"मी माझ्या लेखनात नेहमी, स्वातंत्र्य,कायद्याची अंमलबजावणी,ईश्वराचं महत्व आणि धर्मातून ईश्वराकडे पोहोचणं ह्या विषयावर लिहित असते."
कमला पेंडसे यांचे बरेचसे लेख मी काही मासिकात वाचले आहेत.निरनीराळ्या विषयावरचे त्यांचे लेख वाचायला मला आवडतं.कधी तरी त्यांना प्रत्यक्ष भेटून हे विषय त्यांना कसे सुचतात म्हणून विचारावं असं माझ्या मनात नेहमी यायचं.
माझा मित्र नाना पेंडसे ह्याला मी एक दिवस सहज विचारलं,
"काय रे नाना, ही कमला पेंडसे जी लेखिका म्हणून प्रसिद्ध आहे ती तुझी आडनांव-भगीनी आहे का, की तुझं तिच्याशी खरंच नातं आहे.?"
आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाना म्हणाला,
"अरे ती माझी सख्खी चुलत बहिण आहे.दादरला गो