Skip to main content

घन घोर मराठी पोर...{Patriotic material}..

लेखक मंगेशपावसकर यांनी सोमवार, 22/02/2010 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
घन घोर मराठी पोर जातीची थोर लढाया आज पुढे धार पातीची वार छातीची ढाल धराया आज पुढे सात वेडे ते घाट मोडे जे आज मराया आज पुढे वीर थोडे ते प्राण सोडे जे लाज धराया आज पुढे धर्म रक्षिला मान बक्षीला कृथार्थ झाहलो आज कुठे सत्य निश्ठीला विठ्ठल भक्तीला पावन पडलो आज कुठे बाजी भक्तीला जीवा जातीला अमर जाहला आज इथे आज लाभला शिवा मातीला स्वराज घडला आज इथे आज मराठी कसा जागतो कोण साधतो राज इथे कसा वागतो असा नाचतो कोण पहाया आज इथे पुन्हा शिवाजी पुन्हा शिवाजी जयघोष चालला आज जिथे जो तो मातला स्वार्थात गुंतला खेळ मांडला आज इथे...........................
काव्यरस

थोल पक्षी अभयारण्य- निसर्ग चित्रे आणि दुर्मिळ पक्षी.

लेखक Manish Mohile यांनी सोमवार, 22/02/2010 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
अहमदाबादपासून जवळ ४० - ४५ किलोमिटर दूर शिलज नावाचे एक गाव आहे. त्याच्या जवळच थोल पक्षी अभयारण्य आहे. गेली अनेक वर्षे ईथे राहत असूनसुद्धा काही ना काही कारणाने तिथे जाणे जमले नव्हते. पण ओळखीच्या एककडून कळले की या वर्षी थोलला बरेच वेगवेगळे पक्षी दिसले आणि मग आम्ही ठरवले की या वेळी या जागेला भेट द्यायचीच. ठरल्याप्रमाणे ३१ जानेवारीला सकाळी पाच ला ऊठून सगळ आवरून साडे सहाला आम्ही निघालो. वातावरणात सुखद गारवा होता. साधारण अर्ध्या तासात आम्ही थोल च्या जवळ पोचलो. सकाळी सकाळी भारद्वाजाने दर्शन देऊन शुभशकुनाची नान्दी केली. पुढच्या १५ मिनिटात आम्ही चेक पोस्ट जवळ पोचलो.

निसर्ग ( छायाप्रकाश चित्रे )

लेखक प्र्दीप प्त्की यांनी सोमवार, 22/02/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रानो मी प्र थमच लेखन करत आहे . मुम्बईचा आहे पण कामाकरिता अहमदाबादला असतो . निसर्गवेडा असल्याने निसर्गाचे विविध अविश्कार मला नेहमीच भुलव् तात . नीसर्गाचे छायाप्रकाशचित्रण हा माझा अतिशय आवडता छन्द . आत्तापर्य् तचे काहि फोटो तूमच्याबरोबर शेअ र करत आहे . खाल च्या लिन्क वर क्लिक क रा . http://picasaweb.google.com/ppatki1971/MyFavouritePhotos?authkey=Gv1sRgC... आपला प्रदी प

खिंड

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 22/02/2010 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
"अय्या,सर तुम्ही. बर झाले तुम्ही भेटलात " बॅकेत गर्दी होती. पैसे मिळायला कमीत कमी अर्धा तास लागणार होता. आता खिंड लढवणे भाग होते. "पोरीने नशिब काढले हो" लग्न ठरले का"? "इश्श, काही तरीच काय. एवढ्यात कुठे लग्न" ह्या मातेच्या मुलीला मी पंधरा दिवसापुर्वी एका गोरटेल्या मुलाबरोबर अपुर्ण स्काय वॉक वर 'टेकान घेवा' स्थितीत बघितलेले होते. त्यामुळे एक नैसर्गिक प्रश्न होता तो. "माझ्या वेळी खुपच त्रास झाला होता हो. धड पंखे पण नव्हते" आता हीच्या पहिल्या डीलिवरी ला मॅटरनिटी होम मधे लेबर रुममधे पंखा नसल्याने जे हाल झाले त्या बद्दल तर बोलत नसावी. पण हे माझ्या कडे का बरे बोलावे ? मी आपला हैराण.

चिकन-६५

लेखक गणपा यांनी सोमवार, 22/02/2010 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, इंडो-चायनीझ च्या नवीन भागात आपल सहर्ष स्वागत :) या विकांताला काही मित्र मंडळी आली होती. सगळे अट्टल नॉन व्हेज खाणारे असल्याने एक छोटे खानी कौल टाकुन एक मुखाने चिकनच्या निवडीवर शिक्का मोर्तब झाले.

असेही हळदीकुंकू

लेखक रेवती यांनी सोमवार, 22/02/2010 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील व्यक्तींची नावे काल्पनिक आहेत. साधर्म्य आढळल्यास तो योगायोग समजावा.) "अगं हो, मला वाटलंच होतं तू फोन करणार म्हणून, पण पाच घरी हळदीकुंकू म्हणजे वेळ लागला परत येतायेता!" सौ. सासूबाई संक्रांतीच्या हळदीकुंकवांबद्दल सांगत होत्या. कुलकर्ण्यांकडे प्लास्टिकच्या टोपल्या तर देशपांड्यांकडे बांगड्या लुटल्या.......कान्हेरे आज्जींकडे डाळतांदळाची खिचडी........असं बोलणं झालं. अश्या प्रकारांमध्ये मला फारच इंटरेस्ट होता. कोणाकडे नविन सुना आल्यात? त्यांच्याकडच्या पहिल्या हळदीकुंकवाला कायकाय झालं? कोणी काय डिश ठेवली होती हेही विचारून झालं.

(माझ्या कविता - असा पाऊस पडावा : एक विडंबसुनीत)

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 22/02/2010 02:40 या दिवशी प्रकाशित केले.
(मी माझ्या कविता इतरत्र कुठेही लिहिलेल्या नाहीत. या माहितीचा वाचकाला काही उपयोग नाही हे माहीत आहे. पण सोचा बताने मे क्या हर्ज है? या कवितेवरून मला खालील ओळी स्फुरल्या. ही कविता वाचून मला टायपिंग नीट येत नसेल असं वाटेल. पण नाही, तो विडंबनाचा भाग आहे.
काव्यरस

सांजवेळ

लेखक जयवी यांनी सोमवार, 22/02/2010 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
सावल्या लांब व्हायला लागल्या तशी सूर्याला आपल्या विश्रांतीची वेळ झाल्याची जाणीव होते. आपली मंदावलेली सोनसळी किरणं गोळा करुन तो निघतो. दूरवर हलकेच पैंजणांचा आवाज येतो....तो वळून बघतो. आपली पायघोळ काळी चंद्रकळा नेसून...यामिनी नखशिखान्त चांदणं लेवून.....आकाशाच्या दर्पणात आपलं प्रतिबिंब न्याहाळताना त्याला दिसते. तो कौतुकाने हसतो. रोज तितक्याच तल्लीनतेने तिचं त्या दर्पणात न्याहाळण्याचं त्याला कौतुक वाटतं. तो कित्येकदा ते बोलूनही दाखवतो. तीही दिलखुलासपणे ते मान्य करते.