Skip to main content

अजितदादांची मुक्ताफळे-- "राजू शेट्टींनी कारखाना काढला, की दूध संघ? का निवडून दिले?"

लेखक सुहास यांनी शनिवार, 11/07/2009 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या "ई-सकाळ" मध्ये "राजू शेट्टींनी कारखाना काढला, की दूध संघ? का निवडून दिले?" या मथळ्याची बातमी बघितली.. अजित दादाचा फोटो बघितला म्हणून वाचली... सांगली जिल्ह्यातील एका उद्घाटन समारंभाच्या वेळी दादा असे म्हणाले हे कळले.. राजू शेट्टींवर टीका असती तर ही बातमी ठीक-ठाक होती.. पण पुढे दादा काय म्हणाले ते मात्र आपल्याला विचार करण्यास भाग पाडतेय.. दादा म्हणतात.. "तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू, सगळीकडे पाणी देऊ; पण तुम्हीही मते देऊन पाठिंबा द्या." पवार यांचे स्वागत करताना टाळ्या वाजल्या नाहीत.

म्हातारपण!!! नको गं बाई..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 10/07/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
अजून बस आली नव्हती.. आम्ही सगळ्याजणी आपापल्या मुलांना घेण्यासाठी त्या स्कूलबसच्या पिक-अप- ड्रॉप ऑफ स्टॉप वर उभ्या होतो. इतक्यात बस आलीच. लेकाच्या वर्गात आमच्या कॉम्प्लेक्स मधली ४ जणं आहेत. आणि शिवाय के जी च्या दुसर्‍या वर्गात असणारी आणखी ५-६ जण आहेत. बसमधून उतरल्या उतरल्या हे सगळे केजी'कर इतका चिवचिवाट करत असतात.. आपल्या बॅगा आयांच्या ताब्यात देऊन हे सगळे मस्त बागडत कुठे झाड्याच्या वाळलेल्या काठ्या गोळा कर, कुठे फुले तोड.. कुठे पेबल्स गोळा कर.. असं करत करत , शाळेत काय झालं हे सांगण्याची अहमहमिका लावत हे सगळे उड्या मारत घरी जातात. पण आज.. सगळंच शांत होतं. थोडं आश्चर्य वाटलं.

आणखी एक धरण ??

लेखक पाऊसवेडी यांनी शुक्रवार, 10/07/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मेधा पाटकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विविध आंदोलनाच्या बातम्या फक्त पेपर किंवा दूरदर्शनवर पाहत होते पण या वर्षी त्यांचा सापळी धरणग्रस्तांसाठी सुरु केलेला लढा जवळून पाहण्याची संधी मिळाली आणि त्याबद्दल मिपाच्या वाचकांना सांगावे म्हणून हा माझा पहिलाच प्रयत्न. माझ्या M.Sc. नंतर मी एका कार्यालयात काम करायला सुरुवात केली आणि त्यच मुले मला हे संधी मिळाली कि मी मेधातायींचा हा सुरु असलेला लढा अनुभऊ शकले.

विक्रमादित्याची साठी

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 10/07/2009 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपल्या सर्वांचा लाडका विक्रमादित्य, लिटल मास्टर सुनील गावस्कर वयाची साठी पुर्ण करतोय. या विक्रमवीराला वाढदिवसाच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा ! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4759849.cms सस्नेह, विशाल कुलकर्णी

फोकाचे वळ

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 10/07/2009 11:17 या दिवशी प्रकाशित केले.
"मास्तर, खुर्चीत बसवत नाहीय्ये".- एक सन्माननिय मिपासद्स्य फोन वर म्हणाले. ढेकुण झालेत की काय? "नाही हो, फोकाचे वळ उठलेत. आय शप्पथ सांगतो आता परत कधी १८०+ शिट्टी घरात वाजवणार नाही. गाडाव झालो होतो. आता परत माणुस झालो.आतापर्यंत झाले ते साल्वेज कसे करायचे ते विचार करतोय." घरी जा. जाताना एखादी भेट घेउन जा. डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवा. बस्स. आणि ह्या पुढे तीला आवडणार्‍या विषयात गप्पा मारुन जमेल तेवढे खीखीखीखी खी करा. ती अगदी योग्य मार्गावर आहे. काहीही काळजी करु नका. तीला जे हवे आहे ते ती मिळवेलच ह्याची मला खात्री आहे. ह्या बाबत माझा अंदाज सहसा चुकत नाही. तुम्ही फक्त आई, बाबा व्हा.

मुंबई-मँगलोर विमान प्रवास

लेखक चंबा मुतनाळ यांनी शुक्रवार, 10/07/2009 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच cnn-ibn वर बातमी वाचली की एयर इंडियाच्या मुंबई-मँगलोर फ्लाईटमधून ३ जादा प्रवाशांनी प्रवास केला. एका बाईला कॉकपिट्मधे मागल्या सीट वर, तर दोन प्रवाशाना कर्मचार्यांच्या जंपसीटवर सोय केली. हे कसे साध्य करण्यात आले हे अजून कळलेले नाही परंतु ह्या प्रकरणात बरेच सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवण्यात आले ह्याबद्दल शंकाच नाही. जर हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले असते, तर प्रवाशाना नुकसान भरपाई मिळाली असती का?

भनाट आयडिया

लेखक यन्ना _रास्कला यांनी शुक्रवार, 10/07/2009 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
सद्ध्या बँड्रा-वर्ली सी लिंकावरन जायला आनी यायला १०० रु. लागतात. आम पब्लिकला त्ये लई महाग वाटतात. वाटनारच. त्याच्याव एकच पन लई झ्याक आयडियेची कल्पना आहे. आगदी तुमी चर्चगेटाला आस्लात तरी चालल पन बेस्ट बशीच २० रुपयाच दिवसभराच तिकिट काढायच आनि आमच्या वाशी क्रिकच्या पुलावर येनार्‍या बशीमधन यायच आनी वाशी क्रिकची मजा आनुभवायची. त्ये पन कितिपन वेळा. २० रुपयात कोनत्याबी बशी मधे बसा आनि कितीबी टायम्बाला. कितिपन फेर्‍या मारा या पुलावरन. येकदम ढीनचॅक. फुडले नेटावर्ले फोटो पाहा म्हंजे कळल.