Skip to main content

अजूनही

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 28/06/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
ठाव ना तुझा तुला अजूनही काय शोधसी मला अजूनही? जागल्या कळ्या; सुकून चालल्या, गंध मात्र राहिला अजूनही ओळखू कसा तुझा स्वभाव रे? जाणले न मी मला अजूनही लांब जात सावल्याहि पांगल्या तू दिवा न लावला अजूनही सावळा न राधिका, न गोपिका एकटा रिता झुला अजूनही मीच जिंकले तरी हरायचा डाव का न संपला अजूनही? तोच नांदतो म्हणे चराचरी का मला न भेटला अजूनही?
Taxonomy upgrade extras

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १५

लेखक प्रसन्न केसकर यांनी रविवार, 28/06/2009 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

योगानंद विद्यापिठ स्थापना व प्रवेश सुचना

लेखक सदानंद ठाकूर यांनी रविवार, 28/06/2009 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
आजचे शुभदिनी योगानंद विद्यापिठाची स्थापना व प्रवेशाची अधिसुचना जाहिर करताना आम्हाला अत्यंत हर्ष(वायू) होत आहे. बहूत समयानंतर आमचे या स्वप्नपूर्तीचे क्षणी आमचे नयनातून आनंदाश्रूचा महापूर वहात आहे. या विद्यापिठातिल सोई व सुविधा: निसर्गरम्य हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर (डोळे फाड फाडून पहात रहावा असा). डोळे फाडून, वटारुन, टवकारुनहि दृष्टीक्षेपात मावणार नाहि एवढा कँपसचा परिसर. आस्थाश्री, आस्थाभूषण, संस्कार गौरव, पंडिताचार्य - आध्यापक व्रतस्थ वर्ग (शोधून शोधून आण्लले आहेत). प्रवेश प्रक्रिया व प्रवेश योग्यता: १० वी पास नापास ते पदवीधर, द्वीपदवी

बिनडोक भाषांतरे

लेखक सुनील यांनी रविवार, 28/06/2009 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
"मायकल जॅक्सनच्या गाण्याच्या ६५ दशलक्ष सीडीज विकल्या गेल्या" - एक बातमी. आता इथे ६५ दशलक्ष म्हणजे नक्की किती ह्याचा अंदाज (मनातल्यामनात का होईना) पण किंचित आकडेमोड केल्याशिवाय किती लोकांना येतो? विशेषतः ज्यांचे शिक्षण भारतात झाले आहे (माध्यम कोणतेही असो) त्यांना मिलियन-बिलियन पेक्षादेखिल लाख-कोटी ह्या संज्ञा अधिक परिचयाच्या वाटतील. मग, मिलियनचे दशलक्ष असे बिनडोक भाषांतर करण्यामागे काय हेतू असावा? *** "दक्षिण पूर्व अशियाई देशांत....." - दुसरी एक बातमी. सुदैवाने भारतीय भाषा ह्या दिशाविषयक शब्दांबाबत अधिक समृद्ध आहेत. दक्षिण-पूर्व ह्याला आग्नेय असा विवक्षित शब्द आपल्याकडे आहे.

आजचा सकाळ

लेखक गणा मास्तर यांनी रविवार, 28/06/2009 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळीसकाळी ई-सकाळ उघडला आणि काही विचित्र फुटकळ चुका लक्षात आल्या. सकाळ सारख्या मोठ्या नावाजलेल्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर अशा चुका पाहुन आश्चर्य वाटले. १.अंबरनाथ येथे रेल्वे पोलिसांची गांधीगिरी ही बातमी देशपातळीवरील बातम्यांमध्ये दिलेली आहे.

दहावीचा निकाल आणि भरमसाठ गुण

लेखक मिहिर यांनी शनिवार, 27/06/2009 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच दहावीचा निकाल लागला. यावेळचा सर्वसाधारण निकाल कमी असला तरी मुलांना मिळालेल्या गुणांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. पहिला नंबर ९८.६%चा. मराठीत यावेळी ९८ व इंग्रजीत ९८ गुण सर्वाधिक आहेत. कोल्हापुरातील उषाराजे हायस्कूल मधील ३७ मुलींना मराठीत ९० ते ९७ मध्ये गुण मिळाले आहेत. बघावे तिकडे गुणच गुणच दिसत आहेत. ह्या गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी कष्ट केले नव्हते असे मला अजिबात म्हणायचे नाही. मात्र ज्याप्रमाणात गुण वाटले गेले तेवढी मुलांची तयारी होती का? मराठीसारख्या विषयात इतके भरमसाठ गुण देणे चुकीचे नाही का? काही जण म्हणतील की, दिले इतके गुण तर काय बिघडले?

लाजाळू

लेखक ॐकार यांनी शनिवार, 27/06/2009 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
एक बागायतदार होता. एका वर्षी पावसाने झोडपून काढल्याने त्याच्या घरासामोरील एका बागेचे फार नुकसान झाले. त्यामुळे तो बागायतदार फार दु:खी झाला. अनेक वर्षे त्याने स्वतः नवनवीन रोपटी आणून, कलमं करून, खतपाणी घालून ती बाग फुलवली होती. आता आपण परत काही ती बाग फुलवायची नाही असे त्याने ठरवले. पुन्हा असा पाऊस झाला तर पुन्हा असे दु:ख आपल्याला सोसवेल की नाही अशी त्याला चिंता वाटत होती. वर्षभरात त्या बागेतल्या काही रोपट्यांनी आपोआप माना वर केल्या. तग धरून राहिलेली रोपटी पुन्हा तरतरून आली. पण त्या बागेत रान माजल्यासारखे दिसत होते. बागेची काळजी घ्यायला कोणी नव्हते.

फुलपाखरे

लेखक अश्विनीका यांनी शनिवार, 27/06/2009 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
ही स्थिरचित्रे सिअ‍ॅटल च्या सायन्स सेंटर मधील फुलपाखरांच्या बागेत काढलेली आहेत. - अश्विनी

"तू"

लेखक अलि यांनी शनिवार, 27/06/2009 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी चाहूल सौदामिनी तुझं येणं झिम्मडसर थांबणं तृप्त पाऊसओल मन हिरवं करणारं ओठी धनू इंद्राचं सप्तरंगी शब्दशर डोळ्यात आभाळ थेंबभर निरभ्र, निःशब्द करणारं

त्या पायलटचं नांव काय?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 27/06/2009 09:45 या दिवशी प्रकाशित केले.
"आपल्या जीवनाबद्दल आणि आपल्या अस्तित्वाबद्दल जे मुलभूत प्रश्न आहेत त्यांना उत्तर देण्यासाठीचा हा ह्या कथांचा प्रयास असतो." अरविंद चिटणीस ज्या शाळेत शिकला त्याच शाळेत शिक्षक म्हणून लागला.सुरवाती पासून त्याला कुणालातरी शिकवायची आवड होती.वर्गात मॉनिटर म्हणून राहिल्यास मुलांना कसली ना कसली तरी गोष्ट सांगण्यात स्वारस्य घ्यायचा.माझ्या वर्गात असताना हा त्याच्या अंगचा गूण मी पाहिला होता. आमचे क्लास टिचर नंतर प्रसिद्ध झालेले कवी कारखानीस होत. क्लास टिचर किंवा दुसरा कसलाही तास घेणारे शिक्षक त्यादिवशी गैरहजर असले तर आमचे हेड्मास्तर श्री.