Skip to main content

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या; पालकांना धडा!

लेखक बंडू बावळट यांनी मंगळवार, 26/01/2010 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडे वरचेवर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचनात आल्या. अभ्यासाचे टेन्शन, परिक्षेत अपयशाची भिती आणि मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या अतिमहत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर लादल्यामुळे त्या आपण पुर्‍या करू शकू की नाही; या भितीपायी विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होतात. माझ्या मते हा सर्व पालकांना एक प्रकारचा धडाच मिळाला आहे. निदान या पुढे तरी पालक आपल्या अतिमहत्वाकांक्षा विद्यार्थ्यांवर लादणार नाहीत असे वाटते. आता तरी असे काही अतिमहत्वाकांक्षी पालक सुधारतील काय? त्यांच्यावर आपले अपत्य गमवायची वेळ येऊ नये असे वाटते. मिपाकर वाचकहो, हा तसा गंभीर विषय आहे.

रगडा पॅटिस

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 26/01/2010 05:46 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांनी काहीतरी चांगलं बनवलं होतं तर म्हटलं मिपाकरांसाठी पाकृ देउयात तसं काय हो आंतरजालावर एक शब्द टाकायची देरी, हजारो पाकृ तरी हजर होणार... मागे एकदा सासूबाइ आल्या होत्या तेव्हा त्यांना भारी नवल वाटे, म्हणे "माझी सून फार हूश्शार आहे बरं कां...त्या इंटरनेटवर पाकृ शोधते नी लगेच बनवते" ...असं सांगत होत्या भारतात सगळ्यांना.. :D :)) मला काय!!! मी आपला मोठेपण घेते हिंडत होते या भारत भेटीत...

लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत.

लेखक अजय भागवत यांनी सोमवार, 25/01/2010 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेच्या संदर्भातील एका कार्यक्रमानिमीत्त घेण्यात येणाऱ्या एका कार्यक्रमासाठी लघुलिपी (शॉर्टहॅंन्ड) येणारी/ ऱ्या व्यक्ति एक महत्वाची मदत म्हणून हवी आहेत. स्थळ- गांधी भवन, कोथरुड, पुणे, ता. ३१ जानेवारी, वेळ- स. १०.०० ते सं ६.०० लघुलिपी येणे हे आवश्यक नसुन बैठकींचा सारांश काढता येण्याची कुशलता जास्त महत्वाची आहे. आपणास जर अशी व्यक्ति माहित असल्यास, कृपया संपर्क (व्यनी अथवा ९८९०१ २८९२२) साधावा.

`बोध-कथा'

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 25/01/2010 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी बसमध्ये घडलेल्या मिनिटभराच्या त्या प्रसंगानंतर रोज तिथून वळताना मी सिग्नलच्या खांबाकडे पाहातो. `सबसे प्रेम करो' असा संदेश देणारा फलक हातात ऊंच धरून तो खांबाला टेकून उभा असतो. निर्विकारपणे. बाजूने वाहात असलेल्या गर्दीशी आपल्याला काहीच देणेघेणे नाही, असे भाव चेहेर्‍यावर सांभाळत. ... त्या दिवशी पुन्हा मी सवयीनं तिथे पाहिलं. तो तिथे नव्हता. त्याच्या हातात असणारा तो फलक मात्र, खांबाला टेकून व्यवस्थित ठेवलेला होता. `कंटाळला असणार'... मी मनाशी म्हटले. तरीदेखील, आजूबाजूला कुठे `तो' दिसतो का, हे शोधत माझी नजर भिरभिरत होतीच. तासाभरानंतर त्याच रस्त्यावरून परतताना मी पुन्हा तिथे पाहिले.

अगतिक.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 25/01/2010 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
अगतिक..... हातात हात घेण्या मी वाकलो तुझा पण सहसा कधी कुणाचा .....झालो गुलाम नाही ! तू झेललीस थुंकी ...लाचार तू सदाची , विकण्यास मी तयार्.....माझा कलाम नाही ! काळीज ओतुनी मी , जे मांडले , जगी या त्या गायकास "वाहव्वा" .....मजला सलाम नाही ! नुरलो न मीच माझा मरणापल्याड सुध्दा इतुका सखे कुणाचा , कुणीही गुलाम नाही ! भिजल्या दवांत होते , ते केस तुझे सोनेरी शब्दांत कसे ते मांडू?- नाही - कलाम नाही !

(कोडगं सुख.....)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 25/01/2010 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
सप्रे काकांची माफी मागुन.... अंदाज स्टॅमिन्याचा, माझ्या मला न आला हातात ग्लास माझा, घेता मला न आला बाटलीच टाकीली मी, अन कोंबडी रिचवली हँगओव्हर मात्र माझा, उतरविता मला न आला रस्त्यात मोळळ्या मी, का हरविले स्वतःला पोलीस एक माझा, धरण्यास हात आला आगतिक पणाने, जामिन दीला तु माझा घेईन दोन घोट, विसरण्या अपमान माझा मी कोडगा किती पण, तरीही सुखावलो बघ तल्लफ परत येता, थांबवता तुला न आला पैजारबुवा
काव्यरस

प्राँस् पालक

लेखक गणपा यांनी सोमवार, 25/01/2010 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
पालक पनीर हा प्रत्येक हॉटेलमध्ये मिळणारा आणि सर्वत्र आवडीने खल्ला जाणार पदार्थ.

म्हागाईला जवाबदार कोण ?

लेखक बाबुराव यांनी सोमवार, 25/01/2010 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
महागाईला कृषीविभाग जवाबदार हाय. कृषीमंत्री जवाबदार हाय असे आरोप होत हायेत. वर्षभरापुर्वी महागाईवर नियंत्रण आनन्यासाठी देशातल्या सार्‍या मुख्यमंत्र्याची बैठक व्हणार व्हती. ती अजून झाली नाही. भाववाढीबाबत राज्यसरकार आन केंद्रसरकार जवाबदारी झटकून राह्यले. त्यामुळं म्हागाईवर नियंत्रण राह्यलेले नाय. आपल्याला काय वाटतं महागाईला जवाबदार कोण ?