आगितुन फुफाट्यात
आगीतून फुफाट्यात



नमस्कार मंडळी,
आज दि.२३ जानेवारी "आझाद हिंद सेनेचे" संस्थापक वंदनिय नेताजी बोस यांची जयंती.
या विस्मृतीत गेलेल्या महान नेत्यास माझा मानाचा मुजरा.
जय हिंद, जय हिंद, जय हिंद,
मराठी ग्रंथप्रदर्शनात अक्षरधारा हे नाव आता इतके रुजलय कि ग्रंथप्रदर्शन म्हणले कि अक्षरधारा असे समीकरण रुजलय.अक्षरधारा तर्फे मराठी वाचकांसाठी सातत्याने काही उपक्रम राबवले जातात. त्यात वेगवेगळ्या साहित्यिकांशी गप्पा हा प्रमुख कार्यक्रम असतो. काल निळू दामल्यांची मुलाखतीचा कार्यक्रम पहायला/ ऐकायला टिळकरोडच्या मराठा चेंबर्सच्या सभागृहात गेलो.