कोथिंबीर वडी
पालेभाजी कोथिंबीर चार चार रुपये ... भाजीवाला अगदी उत्साहात ओरडु लागणे हे ही पावसाळ्याचे एक लक्षण...पावसाळा आला की पालेभाज्या छान मिळतात.
त्यातही खास म्हणजे कोथिंबीर. एरवी ७-८ रुपयाना एवढीशी मिळणारी कोथिंबीरीची जुडी पावसात कशी छान जाडजुड होऊन येते. हिरवीगार आणि स्वस्त
मिळालेल्या कोथिंबीरीची मोठी जुडी घरी आणली जाते. आणि बेत बनतो कोथिंबीर वडीचा.. मग ती कोथिंबीर एक तास बसुन साफ करता करता आपण कशी
एवढ्या ढिगातुन एकदम छान आणि न फुललेली जुडी आणली या बद्द्ल चर्चा करणे आलेच...
चहाची पाने आणि वाफप्रक्रीया
चहाच्या पानापासुन चहा पावडर करेपर्यंत ज्या अनेक क्रिया-रीतींतुन चहाचे पान जाते त्यावर एक ग्रंथ लिहीता येईल. ह्या रीतींमुळेच चहाचे अगणित प्रकार, चवी, वास, रंग, तयार झाले. ह्या सर्व उत्पादन पद्धती अर्थातच एकदम विकसित झाल्या नाहीत व अनेक डोकेबाज माणसांनी त्यात अनेक आवश्यक बदल घडवून आणले आहेत.
अशीच एक छोटीशी गोष्ट.
पुर्वी तोडून वाळवलेल्या चहाच्या पानांवर वाफेचा फवारा मारला जाई. वाफेतील उष्णते व आर्द्रतेमुळे, सुरुवातीची अतिशय कडक झालेली चहांची पाने मऊ होऊन त्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरु होई. ह्यानंतर पुन्हा ऑक्सिडेशनची प्रक्रिया ठराविक काळानंतर थांबवण्यासाठी ती पाने वाळवली जाई.
तुमच्या मनांत आहे ते माझ्या हातात(ईडंबनात) नाही.
माझ्या त्या (अजून आणखी एक ईडंबन केलं आहे.) मधल्या "पुष्टावलेल्या ऊसाच्या" विडंबनाचा जन्म असा झाला.
(गलका!)
आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णी यांची अप्रतिम गझल गलका!
(गलका!)
धक्का बसला तिला जरासा, मला लागला झटका!
सॉरी म्हणता... कानाखाली तिने लावला फटका!
सजावटींच्या दिव्यांत बसतो शांत चाखतो मदिरा...
जरी चघळतो 'मावा', 'पोलो' तिला जाणवे भपका!
उगीच का डोळ्यांत अचानक माझ्या आले पाणी?
नाव घेतले माझे तू अन, मला लागला ठसका!
असा आज का, लंगडतो मी काय तुम्हाला सांगू?
तिच्या घरातिल कुत्र्याचा मी पार घेतला धसका!
झोप हवीशी सुट्टीची... पण सासू ही तडमडते...
जागे होणे भाग अता मज, अन सुट्टीचा पचका!
विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा
विवाह परिषदेनिमित्त राज्यस्तरीय निबंधस्पर्धा
" मिळून सा-याजणी" मासिक आणि विमेन्स नेटवर्क संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जानेवारी २०१० मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विवाह परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.त्याची सुरवात राज्यस्तरीय निबंधस्पर्धेपासुन करीत आहोत.
निबंधस्पर्धेचे विषय
१) विवाहांतर्गत आनंदी सहजीवनाच्या वाटा
२) विवाहप्रथा आणि स्त्री-पुरुष समता
३) विवाहबंधन गरज कि सक्ती
४) विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक
५) आंतरजातीय विवाह जातींचा मेळ कि झळ
६) विवाह असुनही एकाकी
७) एक पजिद्द - मराठी माणसांची
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही.
* छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्याच्या घरात असा विचार करतो.
* मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे.
* एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे.
असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे
सायकलवर नीळकंठेश्वरला...एकटाच...
मला सायकल चालवायला जाम आवडतं. सायकल असली, की उगीचच पैसे आणि इंधन न जाळता आपल्या सोई नुसार हवं तीथं वेळेत पोचता येतं. सायकलवर एखादा घाट चढताना जाम दमून घाटमाथ्यावर पोचण्याचा आनंद वेगळाच असतो. मग हँडल वरचे हात सोडून घाट उतरण्याचा रोमांच तर भारीच (हा प्रकार करताना लहानपणी एकदा जाम वाईट आपटलो होतो... त्याच्या खुणा अजूनपण कपाळावर आणि गुढघ्यावर आहेत...).
तर गेल्या पावसात एका weekend ला आराम करायचा बेत होता. मग शनीवार काहीतरी वाचण्यात आणि टेकडीवर भटकण्यात घालवला. उद्या कुठंतरी भटकायला जायला पाहीजे असं शनीवारी रात्री वाटायला लागलं.
कोप
दोन पोरास्नी म्हागं सोडुन गेली वो सायेब? आता पोरास्नी कसं सांगु? माजं तर समदं आविष्यच बरबाद झालं बगा !!
तो धाय मोकलुन रडत होता. आणि आम्ही सारे हतबुद्ध होवुन पाहात होतो.
तीचं शव तिथंच पडुन होतं आणि काल रात्रीपासुन हा सहावा माणुस होता तीला आपली बायको म्हणणारा ! मनोमन प्रचंड संताप येत होता. केवळ दागिन्यांसाठी माणुस या थराला जावु शकतो. काल रात्री आणखी एक ढासळलेले घर शोधताना एका महिलेचे शव सापडले होते. दागिन्यांनी बाई नखशिखांत सजलेली होती. आणि तिच्यावर हक्क सांगायला आत्तापर्यंत सहा जण आले होते.
नाही, ही कुठल्याही रहस्यकथेची किंवा खुनप्रकरणाची सुरुवात नाहीये.
श्री टारझनदादांचे अभिनन्दन्......
ज्येष्ठ मिपा सदस्य आणि मराठी आंतर्जालीय विष्वातील अभिनव कल्पनांचे जनक श्री.टारझनदादा यांचे
अभिणन्दण करावयाचे योजत आहे
तरी कोनकोनत्या कामासाटी /गुनासाटी त्यांचे अभिणन्दण करायचे या साठी मिपाणगरीतल्या सदस्यांणी त्यांचे आपनास माहीत आसलेले गून इथे लिहावे.
मिसळपाव