान त्याच्यासाठीं तरी, तुला पुन्हा यायलाच हवं......!!
Taxonomy upgrade extras