गूढ कथा: अगम्य आघात!!!
दि: ९/९/२००९, ९:०० पियुष पार्क
सुजय सूर्वे गाढ झोपेतून जागा झाला तेव्हा सकाळचे नऊ वाजले होते. खिडकीतून पाहिल्यावर कधी नव्हे तो सूर्य आज अगदी तेजस्वी दिसत होता. सुजय अगदी अभ्यासू आणि आज्ञाधारक मुलगा. तितकाच अंगापिंडाने मजबूत. रोजच्या दिनक्रमात व्यायामाला तो महत्त्व द्यायचा. यंदाचे बारावीचे वर्ष. पीसीएम ग्रुप निवडला होता त्याने. मॅथ्स त्याचा आवडता विषय. रोज सकाळी पाच वाजता उठून तो सहा वाजता सुरू होणार्या मॅथ्स च्या ट्युशन साठी तयार व्हायचा. ट्यूशनला जायला पप्पांनी घेवून दिलेली स्कूटी त्याला उपयोगी पडायची. बोचरी थंडी. बरेचदा धुके रस्ता व्यापून टाकायचे.
मिसळपाव