Skip to main content

महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय?

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 16/10/2009 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र पोलीस काँग्रेस(आय)चे प्रचारक आहेत काय? काँग्रेस(आय)चा लोगो हाताचा 'पंजा' आहे. महाराष्ट्र पोलीस च्या लोगोत पण 'पंजाच' आहे. असला लोगो हातावर मिरवणारे पोलीस निवडणूक आयोगाच्या 'आदर्श ??' आचारसंहीतेत चालतात का? अवांतरः महाराष्ट्र पोलीस चा लोगो कधी डिझाईन करण्यात आला?

पाऊस कधीचा पडतो

लेखक बेसनलाडू यांनी शुक्रवार, 16/10/2009 03:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्दैव, अस्वस्थता या आणि अशा काही संज्ञांच्या व्याख्या जडगोळा तत्त्वज्ञानाची पुस्तके, वर्तमानपत्रांतील लक्षवेधी लेख किंवा थोरामोठ्यांची टाळीबाज व्याख्याने यांतून होतच नसतात. त्या होतात स्वानुभूतीतून. म्हणजे रविवारी ग्यालरीत उभे असताना खालून जाणार्‍या कोळणीच्या टोपलीत ताजा फडफडीत बांगडा दिसावा; बांगड्याची भूक तिला द्यायच्या हाकेच्या रुपाने अगदी स्वरयंत्रापर्यंत यावी आणि अचानक आज संकष्टी असल्याचा साक्षात्कार व्हावा, हे खरे तर दुर्दैव आणि या साक्षात्कारानंतर होणारी 'कसंनुसं' झाल्याची जाणीव म्हणजे अस्वस्थता.

कमी जोखिमीचा गुंतवणूक पर्याय

लेखक सदानंद ठाकूर यांनी गुरुवार, 15/10/2009 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
कमी जोखिमीचा गुंतवणूक पर्याय डेब्ट म्युचल फंडात गुंतवणूक करण्याची संधी आपणाला असे वाटते आहे का कि सद्या समभागांच्या किंमती जास्तच आहेत व म्हणून शेअर बाजारात किंवा इक्वीटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. जर असे आपणास वाटत असेल तरीसुद्धा सद्याचे बँक ठेवीवरील अत्यल्प व्याज दर असताना व करपश्र्चात बँक गुंतवणूकीवरील अत्यंत कमी परतावा विचारात घेता आपण म्युच्युअल डेट फंडाचे योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर होऊ शकते.

स्ट्रेटड्राईव्ह तेंडूलकरस्य

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी गुरुवार, 15/10/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आल्यावर आमच्या संगीताबद्दलच्या ज्ञानात बरीच मौलिक भर पडली. म्हणजे आधी आम्ही अगदी औरंगजेब जरी नसलो तरी त्याच्या एखाद्या 'टियर २' सरदाराच्या जवळपास जायचो. पण आय्च्यान सांगतो.. तात्यांची बसंतचं लग्न ही लेखमालिका वाचली अन उत्सुकता आणि त्याबरोबर गोडी वाढत गेली. पण मूळचा पहिलवानी पिंड जाणार कसा हो? एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं ! अहो आमच्या क्रीडाक्षेत्रातदेखील काय एकसे एक कलाकार आहेत म्हणून सांगू?

<प्रवास>

लेखक सहज यांनी गुरुवार, 15/10/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा अर्थात कविवर्य मोडक यांचा प्रवास पळवाट म्हणाली, "आलास का! अडाणी आहेसच ठाउक नाही उत्तर तुला. प्रश्नही समजलेला नसतोच, ते येतात तेव्हा आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू होतो, मुळमार्गाकडं दुर्लक्ष होतं..." मूळप्रश्नाच भान राखणं हे तर उमगण, अन्यथा सारेच प्रतिसादी महाधूर्त! "महाधूर्तांच" बरं असतं, वारा बदलतो तसे तेही पण तुझ तसं नसतं म्हणून मी इथेच असते. अडाणीपणा करताना पाय फसतील म्हणून सांगतेय..." लिहताना केव्हा तरी भान सुटलं, वाचा भरकटली आता उपायाखाली केवळ माती अन भीतीच आहे मी पळतोच आहे... 'नाना फडणीसाचा पाय' दागिना मिरवत!
काव्यरस